त्वचेची निगा राखण्यासाठी योग्य आणि परिणामकारक स्कीन केअर प्रॉडक्ट वापरणं गरजेचं आहे. जर यासाठी तुम्ही फेशिअल सीरम (Facial Serum) वापरावं की फेशिअल मॉईस्चराईझर (Face Moisturizer) या संभ्रमात अडकला असाल तर ही माहिती तुमच्यासाठी नक्कीच फायद्याची ठरेल. कारण अनेकांना वाटतं या दोन्ही प्रॉडक्टमुळे फक्त त्वचा हाडड्रेटच राहते. होय हे जरी खरं असलं तरी ही दोन्ही स्कीन केअर उत्पादने त्वचेच्या निरनिराळ्या समस्यांचा विचार करून डिझाईन केलेली असतात. त्यामुळे त्याचा परिणामही त्वचेवर निरनिराळा होऊ शकतो. यासाठीच जाणून घ्या फेस सिरम आणि मॉईस्चराईझरविषयी सर्व काही...
सीरम हे वॉटर बेस फॉर्म्युलाने बनवलेलं असतं. त्वचेच्या अनेक समस्या जसं की फाईन लाईन्स,सुरकुत्या, काळेडाग, डलनेस दूर करण्यासाठी सीरम उपयुक्त ठरतं. सीरममधील व्हिटॅमिन्स, अॅंटि ऑक्सिडंट आणि त्वचेचं पोषण करणारे घटक असतात. जे त्वचेत खोलवर जाऊन त्वचेला पोषण देतात. ज्यामुळे तुमच्या त्वचेला पुर्नजीवन मिळू शकतं. जर तुमच्या त्वचेसाठी उपयुक्त ठरेल अशा सीरमचा नियमित वापर केला तर एक ते दोन आठवड्यांमध्ये चांगला परिणाम मिळू शकतो.
सीरम काय करतं:
- पातळ आणि त्वचेसाठी हलकं असते
- त्वचेच्या विशिष्ठ समस्यांसाठी परिणामकारक
- त्वचेत पटकन मुरते
- त्वचेत खोलवर जाते
सीरमचे काय करू शकत नाही:
- त्वचा खोलवर हायड्रेट ठेवणे
- त्वचेवर वॉटरबेस थर निर्माण करणे
- सुर्यकिरणांपासून सुरक्षा करणे
तुम्हाला कोणतं सीरम वापरावं याबाबत काही शंका असतील आम्ही शेअर केलेलं हे सीरम नक्की ट्राय करा
जर तुमच्या त्वचेवर एक्ने असतील तर ते कमी करण्यासाठी तुम्ही या सीरमचा वापर करू शकता. ज्यामुळे तुमची त्वचा पुन्हा पूर्वीसारखी स्वच्छ आणि नितळ दिसेल.
फायदे:
- त्वचेत पटकन मुरते
- एक्ने कमी करण्यासाठी परफेक्ट
- ग्रीन टी आणि अनेक नैसर्गिक घटकांचा वापर
तोटे:
-त्वचेच्या इतर समस्यांसाठी उपयुक्त नाही
जर तुमची त्वचा वातावरणातील धुळ, माती, प्रदूषणामुळे निस्तेज झाली असेल तर त्वचा पुन्हा नीट करण्यासाठी हे सीरम वापरा. यातील व्हिटॅमिन्समुळे तुमची त्वचेला योग्य पोषण मिळेल.
फायदे:
- त्वचेत पटकन मुरते
- चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो
- त्वचा उजळ होते
- त्वचा हायड्रेट राहते
- पॅराबेन फ्री आहे
- वेगन प्रॉडक्ट
तोटे:
- महागडे आहे
हे सिरम खास रात्री वापरण्यासाठी तयार करण्यात आलं आहे. शिवाय ते एक अॅंटि एजिंग प्रॉडक्ट देखील आहे. ज्यामुळे तुमच्या त्वचेतील सैलपणा कमी होतो आणि ती ताणली जाते. हे सीरम त्वचेत खोलवर मुरतं आणि त्वचेला पोषण देतं. ज्यामुळे तुमच्या फाईन लाईन्स, सुरकुत्या अशा एजिंगच्या खुणा कमी होतात. यातील पोषक घटकांमुळे त्वचेला निवांतपणा मिळतो आणि सकाळी तुम्ही अगदी टवटवीत दिसू लागता.
फायदे:
- ऑईल फ्री
- सुंदर आणि आकर्षक पॅकिंग
- त्वचेचे पोअर्स बंद होत नाहीत
- सुंगधित नाही
- पॅराबेन आणि सल्फेट फ्री
- अॅंटि एजिंग
- सर्व प्रकारच्या त्वचेसाठी उपयुक्त
तोटे:
- महागडे आहे
मॉईस्चराईझरमध्ये पाणी आणि नैसर्गिक तेलांचे उत्तम मिश्रण असलेला फॉर्म्युला वापरण्यात येतो. ज्यामुळे तुमच्या त्वचेचा वरचा थर ओलसर आणि मऊ राहतो. जर तुमची त्वचा नॉर्मल, कॉम्बिनेशन अथवा तेलकट असेल तर फक्त दररोज मॉईस्चराईझर लावणं पुरेसं ठरू शकतं. मात्र जर तुमची त्वचा अती कोरडी आणि निस्तेज असेल तर फक्त मॉईस्चराईझरने तुमची त्वचा मऊ राहू शकत नाही.
मॉईस्चराईझर काय करतं:
- त्वचा वरून हाडड्रेट ठेवणे
- त्वचेच्या वरच्या थरावर पोषण देणे
मॉईस्चराईझर काय करू शकत नाही:
- त्वचेत खोलवर मुरून त्वचेचं पोषण करणे
- त्वचेत नैसर्गिक तेल मुरवणे
तुम्हाला कोणतं मॉईस्चराईझर वापरावं याबाबत काही शंका असतील आम्ही शेअर केलेलं हे प्रॉडक्ट नक्की ट्राय करा
दैनंदिन वापरासाठी बॉडी शॉपचे हे कॅरेट क्रीम मॉईस्चराईझर खरंच खूप छान आहे. नैसर्गिक गाजरांचा अर्क असलेल्या या मॉईस्चराईझरचा तुम्ही सकाळी आणि रात्री तुमच्या डेली स्कीन केअर रूटीनमध्ये नक्कीच करू शकता. ज्यामुळे तुमची त्वचा हायड्रेट आणि मऊ राहील
फायदे:
- दैनंदिन वापरासाठी उपयुक्त
- त्वचेला 72 तास हायड्रेट ठेवू शकते
- नैसर्गिक घटकांपासून तयार केलेले आहे
- वेगन आहे
तोटे:
- महागडे आहे
जर तुम्हाला त्वचेला नैसर्गिक पद्धतीने बूस्ट करणाऱ्या मॉईस्चराईजरची गरज असेल तर हे जेल क्रीम तुमच्यासाठी उपयुक्त ठकेल. कारण यामुळे त्वचा स्वच्छ होईल आणि पुन्हा नव्याने चमकू लागेल. यात त्वचेला फ्रेश ठेवणारा, थकवा घालवणारा लाईटवेट फॉम्युला वापरण्यात आला आहे.
फायदे:
- डल आणि कोरड्या त्वचेसाठी परफेक्ट
- उत्साहित करणाऱ्या कामू कामू बेरिजयुक्त
- कोरफडीचा अर्कमुळे फ्रेश वाटते
- त्वचा हायड्रेट ठेवते
तोटे:
- महागडे आहे
मायग्लॅमची अनेक उत्पादने तुमच्या स्कीन केअरसाठी नक्कीच उपयुक्त आहेत. दैनंदिन वापरासाठी तुम्ही हे ग्लो इरिडिसेंट ब्राईटनिंग मॉईस्चराईझर वापरू शकता. ज्यात प्रभावशाली व्हिटॅमिन्ससोबतच अॅंटि ऑक्सिडंट आणि रोझहिप ऑईलचाही वापर करण्यात आलेला आहे.
फायदे:
- डल त्वचेला पोषण मिळते
- अॅंटि रिंकल आणि ब्राईटनिंग फॉर्म्युला
- त्चचेला पोषण देते आणि मऊ ठेवते
- त्वचेवर चमक येते
- क्रुअल्टी फ्री
तोटे:
- महागडे आहे
फेस सीरम आणि मॉईस्चराईझरमधला फरक हा त्यात असलेल्या घटकांवरून ठरत असतो. यासाठी जाणून घ्या ही दोन्ही प्रॉडक्ट नेमकी काय काम करतात.
सीरम | मॉईस्चराईझर |
सीरम पातळ, हलकं आणि त्वचेवर लवकर पसरणारं असतं | मॉईस्चराईझर घट्ट असतं |
छोटे कण असतात | जाड आणि मोठे कण असतात |
त्वचेत लवकर मुरते | त्वचेत मुरण्यास वेळ लागतो |
पातळ, कमी चिकट आणि त्वचेवर वंगणासारखे कार्य करणारे घटक असतात | पेट्रोलॅटम, मिनरल ऑईल्ससारखे घटकांमुळे त्वचा ओलसर राहते |
त्वचा मुळापासून स्वच्छ होते | त्वचेला खोलवर स्वच्छ करत नाही |
सैलपणा कमी होऊन त्वचा घट्ट होते | त्वचेचा वरचा थर यामुळे लॉक होतो |
त्वचेच्या समस्या मुळापासून कमी होतात | त्वचेच्या समस्या काहीप्रमाणात कमी होतात |
सुरकुत्या आणि एजिंग मार्क्स कमी करण्यासाठी परफेक्ट | त्वचेला मऊपणा मिळण्यासाठी उपयुक्त |
त्वचेच्या समस्येनुसार बनवलं जातं | त्वचेला हायड्रेट ठेवतं आणि त्वचेच्या वरच्या थराचे पोषण होते. |
जास्त परिणामकारक | कमी परिणाम कारक |
तुमच्या त्वचेला नेमक्या कोणत्या गोष्टींची गरज आहे हे ओळखा. कारण सीरममधील अॅंटि ऑक्सिडंट तुमच्या त्वचेला पुन्हा नवीन जीवन मिळवून देतं तर मॉईस्चराईझर त्वचेचं वरून होणारं नुकसान रोखू शकते. सीरम हे काही विशिष्ठ त्चचा समस्यांसाठी उपयुक्त असतं. सीरमसोबत त्वचेचा मऊपणा कायम राहण्यासाठी तुम्हाला मॉईस्चराईझरही सोबत वापरणं उपयुक्त ठरू शकतं. थोडक्यात सांगायचे झाले तर जर तुम्ही तिशीतील असाल तर भविष्यात होणाऱ्या एजिंगच्या खुणा रोखण्यासाठी अथवा त्वचेचं नुकसान टाळण्यासाठी तुम्ही सीरम वापरणं फायद्याचं ठरेल. यासाठी नियमित सीरमचा वापर करा मात्र हिवाळा अथवा पावसाळ्यात त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासाठी मॉईस्चराईझरचा वापर करणे टाळू नका. सीरम लावल्यावर त्वचेवर मॉईस्चराईझरचा थरही अवश्य द्या. ज्यामुळे त्वचा कायम मऊ आणि मुलायम राहील.
सीरम आणि मॉईस्चराईझरचा योग्य परिणाम साधण्यासाठी ते कधी आणि कसं वापरावं हे प्रत्येकाला माहीत असायला हवं. त्वचेमधील ओलावा कायम टिकवून ठेवण्यासाठी दिवसभरात कमीत कमी दोनदा सीरम लावणं गरजेचं आहे. तुम्ही त्वचा स्वच्छ करून टोनिंग केल्यावर त्यावर सीरम लावू शकता. सकाळी त्वचेला मॉईस्चराईझर अथवा सनस्क्रीन लावण्यापूर्वी आधी फेस सीरम लावा आणि रात्री नाईट क्रीम आणि मॉईस्चराईझरपूर्वी फेस सीरम लावण्यास विसरू नका.
सीरमवर मॉईस्चराईझर लावल्यामुळे सीरम आणि मॉईस्चराईझर दोन्ही तुमच्या त्वचेमध्ये लॉक होईल. अधिक चांगला फायदा होण्यासाठी तुमचं मॉईस्चराईझर फ्रीजमध्ये ठेवून मग ते वापरा. ज्यामुळे त्वचेवर एक प्रकारचा कुलिंग इफेक्ट निर्माण होईल आणि त्वचेत ते खोलवर मुरेल.
फोटोसौजन्य - शटरस्टॉक
अधिक वाचा -
भारतीय त्वचेसाठी सर्वोत्तम कन्सिलर (Best Concealer For Indian Skin)