ADVERTISEMENT
home / Fitness
आहारात असेल सोयाबीन चंक्स  तर होईल फायदाच फायदा

आहारात असेल सोयाबीन चंक्स तर होईल फायदाच फायदा

शाकाहारी लोकांसाठी मासांहाराचा आनंद म्हणजे ‘सोयाबीन चंक्स’ सोयाबीनच्या बियांपासून तेल काढल्यानंतर उरलेला चोथा अर्थात सोयाबीन चंक्स हा देखील आरोग्यासाठी फारच फायदेशीर आहे. एखाद्या खाद्यपदार्थाची चव वाढवण्यासाठीच नाही तर तुम्हाला वेगवेगळे फायदे मिळवून देण्यासाठी तुम्ही आहारात सोयाबीन चंक्सचा वापर करायला हवा. जाणून घेऊया सोयाबीन चंक्सचे फायदे आणि ते खाण्यासाठी योग्य रेसिपी

जाणून घ्या, सप्टेंबरमध्ये जन्म झालेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये

सोयाबीन खाण्याचे फायदे

सोयाबीन

Instagram

  • सोयाबीन हा प्रोटीनचा भंडार आहे. जर तुम्ही चिकन, अंडी, मासे किंवा दूध पित नसाल तर तुम्ही अगदी हमखास तुमच्या आहारात सोयाबीन समाविष्ट करायला हवे. 
  • सोयाबीन चंक्समध्ये omega 3 आणि फॅटी अॅसिड असते ज्यामुळे तुमचे कोलस्ट्रॉल नियंत्रणात राहते. 
  • सोयाबीन चंक्समध्ये फायबरचे प्रमाण अधिक असल्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते. शिवाय डाएबिटीसशी लढते. 
  • यामध्ये असलेले मॅग्नेशीअम इन्सोमनियाची भीती कमी करते. 
  • फायबर तुमच्या शरीरातून मल बाहेर काढण्यास मदत करते. त्यामुळे सोयाबीन चंक्सच्या सेवनामुळे  पोट साफ होण्यास मदत मिळते. तुमच्या पोटाचे आरोग्य सुधारते. 
  • महिलांसाठी सोयाबीन चंक्स फारच फायदेशीर आहे. मेनोपॉझनंतर येणाऱ्या अडचणींसाठीही सोयाबीन हे फारच चांगले आहे. 
  • थायरॉईडचा त्रास असणाऱ्यांसाठीही सोयाबीन आणि त्याचा तेल फारच फायदेशीर आहे. सोयाबीनच्या सेवनामुळे थायरॉडईड नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. 
  • हाडांच्या वाढीसाठीही सोयाबीन चंक्स रेसिपी (soya chunks recipe in marathi) फारच फायदेशीर आहे. 
  • त्वचा, केसांची वाढ यासाठीही सोयाबीन फारच चांगले आहे. सोयाबीनमध्ये असलेले प्रोटीन तुमच्या केसांवर आणि त्वचेवर आवश्यक असलेली चमक आणतात. 

उंची वाढण्यासाठी आहारात समावेश करा या खाद्यपदार्थांचा

ADVERTISEMENT

असे करा सोयाबीनचे सेवन

असे करा सोयाबीनचे सेवन

Instagram

सोयाबीनचे वेगवेगळ्या पद्धतीने सेवन करता येते. सोयाबीनची भाजी, भजी किंवा भात असा कशातही त्याचा वापर करता येतो. 

  1. सोयाबीनची भाजी ही पोळी आणि भात दोघांसोबतही खाता येते. ही भाजी कांदा, टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये करता येते. ही भाजी चवीला छान लागते. ही भाजी कोरडी केली तरी चांगली लागते.  इतर कोणत्याही भाजीत बटाटा घालण्याऐवजी जर तुम्ही सोयाबीन घातले तर ते देखील चांगले लागू शकतात.
  2. खूप जणांना ही भाजी खायला आवडत नाही. त्यामुळे अनेकजण त्याची भजी किंवा कबाब करुन खातात. जर तुम्हाला कबाब आवडत असतील. तर तुम्ही एका मिक्सीमध्ये उकडलेले सोयाबीन चंक्स, कच्चा कांदा, मीठ, आवडीचे मसाले घालून कोरडेच वाटून घ्या. त्यामध्ये आवश्यकतेनुसार बेसन किंवा तांदूळाचे पीठ घालून एकत्र करुन त्याचे कबाब तळून घ्या. तेही चवीला छान लागतात.
  3.  सोयाबीनचा भात तुम्ही कधी खाल्ला आहे का? तोही चवीला छान लागतो. अगदी बिर्याणी किंवा पुलाव करताना तुम्ही त्यामध्ये सोयाबीन चंक्स घाला तुमच्या भाताला नक्कीच एक वेगळी चव येते. 

आता आहारात सोयाबीनचा नक्कीच वापर करा आणि मिळवा फायदेच फायदे

गरम पदार्थ खाताना तोंड भाजलं तर करा हे घरगुती उपचार

ADVERTISEMENT
01 Sep 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT