शरीरातून घाम हा यायलाच हवा ही गोष्ट खरी असली तरीही काखेतून (underarms smell in marathi) घामाचा वास येत राहिल्यास आपल्यालाही सहन होत नाही. आपल्या शरीरातून घाम येणे ही अत्यंत स्वाभाविक प्रक्रिया आहे. शरीराचं तापमान नियंत्रित करण्यासाठी ही उपयुक्त प्रक्रिया आहे. घामाचा वास का येतो हे तर प्रत्येकालाच माहीत आहे. पण त्यावर अनेकदा आपण डिओ अथवा परफ्यूम मारून घामाचा दुर्गंध लपविण्याचा प्रयत्न करत असतो. शरीराला येणारा विशेषतः काखेतील घाम उपाय नक्की काय आहेत हे जाणून घेणं बऱ्याच जणांना महत्त्वाचं वाटतं. काखेत घाम आल्यास त्यावर नैसर्गिक उपायही तुम्हाला करता येतात. या लेखातून सोपे घरगुती उपाय देण्यात आम्ही प्रयत्न करत आहोत. तुम्हालाही काखेत घाम येऊन दुर्गंधी जाणवत असेल तर तुम्ही हे सोपे आणि सहज उपाय नक्कीच करू शकता. काखेत घाम उपाय तसं तर अतिशय सोपे आहेत. सहजपणाने जाता येता तुम्ही हे उपाय करू शकता आणि काखेतील घामाची दुर्गंधी उपाय.
घामामुळे येणारा शरीराचा दुर्गंध (विशेषतः काखेतील घामाचा दुर्गंध) मुख्यत्वे अपोक्राईन ग्रंथीशी जोडलेला आहे. घाम येणे ही प्रक्रिया शरीरासाठी चांगली आहे. मात्र यातून येणारा दुर्गंध हा आपल्या त्वचेमध्ये जीवाणू उत्पन्न करू लागतो. या जीवाणूंमुळेच आपल्या शरीरामध्ये येणाऱ्या घामातून दुर्गंध येतो. प्रत्येक व्यक्तीचा स्वतःचा असा एक गंध असतो जो त्याच्या खाण्यापिण्याच्या आणि स्वास्थ्य आणि लिंगानुसार अवलंबून असतो. काखेत इतर शरीरापेक्षा जास्त घाम येतो. त्यामुळे दुर्गंधीही जास्त येते. सतत हात खाली असल्याने हा घाम तिथेच साचून राहातो. त्यामुळे काही काही वेळाने सतत काखेत येणारा घाम हा टिश्यू पेपरने पुसत राहायला हवा. बॅक्टेरियाद्वारे घामाची क्रिया होताना दोन प्रकारचे अॅसिड असतात एक म्हणजे प्रोपेनोईक अॅसिड आणि दुसरं आयसोवलरिक अॅसिड. याशिवाय घामाच्या ग्रंथीही शरीरामध्ये उपलब्ध असतात. त्यामुळेच घामाचा वास येतो. पण त्यावर अनेक घरगुती उपाय आहेत. ते करून तुम्ही घामाची ही दुर्गंधी घालवू शकता. बगलाचा घाम टाळण्यासाठी आणि अंडरआर्म्स स्वच्छ कसे करावे यासाठी सोपी टिप्स. अशावेळी तुम्ही सॅनिटायझिंग वाईपआऊटही वापरू शकता. तुम्ही Myglamm चे वाईपआऊट नक्की वापरून पाहा.
काखेतील घाम उपाय अनेक आहेत. बगलाचा घाम येणे आणि गडद अंडरआर्म्सपासून मुक्त कसे व्हावे यासाठी सोयीचे सल्ले. नक्की करून पाहा आणि त्याचा परिणामही अत्यंत चांगला होईल याची आम्ही तुम्हाला खात्री देत आहोत.
तुम्ही जर काखेतली घामाच्या दुर्गंधाने त्रस्त असाल तर तुमच्याासाठी उत्तम नैसर्गिक पर्याय आहे. तुम्ही यासाठी अॅप्पल साईड व्हिनेगरची मदत घेऊ शकता. सफरचंदाचे हे व्हिनेगर आम्लीय प्रकृतीचे असते आणि यामध्ये आढळणारे अँटिमायक्रोबायल गुण हे घामाच्या या समस्येपासून सुटका मिळवून देतात. याशिवाय तुम्ही अॅप्पल साईड व्हिनेगरचा नियमित उपयोग करत राहिलात तर दुर्गंधी पसरविणाऱ्या बॅक्टेरियाचा प्रसारही हे कमी करते.
काखेतील घामाची दुर्गंधी नियंत्रित करण्यासाठी तुम्ही बटाट्याचाही उपयोग करून घेऊ शकता. कारण घामावर नियंत्रण ठेवण्यासाठी बटाटा त्वचेवरील पीएच पातळीही नियंत्रित ठेवतो. त्यामुळे बॅक्टेरियाचा प्रसार आणि वृद्धी होत नाही. बटाट्यात हलके आम्ल आणि अँटिमायक्रोबायल गुण आढळतात. त्यामुळे तुम्ही याचा उपयोग करून घेऊ शकता.
त्वचेमध्ये आवश्यकतेपेक्षा अधिक मऊपणा हा जीवाणूंच्या विकासाला फायदेशीर ठरतो. त्यामुळेच घाम येणाऱ्या ठिकाणी बऱ्याचदा पावडर लावली जाते जेणेकरून तो भाग सुका राहावा. अंडरआर्मच्या दुर्गंधीपासून सुटका मिळविण्यासाठी तुम्ही घरगुती उपायामध्ये आयोडिनचाही वापर करू शकता. आयोडिन त्वचेला निर्जलित करण्यासाठी मदत करतो. त्याशिवाय आयोडिनमध्ये अँटिसेप्टिक गुणही असतात.
इप्सॉम मीठ साधारणतः शरीरातील विषारी पदार्थ नष्ट करण्यासाठी फायदेशीर ठरतात. तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून घामाचं प्रमाण यामुळे वाढतं. मात्र यामधील सल्फर हे अँटिबॅक्टेरियलचे काम करते. त्यामुळे घामातून येणारी दुर्गंधी कमी करण्यासाठी याची मदत मिळते. तुम्ही सी सॉल्ट अर्थात सैंधव मीठाचा उपयोग यासाठी करू शकता.
आपले underarms सुके आणि घामापासून मुक्त ठेवायचे असतील तर बेकिंग सोडा हा उत्तम उपाय आहे. बेकिंग सोड्यामध्ये जीवाणूविरोधी गुण असतात जे बॅक्टेरियाशी लढण्यास मदत करतात. बॅक्टेरियामुळेच घामाची दुर्गंधी अधिक येते. अंडरआर्म्सच्या दुर्गंधीपासून नैसर्गिकरित्या सुटका हवी असेल तर हा उत्तम घरगुती उपाय आहे.
यामुळे काखेतील घामाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळते. तुम्ही आठवडाभर सतत हा प्रयोग करा.
अतिशय जास्त अँटिऑक्सिडंट गुण असणाऱ्या कोरफडीचा उपयोग त्वचा आणि सौंदर्यासाठी नेहमीच केला जातो. यामध्ये असणारे औषधीय गुण घामाची दुर्गंधी पसरविणारे जीवाणू नष्ट करण्यासाठी फायदेशीर ठरतात. तसंच शरीराला डिटॉक्स करणारे गुणही कोरफडमध्ये आढळतात. काखेतील दुर्गंधी नियंत्रित करण्यासाठी तुम्ही कोरफडचा उपयोग करून घेऊ शकता.
औषधीय गुण असल्याने लिंबाचा उपयोग विविध समस्यांच्या निवारणासाठी करण्यात येतो आणि त्वचेचे उपचारही केले जातात. लिंबामध्ये अत्याधिक आम्ल असते आणि यामध्ये जीवाणुविरोधी शक्ती अधिक असते. लिंबाच्या रसाचा उपयोग काखेतील घामाची दुर्गंधी कमी करण्यासाठी करता येतो कारण हे त्वचेतील पीएच कमी करून बॅक्टेरिया नियंत्रित करण्यास मदत करते.
लसूण वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटलं असेल. पण तुम्ही नियमित स्वरूपात लसूण खाल्ल्यास तुमच्या शरीरातील घामाची दुर्गंधी कमी होऊ शकते. लसणीमध्ये अँटीमायक्रोबायल आणि अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण उच्च असते. जे घाम पसरविणाऱ्या सर्व बॅक्टेरियांना नष्ट करण्याचे काम करते. तुम्ही रोज लसणीच्या काही पाकळ्यांचे सेवन केल्यास, तुम्हाला याचा फायदा होतो. तुम्हाला कच्ची लसूण आवडत नसेल तर तुम्ही तुमच्या जेवणात याचा उपयोग करून घ्यावा.
लॉरिक अॅसिडचे प्रमाण नारळाच्या तेलात अधिक असते. लॉरिक अॅसिडमध्ये आपल्या शरीरातील बॅक्टेरिया काढून टाकण्यास मदत करते. अशा प्रकारे हे आपल्या त्वचेतून रोग दूर करतात आणि काखेतील दुर्गंधी कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.
नैसर्गिक अँटिसेप्टिक स्वरूपातील टी ट्री ऑईलचा उपयोग तुम्ही त्वचेवरील बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी करून घेऊ शकता. यामुळे काखेतील घामाची दुर्गंधी निघून जाण्यास मदत होते.
काखेतील घाम उपाय करण्यासाठी हे अत्यंत आवश्यक तेल आहे. याची आपल्याला खूपच मदत मिळते. लवेंडर तेल हे बॅक्टेरियाला वाढण्यापासून रोखतात. तसंच शरीरातील घामाची दुर्गंधी कमी करण्यासाठी याचा उपयोग करून घेता येतो.
बॅक्टेरिया मारण्यासाठी कॅस्टर ऑईलचा उपयोग होतो. कॅस्टर ऑईल हे मुळातच अतिशय सॉफ्ट असून काखेतील घामाची दुर्गंधी कमी करण्यासाठी याचा उपयोग करून घेता येतो
नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात घामाचा वास अर्थात दुर्गंध येत असेल तर तुम्हाला मधुमेह अथवा लिव्हर अथवा कोणताही किडनीसंबंधी समस्या तर नाही ना याचीही एकदा परीक्षा करून पाहा. कारण या परिस्थितीत शरीराला घाम जास्त येतो.
तुम्ही त्वचेसाठी कोणताही चांगला अँटिबॅक्टेरियाल अथवा डिओड्रंट साबण वापरू शकता जेणेकरून काखेतील घामाची दुर्गंधी कमी होईल. सायट्रसचं प्रमाण असणारे साबण जास्त चांगले असतात. जे तुम्हाला दुर्गंधीपासून बराच काळ लांब ठेवू शकतात.
वैद्यकिय चाचणीनुसार मधुमेह, थायरॉईड, किडनी अथवा लिव्हर योग्य काम करत नसेल अथवा ट्रिमेथीलामिन्युरिया (trimethylaminuria) असल्यास, घामाची दुर्गंधी अधिक येऊ शकते.
असं फारच कमी प्रमाणात होत असेल. वास्तविक तुमची त्वचा कोरडी असेल तर बॅक्टेरियाचं प्रमाणही कमी होतं आणि त्यामुळे घामही कमी येतो. त्यामुळे त्याचा त्रास होण्याची शक्यता कमीच असते.
हो. काही जणांच्या घामाचा वास हा सेक्शुअली आकर्षित ठरू शकतो. काही जणांच्या गंधाच्या आवडीनुसार हे अवलंबून आहे. घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा. आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा