आई होण्याचा प्रवास नक्की असतो कसा

आई होण्याचा प्रवास नक्की असतो कसा

प्रत्येक स्त्री ही आई होण्यासाठी आसुसलेली असते. आई होणं म्हणजे नक्की काय हे आपल्या सर्वांना वेगळ्या शब्दात आणि भावनांमध्ये मांडता येणं शक्य नसतं. पण काही जण ही भावना नक्कीच मांडू शकतात. असाच आपल्या आई होण्याचा प्रवास मांडला आहे, नम्रता दीपक साधवानी, सोशल मीडिया इनफ्लुएन्सर आणि चंद्रमा देशमुखने...जॉन्सन बेबीसह मातृत्वाचा प्रवास आनंदी आणि सौम्य कसा झाला याबद्दल या आई झालेल्या महिलांनी आपला अनुभव शेअर केला आहे. 

नम्रता दीपक साधवानी, सोशल मीडिया इनफ्लुएन्सर

आईपणाचा प्रवास माझ्यासाठी असंख्य अमीट गोडीच्या आठवणींनी भरलेला आहे. हा अनुभव खूप काही देणारा आहे आणि मला खात्री आहे, की बाकीच्या मातांनाही माझ्यासारखंच वाटत असणार. माझ्या लहानग्याच्या जन्मापासून आतापर्यंत केवळ त्याचाच नाही, तर माझाही खूप विकास झाला आहे. 

आतापर्यंत दोन मुलांची आई म्हणून झालेल्या या प्रवासात त्यांना लहानशीसुद्धा अडचण येऊ नये यासाठी मी सर्व ते प्रयत्न केले. माझ्या या शिकण्याच्या प्रवासात लॉकडाउननं नवी भर घातली. आयुष्याच्या या टप्प्यासाठी आपल्यापैकी कोणीच सज्ज नव्हतं. या टप्प्याशी जुळवून घ्यायला वेळ लागला खरा, पण माझ्या मुलांनी खूप चांगल्या पद्धतीनं सध्याच्या परिस्थितीशी जुळवून घेतलं. बाहेरचा सगळा खेळ त्यांनी घरातच खेळायला सुरुवात केली. हे सुरुवातीला आव्हानात्मक होतं खरं, पण याच काळात आमच्यात आतापर्यंत कधी न अनुभवलेलं असं घट्ट नातं तयार झालं. झालंच, तर फक्त घरातच राहाताना प्रत्येक कानाकोपऱ्याची नव्याने ओळख झाली. 

तान्ह्या बाळाच्या पोषणासाठी कोविड काळातही करावे स्तनपात, फायदे

मला त्यांच्या वाढीचा काळ अजूनही अगदी चांगला लक्षात आहे आणि मी सगळ्या मातांना, विशेषतः या लॉकडाउनच्या काळात ज्या पहिल्यांदाच आई झाल्या आहेत, त्यांना आपल्या तान्हुल्याची काळजी घेताना आत्मविश्वासपूर्ण राहाण्यासाठी प्रोत्साहन देऊ इच्छिते. नव्या मातांना हळूवार स्पर्शाची ताकद माहीत असायला हवी आणि त्यांना आपल्या बाळाच्या त्वचेसाठी योग्य उत्पादनं कोणती हे ओळखता आलं पाहिजे. विशेषतः बदलत्या हवामानामुळे त्यांना खूप काळजी वाटू शकते. 

प्रौढांच्या त्वचेच्या तुलनेत लहान बाळांची त्वचा अतिशय नाजूक आणि संवेदनशील असते. त्यांच्या त्वचेतली आर्द्रता पटकन निघून जाऊ शकते. म्हणूनच कोरडेपणापासून संरक्षण करण्यासाठी मॉइश्चरायझिंग करणं फार आवश्यक आहे. शिवाय, सध्याचा पावसाळ्याचा ऋतू लक्षात घेता, बाळाची त्वचा आर्द्र राहाणं महत्त्वाचं आहे. माझ्या बाळांसाठी

योग्य मॉइश्चरायझर शोधण्यात जरा वेळ गेला. मला त्यांच्या नाजूक त्वचेसाठी सौम्य लोशन हवं होतं. बऱ्याच शोधानंतर मला जॉन्सन बेबी लोशन मिळालं आणि त्यामुळे त्यांच्या त्वचेवर जादूई परिणाम झाला. हे लोशन बाळासाठी खूप छान आहे आणि ते त्वचेला हळूवारपणे नरम ठेवतं. याच्या वापरामुळे त्वचा दिवसभर नरम राहाते. हे बाळाचा चेहरा आणि शरीरावर वापरण्यासाठी पुरेसे सौम्य असल्याचं वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झालेले आहे. विशेष म्हणजे, हे मॉइश्चरायझर सर्व ऋतूंमध्ये वापरता येण्यासारखं असून त्यामुळे त्वचेतील नैसर्गिक आर्द्रता टिकून राहाते. 

बाळाच्या नाजूक केसांसाठीही खास काळजी गरजेची असते. मी माझ्या मुलांसाठी वापरलेला जॉन्सनचा बेबी नो मोअर टियर्स शॅम्पू सर्वोत्तम आहे. हा शॅम्पू बाळाचे केस व नाजूक टाळूची हळूवार स्वच्छता करतोच व ती करताना डोळे लाल होणार नाहीत किंव चुरचुरणार नाहीत याची काळजी घेतो. हा शॅम्पू केस मऊ, चमकदार करतो व त्यासा मंद सुवास प्रसन्न करणारा असतो. महत्त्वाचे म्हणजे, हळूवार काळजी घेणाऱ्या या उत्पादनांमुळे बाळाची काळजी घेण्याचं काम हलकं होतं. 

आईला असेल ताप आणि सर्दी, तर बाळाला स्तनपान करावे का

चंद्रमा देशमुख, कंटेंट हेड - मॉमजंक्शन

आईपण ही पूर्णवेळ आणि सर्वात समाधानकारक जबाबदारी असते. मला आठवतं, माझा मुलगा लहान होता, तेव्हा त्याच्या सुंदर प्रवासाच्या प्रत्येक क्षणानं मला आयुष्यभर पुरणारी शिकवण दिली. कारण, जेव्हा तुम्ही तुमच्या छोट्याशा पिल्लाला हातात घेता, तेव्हा तुमच्यातल्या आईचाही जन्म होत असतो. 

‘त्यांचं हसणं असतं अमूल्य आणि त्यांचं असणं देतं मायेची ऊब’

तुमचं बाळ असतं किती नाजूक, त्याला हवा मखमली स्पर्श’

लॉकडाउनमुळे गोंधळ आणि काळजीत अडकलेल्या सर्व मातांसाठी माझ्या मनात हेच शब्द उमटतात. पूर्ण तयारीनिशी सज्ज आणि शांत राहाण्यातून आपण आपल्या बाळांची काळजी घेऊ शकतो, कारण लहानसहान अडचणींसाठी हॉस्पिटलमध्ये जाणंही सध्या अवघड आहे. 

आई तुला Thanks म्हणायचं राहूनच जातं…

मी काही चांगल्या सवयी सुचवू इच्छिते - 

पावसाळा सुरू असल्यामुळे बाळाला रोज आंघोळ घालणं आवश्यक नाही. एक दिवसाआड आंघोळ घातली तरी चालेल. फक्त पाणी कोमट असेल याची खात्री करा. बाळाचे कपडे काढताना तसं त्याला सांगा. किंबहुना आंघोळ होईपर्यंत त्याबद्दल बाळाशी बोलत राहा म्हणजे, बाळाला सुरक्षित आणि आरामदायी वाटण्यास मदत होईल. माझं बाळ जन्मल्यापासून आतापर्यंत मी त्याच्यासाठी जॉन्सनचा टॉप-टु-टो बाथ वापरत आहे. हे अतिशय सौम्य उत्पादन असून ते बाळाची त्वचा आणि संवेदनशील डोळ्यांची काळजी घेतं. जर बाळ नवजात असेल, तर या सौम्य क्लीन्झरनं कापूस किंवा कापडाचा मऊ तुकडा वापरून त्याचे डोळे पुसता येईल. चेहरा तसेच डोळ्यांच्या कडा, कानाच्या मागची बाजू, मानेवरच्या वळ्या आणि डायपर असं सगळं यानं पुसून हळुवारपणे कोमट पाणी घाला. या सोप्या सपद्धतीनं तुम्ही फार चिंता न करता बाळाची स्वच्छता करू शकता. लवकरच बाळाची आंघोळ तुमचं आवडीचं काम होईल आणि बाळासोबतचं नातं आणखी घट्ट होईल.

बाळांना आईच्या स्पर्शाची तीव्र जाणीव असते. आईचा स्पर्श त्यांना शांत करतो, शिवाय त्यांना सुरक्षिततेची भावनाही देतो. प्रेमळपणे घातलेल्या आंघोळीनंतर झोपवल्यामुळे बाळ शांत होतं आणि तुम्हालाही आराम मिळतो. लक्षात ठेवा, बाळाच दिनक्रम तुमच्यासाठी मजा, मस्ती, हसू आणि प्रेमानं भरलेला हवा आणि तो तसा होण्यासाठी तुम्ही याचा आनंद घेणं गरजेचं आहे. तुमचा विश्वास बसणार नाही, पण बाळालाही हे समजतं. माझ्या आईपणाच्या प्रवासात जॉन्सन बेबीनं कायम आपल्या शांत, प्रेमळ अस्तित्वातून साथ दिली. आजही टॉप-टु-टोची बाथ बॉटल दिसल्यानंतर जुन्या आठवणी जाग्या होतात आणि माझा प्रवास किती आनंददायी आहे याची जाणीव होते. 

बाळाच्या सुदृढ वाढीमध्ये मालिश करणं अतिशय महत्त्वाची प्रक्रिया असते आणि त्यामुळे तुमचं बाळाबरोबरचं नातं आणखी घट्ट होतं. बाळाला सौम्य मालिश करण्यानं त्याची वाढ होते, त्याच्याशी संवाद साधला जातो आणि बरंच काही शिकता येतं. हा मसाज त्यांच्या ज्ञानेंद्रियांच्या विकासासाठी आवश्यक असतो. माझ्या आईकडून शिकलेली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, योग्य प्रकारे तयार केलेलं तेल थोड्या प्रमाणात वापरावं आणि मालिशची प्रक्रिया सहज करण्यासाठी खालून वरच्या बाजूनं मालिश करावं. मी जॉन्सन बेबी तेलाची शिफारस करेन आणि प्रत्येकानं रोज ते आपल्या बाळासाठी वापरावं असा सल्ला देईनं. आणखी एक टिप म्हणजे, मालिश करताना खोलीतलं तापमान ऊबदार असावं, म्हणजे बाळाला थंडी वाजणार नाही. शिवाय, मालिश करताना खूप तेल वापरू नये, विशेषतः त्वचा संवेदनशील असेल किंवा त्यावर पुरळ असल्यास तेल अगदी कमी प्रमाणात वापरावं. 

प्रत्येक आईसाठी माझी शेवटची आणि सगळ्यात आवडती टिप म्हणजे - 

भरभरून आनंद घ्या. अगदी प्रत्येक क्षणाचा. तुमचं छोटंसं पिल्लू पटकन मोठं होईल आणि काही कळायच्या आत भरारी घेण्यासाठी सज्ज होईल. प्रत्येक आंघोळ, प्रत्येक मालिश, डायपर बदलणं... प्रत्येक क्षण पुरेपूर जगा. 

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा