डेली स्किन केअर रुटिनमध्ये असं क्रमाक्रमाने लावा त्वचेवर स्किन प्रॉडक्ट | POPxo

स्किन केअर प्रॉडक्ट त्वचेवर लावण्याचा योग्य क्रम आणि पद्धत

स्किन केअर प्रॉडक्ट त्वचेवर लावण्याचा योग्य क्रम आणि पद्धत

स्किन केअर प्रॉडक्ट कधी आणि कसं लावावं याबाबत सर्व माहिती तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. कारण स्किन केअर प्रॉडक्ट योग्य पद्धतीने आणि योग्य क्रमाने लावली तरच त्याचा हवा तसा फायदा मिळू शकतो. योग्य पद्धतीने आणि क्रमानुसार लावण्यामुळेच कोणतंही ब्युटी प्रॉडक्ट त्वचेत व्यवस्थित मुरू शकतं. जर स्किन केअर प्रॉडक्ट योग्य क्रमाने लावली नाहीत तर त्यांचा चांगला फायदा नक्कीच मिळत नाही. यासाठी जाणून घ्या ती लावण्याचा योग्य क्रम आणि पद्धत.

सकाळच्या डेली केअर स्किन रूटीनमध्ये असा असावा क्रम -

सुर्यप्रकाश, धुळ, माती आणि प्रदूषणापासून संरक्षण मिळवण्यासाठी त्वचेची सकाळी अशी काळजी घ्या.

स्टेप 1 - क्लिंझरने चेहरा स्वच्छ करा

सकाळी उठल्याबरोबर तोंड स्वच्छ धुणं खूप गरजेचं आहे. यासाठी थोड्या कोमट आणि साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. यासाठी तुम्ही एखाद्या सौम्य क्लिंझरचा वापर करू शकता. यासाठी तळहातावर थोडं क्लिंझर घ्या आणि चेहरा आणि मान स्वच्छ धुवा.

Shutterstock
Shutterstock

स्टेप 2 - त्वचेवर टोनर लावा

बऱ्याचदा क्लिझिंग नंतर ही स्टेप अक्षरशः स्किप केली जाते. मात्र त्वचेची निगा राखण्यासाठी त्वचेला चांगलं टोनर लावणं खूपच गरजेचं आहे. ज्यामुळे क्लिझिंगनंतर मोकळी झालेली तुमच्या चेहऱ्यावरचे पोअर्स पुन्हा बंद होतात. नाही तर या ओपन पोअर्समध्ये धुळ,माती, प्रदूषणाचे कण अडकून राहू शकतात. एका कॉटन पॅडवर टोनर घ्या आणि त्वचेवर ते हळूवारपणे डॅब करा.

Beauty

WIPEOUT Germ Killing Body Lotion

INR 219 AT MyGlamm

स्टेप 3 - अॅंटि ऑक्सिडंट सीरमचा वापर करा

सीरम हे त्वचेच्या अनेक समस्यांचा विचार करून तयार करण्यात आलेले असतात. बाजारात विविध समस्यांसाठी सीरम उपलब्ध असतात. मात्र सकाळी वापरण्यासाठी तुमच्या त्वचेची दिवसभराची गरज ओळखून चांगल्या सिरमची निवड करा. ज्यामुळे तुमच्या त्वचेचं योग्य पोषण होईल. सीरमचे काही थेंब ड्रॉपरने चेहऱ्यावर सोडा आणि बोटांनी ते चेहरा आणि मानेवर मसाज करत मुरवा.

Shutterstock
Shutterstock

स्टेप 4 - मॉईस्चराईझरने चेहरा मऊ ठेवा

प्रत्येकाला मॉईस्चराईझरची गरज लागू शकते. मग तुमची त्चचा कोरडी असो वा तेलकट. फक्त आपल्या त्वचेसाठी योग्य मॉइश्चरायझर निवडा. कारण मॉईस्चराईझर तुमच्या त्वचेच्या वरच्या थरावर एक संरक्षक लेअर निर्माण करतं. ज्यामुळे त्वचा वरून कोमल आणि मुलायम राहते. सीरम आणि मॉईस्चराईझरपैकी काय वापरायचं हे तुम्ही तुमच्या त्वचेच्या गरजेनुसार ओळखा. सीरम लावल्यावर मॉईस्चराईझर बोटांच्या मदतीने चेहरा आणि मानेवर लावा आणि हळूवारपणे ते त्वचेत मुरवा.

स्टेप 5 - सनस्क्रीन लावण्यास मुळीच विसरू नका

स्कीन केअर रूटीनमध्ये सनस्क्रीन लावणं अतिशय महत्त्वाचं आहे. मग तु्म्ही सुर्यप्रकाशात जा  अथवा नको. सकाळच्या तुमच्या डेली स्किन केअर रूटीनमध्ये सनस्क्रीनचा समावेश असायलाच हवा. मॉईस्चराईझर त्वचेत मुरल्यावर थोडं सनस्क्रीन हातावर घ्या आणि चेहरा,मान आणि हात त्याने कव्हर करा.

Shutterstock
Shutterstock

स्टेप 6 - लिपबाम लावा आणि दिवसभराच्या कामाला सुरूवात करा

चेहरा, मानेच्या त्वचेपेक्षा तुमच्या ओठांची त्वचा ही खूपच नाजूक आणि मुलायम असते. यासाठीच ओठांची काळजी घेण्यासाठी ओठांवर लिपबाम लावणं खूप आवश्यक आहे. सर्वात शेवटी ओठांवर एखादं चांगलं लिपबाम लावा.

रात्री झोपण्यापूर्वी स्किन केअर रूटीनमध्ये असा असावा क्रम -

सकाळी उठल्यावरर जशी तुमच्या त्वचेची काळजी घेणं महत्त्वाचं आहे तसंच रात्री झोपतानाही क्रमाने स्किन केअर लावणं आवश्यक आहे.

स्टेप 1 - क्लिंझर चेहरा स्वच्छ करा

दिवसभर त्वचेवर जमा झालेली धुळ, माती, प्रदूषण आणि मेकअपचे कण काढून टाकण्यासाठी झोपण्यापूर्वी त्वचा व्यवस्थित स्वच्छ करणं गरजेचं आहे. मेकअप रिमूव्हरने मेकअप काढून टाकल्यावर त्वचा चांगल्या सौम्य क्लिंझरने स्वच्छ करा. ज्यामध्ये क्लिझिंग ऑईलचा समावेश असं एखादं क्लिंझर रात्री चेहऱ्यावर लावा आणि चेहरा स्वच्छ धूवून टाका.

Beauty

WIPEOUT Germ Killing Face Wash

INR 119 AT MyGlamm
Shutterstock
Shutterstock

स्टेप 2 - टोनरचा वापर करा

तुम्ही रात्रीच्या वेळी त्वचेला बूस्ट करण्यासाठी चांगल्या मिस्ट, इसेंशिअल ऑईल अथवा गुलाबपाण्याचा वापर त्वचेला टोन करण्यासाठी करू शकता. कॉटनपॅडवर टोनर घ्या आणि त्वचेवर ते डॅब करा.

स्टेप 3 - आय क्रिम लावा

रात्री झोपताना त्वचेवर आयक्रिम लावण्यास कधीच विसरू नका. कारण यामुळे तुमच्या डोळ्यांखालील काळी वर्तुळं आणि सुरकुत्या कमी होतात. डोळ्यांना चांगला आराम मिळतो आणि सकाळी चेहरा फ्रेश वाटतो. यासाठी अगदी थोडंसं आयक्रिम डोळ्यांच्या खालील भागावर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. 

स्टेप 4 -सीरम लावा

शरीरावरील इतर त्वचेपेक्षा चेहऱ्यावरच्या त्वचेला अधिक आराम आणि निवांत होण्याची गरज असते. कारण एक्ने, सुरकुत्या, डार्क सर्कल्स, फाईन लाईन्स अशा चेहऱ्यावर अनेक खुणा असतात ज्या लवकर कमी होणं गरजेचं असतं. यासाठीच रात्री त्वचेला जास्त आराम मिळेल आणि त्वचेच्या समस्या कमी होतील अशा चांगल्या सीरमची गरज असते. रात्री आयक्रिम लावल्यावर सीरम चेहऱ्यावर लावा आणि मसाज करा.

Shutterstock
Shutterstock

स्टेप 5 - नाईट क्रिम लावा आणि शांत झोपा

रात्रीच्या वेळी लावण्यासाठी खास नाईट क्रिम बाजारात मिळतात. या क्रिम नेहमीपेक्षा जरा जास्त जाड आणि जड असतात. त्या काही तास तुमच्या त्वचेच हळूवार पणे मुरतील अशा पद्धतीने तयार केलेल्या असतात. त्यामुळे सीरम लावल्यावर चेहरा, मान, जंतुनाशक हाताने काळजी घेणारी क्रिम वापरा.

Beauty

WIPEOUT Germ Killing Hand Cream

INR 149 AT MyGlamm

आम्ही दिलेल्या स्टेपनुसार जर तुम्ही सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना त्वचेची निगा राखली तर तुम्ही त्वचा निरोगी आणि चमकदार होईल. 

SHIPPING
We offer free shipping on all orders (Terms & Conditions apply). The orders are usually delivered within 4-6 business days.
REPLACEMENT
Your item is eligible for a free replacement within 15 days of delivery, in an unlikely event of damaged, defective or different/wrong item delivered to you. All the beauty products are non-returnable due to hygiene and personal care nature of the product. Please send an email to  care@popxo.com to have your order replaced.
HELP & ADVICE
For questions regarding any product or your order(s), please mail us at  care@popxo.com and we will get back to you with a resolution within 48 hours. Working Hours: Monday to Friday, from 10 AM to 6 PM.