लेटेस्ट निऑन आयमेकअप लुकसाठी हिना खानकडून घेता येईल प्रेरणा

लेटेस्ट निऑन आयमेकअप लुकसाठी हिना खानकडून घेता येईल प्रेरणा

टीव्हीमधील प्रसिद्ध आणि आता बॉलीवूडमध्ये आपले पाय रोवत असलेली अभिनेत्री हिना खान आपल्या स्टायलिंगसाठीही प्रसिद्ध आहे. हिना खानचे लाखो चाहते आहेत. त्यामुळे हिना खानची प्रत्येक स्टाईलही फॉलो केली जाते. हिना खान नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते आणि आपली स्टाईल आणि वेगवेगळा मेकअपही ती पोस्ट करत असते. हिनाच्या फोटोंना लाखो लाईक्सही मिळतात. हिना नेहमी वेगवेगळे मेकअपही ट्राय करत असते. नुकताच तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक मेकअप शेअर केला होता आणि हा मेकअप लुक बऱ्याच चाहत्यांनाही आवडला होता. लेटेस्ट निऑन मेकअप लुक हिनाने केला होता. तुम्हालाही असा मेकअप करायचा असेल तर तुम्हीही सहजपणे हा मेकअप करू शकता.

ट्रेंडिंग आहे निऑन आयमेकअप

View this post on Instagram

Hello Monday!

A post shared by HK (@realhinakhan) on

Beauty

Manish Malhotra 4 in 1 Eyeshadow Palette - Paparazzi

INR 1,250 AT MyGlamm

हिना खानचा हा आयमेकअप भलताच ट्रेंडिंग झाला आहे. हिना खानने निऑन आयमेकअप केला असून तिचा हा लुक अनेक जणांना भावला आहे. हिनाचा हा निऑन आयमेकअप करण्यासाठी जास्त वेळ लागेल का असा प्रश्न जर तुम्हाला सतावत असेल तर असे अजिबात नाही. हा मेकअप तुम्ही अगदी सहजपणाने घरच्या घरी आणि पटकन करू शकता. तुम्ही हिना खानचा हा ट्रेंडिंग निऑन मेकअप (Trending Neon Makeup) करून पाहायचे ठरवले तर आमच्या काही Myglamm च्या मेकअपचाही तुम्ही वापर करून घेऊ शकता. 

फक्त लिपस्टिक नाही तर ‘हे’ 5 Lip Balm करतील तुमच्या ओठांना अधिक आकर्षक

कसा आहे हिनाचा निऑन मेकअप

Beauty

Butterlicious Liquid Matte Lipstick - High Voltage

INR 895 AT MyGlamm

हिना खानने केलेल्या निऑन मेकअपमध्ये आयलिड्सवर निऑन पिंक शेडचा वापर केला आहे. तसंच तिने लोअर लॅशलाईनवरदेखील गुलाबी आयशॅडोचा वापर केला आहे. आपला लुक अधिक साधा पण तरीही स्टायलिश बनविण्यासाठी हिना खानने निऑन यलो (पिवळ्या) रंगाच्या आयशॅडोचा वापर केला आहे. तसंच तिने डोळ्यांच्या कॉर्नरलाही याच रंगाच्या आयशॅडोचा वापर करत आपले सौंदर्य अधिक खुलून दिसेल याची काळजी घेतली आहे. आय मेकअपसह हिनाने सटल आणि नैसर्गिक मेकअप केला असल्यामुळे अगदी डोळ्यात भरत नाही तर डोळ्याला तजेला निर्माण करून देतो. तसंच तिने आयब्रो फिलरने भरले असून नैसर्गिकरित्या दिसतील अशा तऱ्हेने स्टाईल केले आहेत. हिनाने गालावर हलकासा ब्लशर लावला असून न्यूड लिपस्टिकचा वापर करून आपला मेकअप पूर्ण केला आहे. त्यामुळे तुम्हीही असा मेकअप फॉलो करू शकता. 

लिक्विड लिपस्टिक लावताना होतोय त्रास, तर जाणून घ्या योग्य पद्धत

हिना खान यावर्षी ठरली आहे ‘मोस्ट डिझायरेबल वूमन’

View this post on Instagram

Hello Monday 🌺

A post shared by HK (@realhinakhan) on

काही दिवसांपूर्वीच हिना खानचे नाव ‘मोस्ट डिझायरेबल वूमन’ च्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आले आहे. गेल्या दोन वर्षांपासून हिना खानच्या करिअरला वेगळंच वळण लागलं आहे. हिना खानच्या आयुष्यात अजून एक मानाचा तुरा खोवला गेला. हिना खानने सौंदर्याच्या बाबतीत मात दिली आहे ती म्हणजे चक्क कतरिना कैफला. हिना खानला Third Sexiest Asian Woman of 2019 घोषित करण्यात आलं होतं. युकेमधील एका वृत्तपत्राने जगातील 50 सेक्सिएस्ट एशियन वूमन घोषित केल्या असून यामध्ये हिनाने तिसरा क्रमांक पटकावला आहे. तर पहिला क्रमांक पटकावला आहे आलिया भटने. मागच्या वर्षी दीपिका पादुकोण पहिल्या क्रमांकावर होती तर यावर्षी दीपिकाला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागणार आहे. तर कतरिना कैफच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी अशी होती की, कतरिना यावेळी सहाव्या क्रमांकावर घसरली. 

हिना खानने सौंदर्याच्या बाबतीत दिली कतरिना कैफला मात

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक