ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
घरी असलेल्या वेगवेगळ्या नेलपेंटपासून तयार करा या सोप्या डिझाईन्स

घरी असलेल्या वेगवेगळ्या नेलपेंटपासून तयार करा या सोप्या डिझाईन्स

नेलपेंटसचे कितीही शेड घरात आणले तरी ते कमीच असतात. पण या नेलपेंट शेड्समधीलही काही शेड्स या आपल्या इतक्या आवडीच्या असतात की, आपण सगळ्याच नेलपेंट वापरतोच असे नाही. तुमच्याही नेलपेंट कलेक्शनमध्ये अशा काही नेलपेंट असतील.ज्यांना तुम्ही कधीही ढुंकूनही पाहिले नसेल. पण अशाच न वापरलेल्या आणि पडून राहिलेल्या नेलपेंट्सचा  नेमका कसा वापर करायचा त्यापासून घरच्या घरीच सोप्या डिझाईन्स कशा बनवायच्या हे आज आपण जाणून घेऊया. करुया सुरुवात

मुलायम आणि कोमल पायांसाठी झटपट घरगुती उपाय (Foot Care Tips In Marathi)

सगळ्यात आधी पूर्वतयारी

तुम्हाला सगळ्यात आधी करायची आहे ती म्हणजे पूर्वतयारी. तुमच्याकडे असलेल्या सगळ्या नेलपेंटच्या शेड्स सगळ्यात आधी बाहेर काढा. कारण त्याशिवाय तुम्हाला नेमक्या कोणत्या शेड्स वापरायच्या ते कळणार नाही. त्यामुळे तुमच्याकडे असलेल्या सगळ्या शेड्स बाहेर काढा. त्यामुळे तुम्हाला कोणत्या नेलपेंट्स खराब झाल्या ते देखील कळेल. शिवाय रंगसंगतीनुसार त्याचा वापर कसा करायचा हे देखील कळेल. 

दोन रंगाचा असा करा उपयोग

दोन रंगाचा उपयोग

ADVERTISEMENT

Instagram

 दोन रंगाचा उपयोग करुन तुम्हाला नेलपेंटपासून सुंदर डिझाईन अगदी आरामात करता येऊ शकते.  नेलपेंट्सच्या दोन शेड्सचा एकत्र केलेला प्रयोग हा चांगला दिसतो. तुम्हाल आवडेल असे कोणतेही रंग निवडा. नखांना छान आवडीचा आकार देऊन तुम्ही त्याला डिझाईन देऊ शकता. जर तुम्हाला खूप काही डिझाईनिंग आवडत नसेल तर तुम्ही एका रंगाच्या ब्रशने नखांवर एक एक कोट नखांच्या अर्ध्यावर लावा. असे दुसऱ्या रंगाच्या बाबतीतही तुम्हाला करायचे असे. तुम्ही पुन्हा एकदा नखांचा कोट लावू शकता. त्यामुळे तुमची नेलपेंट अधिक उठून दिसेल. जर तुमच्याकडे टॉप कोट नावाचा प्रकार असेल तर तुम्ही तो देखील लावू शकता.  पोल्का डॉट किंवा तुम्ही तुम्हाला आवडेल ती डिझाईनही काढू शकता.

उदा. तुमच्याकडे नेलपेंटच्या निऑन शेड्स असतील तर त्यासोबत एखादा मॅट रंग, ग्लॉसीसोबत मॅट असे कॉमबिनेशनही तुम्ही करु शकता. 

घरच्या घरी करा आकर्षक (Nail Art Design Ideas In Marathi)

ADVERTISEMENT

मल्टीकलर नेल्स

मल्टीकलर नेल्स

Instagram


जर तुम्हाला खूप काही करायचं नसेल आणि सगळ्या नेलपेंट्सच्या रंगाचा वापर करायचा असेल तर तुम्ही एकाचवेळी वेगवेगळ्या रंगाचा उपयोग करु शकता. मल्टीकलर नेल्स ही खूप जणांना आवडणारी स्टाईल आहे. तुमच्याकडे असलेल्या वेगवेगळ्या रंगाचा उपयोग या स्टाईलमुळे एकाचवेळी करता येऊ शकतो. त्यामुळे ही स्टाईल नक्कीच ट्राय करायला हवी.

उदा. तुमच्याकडे असलेल्या वेगवेगळ्या रंगाचा वापर केल्यामुळे हा रंग खूप छान उठून दिसतो. तुम्ही ही स्टाईल नक्की करुन पाहायला हवी.

ADVERTISEMENT

नेलपेंट टिप्स

नेलपेंट टिप्स

Instagram

जर तुम्हाला खूप नेलपेंटस लावायला आवडत नसतील तर तुमच्या वाढलेल्या नखांसाठी नेलपेंट टिप्स हा प्रकार खूपच चांगला आहे. काऱण तो खूप छान दिसतो. नेलपेंट टिप्स करताना तुम्ही तुमच्याकडे असलेला बेस कोट लावा किंवा कोणत्याही रंगाची  नेलपेंट तुम्ही लावू शकता. यामध्ये तुम्हाला तुमच्या टिपला तुम्हाला फक्त वेगळ्या रंगाची नेलपेंट लावायची आहे. म्हणजे ज्या पद्धतीने फ्रेंच मेनिक्युअरला लावतात तशी हा प्रकारही  छान शोभून दिसतो 

 

ADVERTISEMENT

आता तुमच्याकडे असलेल्या नेलपेंटस तुम्ही अशापद्धतीने नक्की ट्राय करु शकता.

सतत नेलपेंट लावल्यामुळे नखांना होऊ शकतात हे त्रास

20 Sep 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT