नवरात्रीसाठी एथनिक लुक करायचा असेल ट्राय तर फॉलो करा काजोलची स्टाईल

नवरात्रीसाठी एथनिक लुक करायचा असेल ट्राय तर फॉलो करा काजोलची स्टाईल

ऑक्टोबर सुरू झाला की वेध लागतात ते नवरात्रीचे. देशभरात नवरात्री आणि दुर्गापूजा अतिशय उत्साहात साजरी करण्यात येते. वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या स्वरूपात देवीची पूजा करण्यात येते. नवरात्रीचे नऊ दिवस हे महिलांसाठी पर्वणीच असते. वेगवेगळे एथनिक लुक या दिवसात करता येतात. साडी असो वा कुरती असो वा सूट असो. हे नऊ दिवस महिलांना वेगवेगळ्या रंगाचे कपडे घालून पूजेला जायला मजा येते. नवरात्रीच्या प्रत्येक दिवसासाठी एक रंग असतो. त्यामुळे बऱ्याच महिला हे रंग फॉलो करत असतात. पण कधी कधी नक्की कसा एथनिक लुक करायचा असाही प्रश्न पडतो. तर तुम्ही यावेळी काजोलसारखा एथनिक लुक करून तुमची नवरात्र अधिक फॅशनेबल करू शकता. काजोल ही नेहमीच आपल्या स्टाईलसाठी जाणली जाते. विशेषतः साड्या आणि एथनिक लुकसाठी. त्यामुळे या नवरात्रीला तुम्ही करा काजोलची स्टाईल फॉलो आणि दिसा अधिक सुंदर आणि आकर्षक. काजोल सोशल मीडियावर नेहमीच आपल्या एथनिक लुकमधील स्टाईलने सर्वांना भारावून सोडते. इतकंच नाही तर काजोल नेहमी ब्राईट अर्थात गडद रंगाच्या कपड्यांवर वेगवेगळे प्रयोगही करत असते. त्यामुळे तुम्हाला तिची स्टाईल फॉलो करणं नक्कीच सोपे जाईल. पाहूया काजोलची स्टाईल.

साधा पण आकर्षक साडी लुक

प्रत्येक वेळी साडी नेसल्यावर भरजरी दागिने घालायची गरज आहेच असं अजिबात नाही हे काजोलच्या या साडीवरून नक्कीच कळून येतं. काजोलने नेसलेली ही साडी अत्यंत हलकी असून त्याचा रंग तितकाच आकर्षक आहे. कोणतीही पूजा असो वा कोणताही कार्यक्रम असो अशा तऱ्हेची साडी नक्कीच सर्वांचे लक्ष वेधून घेते. मुळात ही साडी इतकी सुंदर आहे की, त्यावर कोणत्याही मोठमोठ्या दागिन्यांची गरज नाही. काजोलसारखा असा स्लिव्हलेस ब्लाऊज अथवा तुम्हाला हवा असेल तर तुमच्या आवडीचा ब्लाऊज शिऊन तुम्ही हा लुक नवरात्रीसाठी नक्की ट्राय करू शकता. तुम्ही असा लुक तुमच्या ऑफिसमध्येही कॅरी करू शकता. यावर अगदी हलकासा मेकअप तुम्हाला अधिक सुंदर बनवेल.

बॅकलेस ब्लाऊज विथ साडी लुक

काजोल नेहमीच अतिशय सुंदररित्या साडीचा लुक कॅरी करते. तुम्हाला या नवरात्रीसाठी अथवा दुर्गापूजेसाठी काही वेगळा साडीचा लुक करायचा असेल तर काजोलप्रमाणे असा बॅकलेस ब्लाऊज तुम्ही नक्की ट्राय करू शकता. पारंपरिकता आणि आधुनिकता याचा परफेक्ट मेळ तुम्ही घालू शकता. काजोलने नेसलेली ही साडी भरजरी असली तरीही ती जास्त जड असावी असं वाटत नाही. तसंच यावर तुम्हाला जास्त दागिने घालायचीही गरज नाही. अशी साडी नेसून मोठे कानातले घातले आणि हलकासा मेकअप केल्यास, तुमचे काम झाले. तुम्ही पूजेसाठी एकदम तयार. तसंच तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यासह छोटीशी टिकली लाऊन तुमचा पारंपरिक लुक पूर्ण करू शकता.

नवरात्रीसाठी मुंबईत कुठे करता येईल मनसोक्त शॉपिंग

ब्राईट पिवळा रंग दिसतो अधिक आकर्षक

काजोलने मागच्या वर्षी दुर्गा पूजेला अशी पिवळ्या रंगाची ब्राईट साडी नेसली होती. अतिशय सुंदर साडी असून अगदी साधा ब्लाऊज आणि पारंपरिक लुक काजोलने केला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही केसांचा अंबाडा घालून यावर गजरादेखील माळू शकता. यामुळे तुमच्या लुकमध्ये अधिक सुंदरता दिसून येईल. केवळ नेकलेस, बांगडी आणि टिकली यावरच काजोलने हा लुक पूर्ण केला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही या साडीवर कानात टॉप्स घालू शकता. मात्र मोठे कानातले यावर उठून दिसणार नाहीत.

साडीचे नव्या ट्रेंडमधील 5 प्रकार - कशी नेसावी साडी

K3G लुक

हा लुक पाहून तुम्हाला नक्कीच करण जोहरचा काजोलने केलेला कभी खुशी कभी गम हा चित्रपट आठवला असेल ना? तशाच स्वरूपाचा लुक काजोलने केला आहे. तुम्हीही अशी हेव्ही साडी नवरात्रीमध्ये अथवा दसऱ्याच्या दिवशी नेसू शकता. यावर भारंभार दागिने घालण्यापेक्षा केवळ एक चोकर घालून तुम्ही या साडीचा लुक पूर्ण करू शकता. हा लुक तुम्हाला अधिक उठून दिसण्यासाठी तुम्ही त्यावर हलकासा मेकअप करावा. 

Navratri साठी खास 20 Outfit Ideas

हलकी साडी

आजकाल पूजा अथवा कार्यक्रमांमध्ये कोणालाही हेव्ही साड्या नको असतात. त्यामुळे तुम्ही काजोलने नेसलेली अशी फ्लोरल हलकी साडी नेसून वेगळा लुक करू शकता. आजकाल फ्लोअर साड्यांचा ट्रेंड आला आहे. तसंच मुळात या साड्या नेसायला आणि कॅरी करायला अतिशय हलक्या असल्याने पूजेमध्ये इथे तिथे काम करण्यासाठीही सोयीस्कर ठरते. काजोलचा हा लुक तुम्ही जशाच्या तसा कॅरी करू शकता. अथवा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यात काही बदलही करून घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला MyGlamm चे मेकअप उत्पादन अधिक उपयोगी ठरतील. तुम्ही वापरू शकता 9 in 1 पॅलेट. 

 

Beauty

Manish Malhotra 9 in 1 Eyeshadow Palette - Enchanté

INR 1,850 AT MyGlamm

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक