तुमची त्वचा जेव्हा अधिक ताणली जाते तेव्हा त्वचेवर स्ट्रेच मार्क्स येतात. विशेषतः गरोदरपणानंतर हे स्ट्रेचमार्क्स अधिक प्रमाणात दिसून येतात. पण तुम्हाला जर स्ट्रेच मार्क्स त्वचेवर नको असतील तर त्यासाठीही अनेक क्रिम्स बाजारात उपलब्ध आहेत. या लेखातून आम्ही तुम्हाला अशाचा काही उत्कृष्ट क्रिम्सची माहिती देणार आहोत. याचे परिणाम आणि तोटेही सांगणार आहोत. सतत कमी जास्त होणारे वजन आणि शरीरावर येणारा ताण यामुळे त्वचा ताणली जाते आणि त्वचेवर स्ट्रेचमार्क्स येतात. असे स्ट्रेचमार्क्स फॅशनेबल कपडे घालताना अर्थातच दिसू नयेत असं प्रत्येकाला वाटत असतं. पोटावरील स्ट्रेचमार्क्स बऱ्यापैकी कपड्यांमुळे झाकले जातात. मात्र कधी कधी मांड्यांवरील आणि हातावरील स्ट्रेचमार्क्स हे दिसून येतात. आपल्याला बऱ्याचदा हे दिसलेले आवडत नाही. मग अशावेळी काय करायचं तर यावर काही क्रिम्स उपलब्ध आहेत त्याचा उपयोग करून घ्यायचा आणि तो कसा करायचा हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
पण तुम्हाला माहीत आहे का? हे स्ट्रेच मार्क्स आपण नक्कीच घालवू शकतो आणि त्यासाठीच आम्ही इथे तुम्हाला काही क्रिम्सबद्दल माहिती देत आहोत. या क्रिम्सचा वापर करून तुम्ही तुमच्या त्वचेवरील स्ट्रेचमार्क्स दूर करू शकता.
आपल्या त्वचेला ज्यांना अधिक पोषण द्यायला आवडतं त्यांच्यासाठी हे अँटि स्ट्रेच मार्क लोशन उत्तम पर्याय आहे. हायड्रेटिंग घटक जसे शिया, कोको आणि जोजोबा बटर यांच्यापासून हे क्रिम तयार करण्यात आलं आहे. यामध्ये 99% नैसर्गिक बेली बटरचा समावेश असून आपली त्वचा गरोदरपणात अधिक मऊ आणि मुलायम राखण्याकरिता याचा उपयोग करून घेता येतो असा कंपनीचा दावा आहे. तसंच यामुळे त्वचेला कोणतीही हानी पोहचत नाही असंही सांगण्यात आलं आहे.
फायदे
तोटे
काहीही नाही
बॉडी मेरी स्ट्रेट मार्क्स अँड स्कार्स डिफेन्स क्रिम हे कोको बटर (हायड्रेशनकरिता), शिया बटर (पोषणाकरिता) आणि आवश्यक फॅटी अॅसिड, वनस्पतीयुक्त तेल आणि विटामिन्स यांचा समावेश करून बनविण्यात आलेले क्रिम आहे. याचा उपयोग तुमच्या स्ट्रेचमार्क्सचा तुमच्या त्वचेवरील परिणाम कमी करण्यासाठी आणि तुमची त्वचा अधिक मुलायम करण्यासाठी करण्यात येत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. गरोदरपणात तुम्ही हे क्रिम वापरू शकता. याचा तुम्हाला कोणताही त्रास होत नाही असंही सांगण्यात आलं आहे.
फायदे
तोटे
काहीही नाही
स्ट्रेचमार्क्स व्यतिरिक्त उजळपणा कमी होणे, निस्तेजता आणि कोरडेपणा या सगळ्यासाठीच पाल्मर्स कोको बटर फॉर्म्युला उपयुक्त ठरते. तसंच हे क्रिम त्वचेला पोषण देऊन त्वचेमधील उजळपणा वाढण्यासही मदत करते आणि तुमच्या त्वचेवरील स्ट्रेच मार्क्स लवकर कमी होण्यास हे फायदेशीर ठरते असा कंपनीचा दावा आहे. तर आपण ही मलई वापरू शकता आणि घरी ताणून येणारे गुण काढून टाकू शकता.
फायदे
तोटे
काहीही नाही
या क्रिमचा स्ट्रेचमार्क आणि स्कार ट्रिटमेंट या दोन्हीसाठी उपयोग करून घेता येतो असा दावा कंपनीने केला आहे. स्ट्रेचमार्क्ससह त्वचा अधिक सुंदर दिसावी आणि डाग दिसू नयेत तसंच त्वचेला अधिक मुलायम बनविण्यासाठी त्वचेवरील डाग कमी करण्यासाठी आणि पिगमेंटेशन काढण्यासाठी या क्रिमचा उपयोग करून घेता येतो. रेटिनॉलशिवाय हे क्रिम बनविण्यात आले आहे. यामध्ये इसेन्शियल ऑईल आणि विटामिन्सचा भरणा असून स्ट्रेचमार्क्स कमी करून तुमची त्वचा अधिक चांगली बनविण्यासाठी याचा उपयोग होतो.
फायदे
तोटे
काहीही नाही
मेडर्मा स्ट्रेच मार्क्स थेरपी हे स्ट्रेच मार्क्स काढून टाकण्यासाठी उत्तम पर्याय आहे. या क्रिमचं नाव तर सगळ्यांनीच ऐकलं असेल. हे जाडसर पण तुमच्या त्वचेला योग्य पोण देणारे आणि हायड्रेट करणारे क्रिम आहे. तसंच लवकरात लवकर स्ट्रेचमार्क्स निघून जाण्यासाठी याचा उपयोग करून घेता येतो. या पोषणात्मक क्रिममध्ये सेपालिन आणि सेंटेलिया अशियाटिकाचा अंश असून हायलुरॉनिक अॅसिडदेखील आहे जे तुमच्या त्वचेला अधिक मॉईस्चराज करून स्ट्रेचमार्क्सची काळजी घेण्यास फायदेशीर ठरते. तसंच हे लावल्याने तुमच्या त्वचेला कोणत्याही प्रकारची हानी पोहचत नाही. स्ट्रेच मार्क्ससाठी हे घरगुती उपचार करून पहा.
फायदे
तोटे
काहीही नाही
मध आपल्या त्वचेसाठी किती उपयुक्त आहे हे सर्वांनाच माहीत आहे. त्वचेची काळजी घेण्यासाठी बऱ्याचदा मधाचा उपयोग करा असंही सांगण्यात येतं. तर कॉफीचा पिण्याशिवाय आपल्या त्वचेसाठीही तितकाच चांगला उपयोग करून घेता येतो हेदेखील तुम्हाला माहीत असेल. या क्रिममध्ये सेल्युलाईट कमी करण्यासारखे घटक असल्याने स्ट्रेच मार्क्स घालविण्यासाठी याचा उपयोग होतो असा कंपनीचा दावा आहे. यामध्ये तुमची त्वचा मॉईस्चराईज करण्यासाठी आणि हायड्रेटेड ठेवण्यासाठी नारळाचे तेल, शिया बटर, सनफ्लॉवर तेल याचा समावेश करून घेण्यात आला आहे. त्यामुळे त्वचेला योग्य पोषण मिळते आणि स्ट्रेचमार्क्स लवकरात लवकर घालविण्यासाठीही याची मदत होते असे सांगण्यात आले आहे. तसंच मधामध्ये नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्स असतात जे त्वचा अधिक चमकदार बनविण्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे या क्रिमचा तुम्ही उपयोग करून घेऊ शकता. ही मलई वापरा किंवा गरम मेणबत्ती मेणाचा मसाज थेरपी वापरुन पहा.
फायदे
तोटे
काहीही नाही
तुमच्या त्वचेवर अनेक प्रकारचे स्कार्स अर्थात व्रण असतील तर तुमच्यासाठी हे उपयुक्त क्रिम आहे. स्ट्रेचमार्क्स, सर्जरी झालेले व्रण, सी - सेक्शनमुळे आलेला व्रण, कोणत्याही प्रकारे त्वचेला कट गेला असेल अर्थात कापल्यामुळे झालेला एखादा व्रण असेल तर या क्रिममुळे तुम्हाला हा व्रण घालवता येतो. तसंच यामध्ये त्वचेला उपयुक्त असणारे असे नैसर्गिक घटक वापण्यात आल्यामुळे त्वचेला कोणत्याही प्रकारे हानी पोहचत नाही आणि हे तुम्हाला सर्व प्रकारच्या त्वचेसाठीही वापरण्यात येते. यामुळे तुम्हाला कोणताही त्रास होत नाही असा दावा कंपनीने केला आहे.
फायदे
तोटे
काहीही नाही
उच्च दर्जाचे घटक अर्थात कोको बटर, शिया बटर, विटामिन ई, मोरिंगा आणि सेंटेला एशियाटिकासह अव्हॅकॅडोचा समावेश या क्रिममध्ये करण्यात आला आहे. हे स्ट्रेचमार्क्स केवळ कमी करत नाही तर पुढे येणारे स्ट्रेचमार्क्स थांबविण्यासाठीही उपयुक्त ठरते. यात असणारे रेड्युक्ससेल अँटिस्ट्रेचमार्क्स मसाज ऑईलमध्ये बिटा केरोटिन आणि इसेन्शियल तेलाचा समावेश आहे जो त्वचेला पोषण मिळवून देण्यास आणि स्ट्रेचमार्क्स दूर करण्यास फायदेशीर ठरतो. तसंच त्वचा अधिक ताणली न जाऊन नवे स्ट्रेचमार्क्स येऊ न देण्यासाठीही याचा उपयोग होतो असे सांगण्यात आले आहे. या अँटी-बॅक्टेरियाची हात काळजी क्रीम वापरुन ताणून गुणांना प्रतिबंध करा.
फायदे
तोटे
गरोदर असणाऱ्या महिलांसाठी हे उत्पादन अतिशय चांगले असून खरंतर त्यांच्यासाठीच हे बनविण्यात येत असल्याचे कंपनीने सांगितले आहे. त्यामुळे गरोदर महिला हे उत्पादन वापरू शकतात. मामा मिओद्वारे बनविण्यात आलेले हे टमी रब बटर तुमच्या त्वचेवरील ताणली गेलेली त्वचा सुधारण्यास मदत करते आणि त्याप्रमाणे यामध्ये घटक समाविष्ट करण्यात आले आहेत असे कंपनीद्वारे सांगण्यात आले आहे. तसंच याचा उपयोग तुम्ही गरोदरपणाच्या काळापासून करावा म्हणजे त्याचा अचूक परिणाम दिसून येईल. तुमच्या पोटावरील स्ट्रेचमार्क वाढू देत नाही.
फायदे
तोटे
काहीही नाही
वनस्पतीजन्य घटकांवर हे क्रिम बनविण्यात आल्याचे कंपनीद्वारे सांगण्यात आले आहे. यामुळे तुमची त्वचा अधिक हायड्रेट राहते आणि त्वचेवर ताण येऊन स्ट्रेचमार्क्स येत नाहीत. तसंच गरोदरपणाच्या काळात तुम्ही याचा उपयोग करून घेऊ शकता आणि स्ट्रेचमार्क दूर करण्यासाठी याचा उपयोग होतो. तुमची त्वचा अधिक मऊ आणि मुलायम ठेवण्यासाठी या क्रिमचा उपयोग होतो.
फायदे
तोटे
काहीही नाही
घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा