बीटपासून तयार करा या लज्जतदार आणि पौष्टिक रेसिपीज

बीटपासून तयार करा या लज्जतदार आणि पौष्टिक रेसिपीज

लालबुंद बीट चवीला फार स्वादिष्ट नसले तरी ते आहारात असणे फार गरजेचे आहे. बीटाचे फायदे लक्षात घेत तुम्ही आहारात त्याचा समावेश करण्याचा विचार करत असाल तर फक्त सँडवीज, कोशिंबीर करुनच बीटाचे सेवन केले जात नाही. तर तुम्ही काही हटके आणि पौष्टिक रेसिपी करुनही त्याचा आहारात समावेश करु शकता. आज आम्ही तुमच्यासोबत बीटापासून तयार होणाऱ्या अशाच काही हटके रेसिपी शेअर करणार आहोत. चला करुया सुरुवात

रोजच्या स्वयंपाकासाठी अर्ध्या तासात तयार होतील असे झटपट पदार्थ

बीटरुट डोसा

Instagram

बीटपासून डोसा तयार करता येऊ शकतो हे फार कमीच लोकांना माहीत असेल. डाएट करणाऱ्यांसाठी हा पदार्थ एकदम परफेक्ट आहे. शिवाय ज्यांना बीट खायचे असेल किंवा खाऊ घालायचे असेल तरी देखील तुम्ही ही रेसिपी करु शकता. 


साहित्य: डोसा बॅटर, बीटाची प्युरी, मीठ, कोथिंबीर 

कृती :

  • डोसा बॅटरमध्ये बीटची प्युरी, कोथिंबीर घालून मिश्रण एकजीव करुन घ्या. त्यामध्ये चवीनुसार मीठ घाला. 
  • बीटाची प्युरी करताना त्यामध्ये फार पाणी घालू नका.  बीट उकडून तुम्ही त्याची प्युरी केली तरी चालू शकेल. कारण त्यामुळे बीट गोड लागते. 
  • एक डोसा पॅन गरम  करुन त्यामध्ये पाण्याचा हबका मारा. तयार डोसा बॅटर तव्यावर पसरवून झाकण ठेवून एका बाजूने चांगले शिजवून घ्या. आवडत असेल तर तेल किंवा तूप घाला. 
  • एक बाजू चांगली क्रिस्पी झाली की तुम्ही झाकण काढून डोसा उलथवून घ्या. चटणी आणि सांभारसोबत सर्व्ह करा. 

तोंडाची चव बदलतील या 5 चटकदार रेसिपी,नक्की करुन पाहा

बीटरुट रोल

Instagram

फ्रँकी किंवा शोरमा अनेकांना खायला खूप आवडतात. शोरमा हा चिकनचा असतो.त्यामध्ये चिकन पचावे म्हणून अनेक भाज्या घातल्या जातात. त्यामध्ये बीटरुटही अगदी हमखास घातले जाते. तुम्हाला बीटाचा उपयोग करुन चमचमीत फ्रँकी किंवा शोरमा बनवायचा असेल तर तुम्ही फक्त बीटापासूनही मस्त चमचमीत रोल तयार करु शकता. 

साहित्य: 1 किसलेले बीट, 2 उकडलेले बटाटे, मीठ, आमचूर पावडर, चाट मसाला, काळे मीठ,  कणीक किंवा शोरमाची रोटी 

कृती : 

  • एका मोठ्या भांड्यात एक किससेलं बीट आणि उकडलेले बटाटे एकत्र करा. त्यामध्ये मीठ, आमचूर पावडर, चाट मसाला, काळे मीठ असे साहित्य एकत्र करुन त्याचा एक चांगला गोळा तयार करुन घ्या. त्याच्या पॅटी किंवा कबाबसारखे रोल तयार करुन ते शॅलो फ्राय करुन घ्या. 
  • कणकेची पोळी लाटून ती शेकून घ्या किंवा शोरमा  रोटी घेऊन ती शेकून घ्या. त्याला केचअप किंवा आवडीचे मेयो लावून. तयार पॅटी आणि सॅलेड घालून त्याचा रोल करुन घ्या.  हे रोल मस्त गरम गरम सर्व्ह करा.

बेकरीसारखा लुसलुशीत लादीपाव करा घरीच,परफेक्ट रेसिपी

बीटरुट मोमोज

Instagram

मोमोज हा पदार्थ आहे जो अनेकांच्या आवडीचा आहे. पण यामध्येही तुम्ही बीटचा वापर कव्हर आणि सारणासाठी करु शकता. 

साहित्य: बीटाची प्युरी, किसलेला बीट, मोमोजचे सारण आणि स्टिमर मशीन 

कृती: 

  • मोमोसाठी मैदची किंवा गव्हाची पारी बनवणार असाल तर ही पारी बनवताना त्यामध्ये पाण्याऐवजी त्यामध्ये बीटरुटची प्युरी घाला. पिठाला छान गुलाबी रंग येईल. 
  • मोमोजच्या भाजीमध्ये तुम्ही थोडे किसलेले बीट घालून मोमोज प्रमाणे तयार करु शकता. त्याला स्टीम किंवा फ्राय करुन त्याचा आनंद घेऊ शकता. 


आता बीटपासून तुम्ही तयार करु शकता या मस्त आणि पौष्टिक रेसिपी