ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
दीपिका पादुकोण गोव्याला रवाना, या आगामी चित्रपटाचं शूटिंग होणार सुरू

दीपिका पादुकोण गोव्याला रवाना, या आगामी चित्रपटाचं शूटिंग होणार सुरू

लॉकडाऊनमुळे जवळजवळ सहा महिने चित्रपटांच्या चित्रीकरणाचे काम अर्धवट राहिलं होतं.  आता अनलॉकनंतर अनेक चित्रपटांचे शूटिंग पुन्हा सुरू झालं आहे. दीपिका पादुकोणच्या अनेक चित्रपटांची चर्चा गेले वर्षभर सुरू असून प्रेक्षक या चित्रपटांची आतूरतेने वाट पाहत आहेत. आता चाहत्यांसाठी एक खुषखबर आहे की, दीपिका लवकरच तिच्या नव्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी गोव्याला रवाना होणार आहे. कारण शकुन बत्राच्या आगामी चित्रपटाचं शूटिंग गोव्यात सुरू होणार आहे. ज्यासाठी  दीपिका 11 सप्टेबरला म्हणजे उद्या गोव्याला जाणार आहे. दीपिका तिच्या कामाबाबत अतिशय जबाबदार आणि प्रोफेशनल आहे. म्हणूनच गोव्याला जाण्यापूर्वी तिला तिची मुंबईतील उर्वरित कामं पूर्ण करायची आहेत. शिवाय दीपिकाला  घरातच राहून तिच्या या आगामी चित्रपटातील भूमिकेची तयारीही पूर्ण करायची आहे. यासाठी लॉकडाऊनमध्ये तिने यासाठी काही ऑनलाईन योगा क्लासमध्ये  सहभागही घेतला होता.  या चित्रपटात दीपिकासोबत अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडेही असणार आहेत. 

कोणत्या चित्रपटासाठी दीपिका गोव्याला रवाना

शकुन बत्राच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या ‘या’ चित्रपटाची चर्चा गेले काही महिने सुरू आहे. मात्र अजूनही निर्मात्यांनी या चित्रपटाची अधिकृत घोषणा केलेली नाही. ज्यामुळे या चित्रपटाचे नाव कळू शकले नाही. एवढंच नाही तर या चित्रपटाविषयी सर्वच बातम्या अतिशय गुप्तपणे ठेवल्या जात आहेत. सहाजिकच या चित्रपटात दीपिका, अनन्या आणि सिद्धांतची काय भूमिका असेल, त्यांचा लुक या चित्रपटात कसा असेल, चित्रपटाचे कथानक कसे  असेल अशा कोणत्याच गोष्टी जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. मात्र दीपिकाची गोव्याला जाण्याची लगबग पाहता चित्रपटाचं शूटिंग लवकरच सुरू होणार हे मात्र नक्की झालं आहे. त्यामुळे शूटिंग सुरू झाल्यावर या चित्रपटाविषयी असलेली सर्व गुपितं उघड होतीलच.

हा चित्रपट कधी होणार प्रदर्शित

खरं तर या चित्रपटाचं शूटिंग या वर्षीच्या  सुरूवाीलाच सुरू होणार होतं. यासाठीच मार्चमध्ये दीपिका, अनन्या, सिद्धांत आणि शकुन बत्रा श्रीलंकाला गेले होते. मात्र अचानक कोरोना व्हायरसचे संकट समोर आलं आणि शूटिंग बंद करावं लागलं आणि कलाकारांना लोकेशनवर जाण्यास बंदी घालण्यात आली. त्यानंतर देशभरात झालेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच कामांचा वेग  मंदावला होता. सध्या भारताबाहेर जाऊन शूटींग करणं वाटतं तितकं सोपं नक्कीच नाही. यासाठी निर्मात्यांनी गोव्यात समुद्रकिनारी या चित्रपटाचं शूटिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीच चित्रपटाची टीम मुंबईहून गोव्याला रवाना होणार आहे. 11 सप्टेंबरला जरी ही टीम गोव्यात दाखल झाली तरी शूटिंग सुरू करण्यासाठी काही कालावधी जाणार आहे. कारण त्याआधी या टीमला मिळून चित्रपटाची तयारी आणि व्यवस्था राखावी लागणार आहे. त्यामुळे चित्रपटाचे शूटिंग कधी पूर्ण होणार आणि चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे गुलदस्त्यात ठेवण्यात आलेलं आहे. मात्र या बातमीमुळे दीपिकाचे आगामी चित्रपट मार्गी लागतील आणि लवकरच प्रेक्षकांना दीपिकाला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी मिळेल हे मात्र नक्की.

ADVERTISEMENT

 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

अंकिता लोखंडे करत आहे सुशांतची स्वप्नं पूर्ण, उचलले पहिले पाऊल

ADVERTISEMENT

संजय लीला भन्सालीच्या आगामी चित्रपटात पार्थ समथान साकारणार मुख्य भूमिका

Love is in the air: चारू आणि राजीव पुन्हा एकत्र, प्रेमाच्या वर्षावाचे व्हिडिओ व्हायरल

09 Sep 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT