जागतिक ह्रदय दिनानिमित्त करा या खास रेसिपीज,वाढवा ह्रदयाचे आरोग्य

जागतिक ह्रदय दिनानिमित्त करा या खास रेसिपीज,वाढवा ह्रदयाचे आरोग्य

सुदढ आणि निरोगी हृदय ही आज काळाची गरज झाली आहे. कारण चुकीची जीवनशैली आणि अयोग्य आहार यामुळे अनेकांना आजकाल ह्रदयाच्या समस्या जाणवतात. ह्रदय निरोगी असेल तरच जीवनात खरा आनंद आहे. यासाठीच आपण आपल्या ह्रदयाची खास योग्य वेळीच काळजी घ्यायला हवी. यंदाच्‍या जागतिक हृदय दिनानिमित्त जाणून घ्या आरोग्यदायी ह्रदयासाठी काय काय करायला हवं.नियमितपणे व्‍यायाम व  हृदयाच्‍या आरोग्‍याची तपासणी ह्रदयाची काळजी घेण्यासाठी अतिशय गरजेचं आहे. पण त्यासोबतच तुम्‍ही हृदयाचे आरोग्‍य उत्तम राखणारा संतुलित आहारदेखील घ्यायला हवा. आरोग्‍यदायी आहाराचा आहारात समावेश केल्यामुळे हृदयविषयक आजाराचा धोका कमी होऊ शकतो. 

यासंदर्भात शेफ सब्‍यासाची गोराय यांच्‍या काही स्वादिष्ट रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करत आहोत. ज्याच्यामुळे तुमचे ह्रदय राहील निरोगी आणि आनंदी

एनर्जी बॉल्‍स -

साहित्‍य - 

 • २ कप अक्रोड, कोटिंगसाठी १/४ कप अक्रोड 
 • १ कप ओट्स 
 • १/२ कप बिया काढलेले खजूर (जवळपास ७ खजूर)
 • ३ चमचे मॅपल सिरप 
 • २ चमचे व्‍हॅनिला 
 • १/४ चमचा मीठ

कृती -

 • २ कप अक्रोड, ओट्स, खजूर, मॅपल सिरप, व्‍हॅनिला व मीठ एकत्र करा. मऊशार होईपर्यंत चांगल्‍याप्रकारे मिश्रण तयार करा. १ ते २ मिनिटांपर्यंत पीठाचा मोठा गोळा तयार करा.
 • उर्वरित १/४ कप अक्रोड त्‍यामध्‍ये टाका व प्‍लेटवर गोळा ठेवा. 
 • पीठाच्‍या गोळ्यापासून १६ लहान गोळे बनवा आणि प्रत्‍येक गोळ्याला अक्रोडचा लेप द्या. एनर्जी बॉल्‍सना फ्रिजमध्‍ये एका आठवड्यासाठी किंवा फ्रीजरमध्‍ये तीन महिन्‍यांसाठी हवाबंद डब्‍यामध्‍ये ठेवा.

स्‍वीट पोटॅटो अॅवोकॅडो टोस्‍ट्स

साहित्‍य - 

 • २ रताळी 
 • २ बारीक कापलेले अॅवोकॅडो 
 • १/२ कप तुकडे केलेले अक्रोड 
 • १ ते १/२ चमचा लाल मिरचीचा फ्लेक्‍स, गरज असल्‍यास अधिक 
 • ४ चमचे एक्स्ट्रा-व्हर्जिन ऑलिव्ह तेल
 • ३/४ चमचे फ्लॅकी मीठ

कृती -

 • प्रत्‍येक रताळ्याची लांबीनुसार एक बाजू सोलून सपाट करा. हा भाग पाया असेल, ज्‍यामुळे रताळ्याचे सहजपणे टोस्‍ट स्‍लाइस करता येतील. रताळ्याचा सपाट भाग खाली ठेवत प्रत्‍येक रताळ्याला १/४ इंच जाडीमध्‍ये कापा. 
 • टोस्‍टर तयारीसाठी रताळ्यांचे तुकडे टोस्‍टरमध्ये ठेवा आणि लालसर होईपर्यंत टोस्‍ट करा. टोस्‍टरनुसार या प्रक्रियेमध्‍ये काही वेळ लागू शकतो. 
 • ओव्‍हन तयारीसाठी ओव्‍हनला १८० अंश सेल्सिअपर्यंत अगोदरच गरम करा. बेकिंग शीटवर रताळ्याचे तुकडे ठेवा आणि कूकिंग स्‍प्रे मारा. जोपर्यंत काट्यासह सहजपणे छेदन करता येत नाही तोपर्यंत ६ ते ७ मिनिटे रताळ्याचे तुकडे भाजून घ्‍या.

 • टोस्टिंग झाल्‍यानंतर रताळ्यांचे टोस्‍ट्स प्‍लेट्सवर काढून घ्‍या आणि तुकडे केलेले अॅवाकॅडोसह डिश सजवा. काट्याच्‍या साह्याने अॅवाकॅडो सौम्‍यपणे मॅश करा. त्‍यावर तुकडे केलेले अक्रोड, लाल मिरची फ्लेक्‍स टाका आणि ऑलिव्‍ह तेल शिंपडा. त्‍यावर फ्लेकी मीठ टाका. 

अक्रोड आणि हर्ब्‍ससह रोस्‍टेट व्हेजीटेबल्‍स

साहित्‍य -

 • १/२ लाल भोपळी मिरची, लहान १ इंच तुकड्यांमध्‍ये कापलेली 
 • १/२ केशरी भोपळी मिरची, लहान १ इंच तुकड्यांमध्‍ये कापलेली
 • १/४ लाल कांदा, मध्यम १ इंच तुकड्यामध्‍ये कापलेला व वेगळा 
 • १२० ग्रॅम मशरूम, लहान व अर्धे 
 • १ चमचा एक्स्ट्रा-व्हर्जिन ऑलिव्ह तेल
 • १/४ चमचा मीठ
 • ३/४ कप मटर
 • १ झुकिनी, लहान, चिरलेली १/४-इंच जाड
 • १ समर स्क्वॅश, पिवळा, लहान, कापलेला १/४-इंच जाड
 • २ लवंग लसूण, किसलेले
 • २ चमचे बाल्सेमिक व्हिनेगर
 • २ चमचे ताजी तुळस, कापलेली
 • १/२ कप कॅलिफोर्निया अक्रोड, चिरलेले 

कृती -

 • ओव्‍हन २०० अंश सेल्सिअसपर्यंत अगोदरच गरम करा. एका मोठ्या भांड्यामध्‍ये भोपळी मिरच्‍या, कांदा व मशरूम्‍स घ्‍या आणि त्‍यामध्‍ये ऑलिव्‍ह तेल व मीठ टाका. एका मोठ्या बेकिंग शीटवर पातळ थर घ्‍या, भाज्‍या अधिक प्रमाणात नसणार याची काळजी घ्‍या. १० मिनिटे शिजवा. 
 • मटर, झुकिनी, पिवळे स्‍क्‍वॅश व लसूण टाकून सौम्‍यपणे ढवळून घ्‍या. त्‍यामध्‍ये अक्रोड टाका आणि ५ ते १० मिनिटांपर्यंत किंवा सर्व भाज्‍या शिजेपर्यंत व अक्रोड चांगल्‍याप्रकारे शिजेपर्यंत शिजवून घ्‍या. 
 • बाल्‍सेमिक शिंपडा आणि योग्यरित्‍या मिश्रण ढवळा आणि त्‍यावर तुळस पसरवा.