मास्क लावूनही असा टिकवता येईल मेकअप, मेकअप हॅक्स

मास्क लावूनही असा टिकवता येईल मेकअप, मेकअप हॅक्स

आता कुठे सगळ्या गोष्टी पूर्ववत होऊ लागल्या आहेत. आता अनेक जण घराबाहेर पडून त्यांचे रोजचे आयुष्य जगत आहे. नियम जरी शिथिल होत असले तरी घराबाहेर पडताना मास्क लावणे हे अगदी अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे बाहेर कितीही तयारी करुन आणि छान मेकअप करुन गेल्यानंतर तुम्हाला मास्क हा लावावाच लागतो. पण मास्क लावल्यानंतर येणारा घाम आणि मास्कला चिकटणारा मेकअप यामुळे चेहऱ्यावर इतका मेहनतीने केलेला मेकअप तर जातोच. पण मास्कही अस्वच्छ होतो. तुमच्यासोबतही असे काही होत असेल तर मग आजच्या या मेकअप हॅक्स तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहेत. चला तर मग करुया सुरुवात

केस तुटण्याची कारणे आणि त्यावरील हमखास उपाय

घरच्या घरी करा असा मेकअप जो तुम्हाला देईल प्रोफेशनल लुक (How To Do Makeup At Home In Marathi)

मास्क लावूनही असा टिकवता येईल मेकअप

Instagram

  • जर एखाद्या खास व्यक्तिला बाहेर भेटायला जाणार आहात आणि इतर दिवसांप्रमाणे तुम्हाला अगदी परफेक्टच बाहेर जायचं असेल तर तुम्ही मेकअप सुरु करण्याआधी प्राईमरचा उपयोग करा. कोणताही मेकअप टिकवण्यासाठी प्राईमर हे अगदी बेस्ट आहे. चेहरा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर संपूर्ण चेहऱ्याला अगदी हलक्या हाताने प्राईमर लावा. प्राईमर तुमच्या त्वचेचे संरक्षण तर करतेच पण सोबत मेकअप त्वचेला अधिक काळासाठी चिकटून ठेवण्यासही मदत करते. त्यामुळे तुम्ही प्राईमरचा वापर अगदी हमखास करायला हवा. 
  • फाऊंडेशनचा वापर तुम्ही करत असाल तर तुम्ही फाऊंडेशन मास्कला चिकटू नये यासाठी सेटिंग स्प्रेचा उपयोग करा. सेटिंग स्प्रेचा उपयोग केल्यानंतर तुमचा मेकअप तुमच्या चेहऱ्यावर टिकून राहतो. हल्ली मास्कचा प्रयोग अनिवार्य असल्यामुळे तुम्हाला मेकअपवर सेटिंग स्प्रे वापरणेही गरजेचे आहे. 
  • जर तुमच्याकडे सेटिंग स्प्रे नसेल तर तुमच्यासाठी आणखी एक पर्याय म्हणजे ट्रान्सल्युशंट पावडर.अनेक मेकअप आर्टिस्ट तुम्हाला ही पावडर लावण्याचा सल्ला यासाठीच देतात कारण त्यामुळे तुमचा मेकअप अधिक काळासाठी टिकून राहतो. 
  • त्यामुळे संपूर्ण मेकअप झाल्यानंतर चेहऱ्याला ट्रान्सल्युशंट पावडर लावा. जर ती नसेल तर तुम्ही बेबी पावडरचा उपयोग करु शकता. त्यामुळे तुमचा मेकअप मास्कला लागणार नाही आणि तुमचा चेहराही चिकट दिसणार नाही. 
  • सगळ्या मोठी अडचण अनेकांना असते ती म्हणजे लिपस्टिकची. कारण मास्क लावल्यानंतर सगळ्यात जास्त लिपस्टिकच मास्कला लागते. खूप जण इतर मेकअ करत नाही. पण लिपस्टिक अगदी आवर्जून लावतात. त्यामुळे तुम्ही ग्लॉस लावणे टाळा. त्यापेक्षा एखादी मॅट लिपस्टिक निवडा. ती नसेल तर तुम्ही ओठांना कन्सिलर किंवा फाऊंडेशन लावून त्यावर लिपस्टिक लावा.त्यामुळे तुमची लिपस्टिक अधिक टिकते. 
  • जर तुम्हाला इतर कोणताही मेकअप करायचा नसेल अशावेळी केवळ डोळ्यांचा मेकअप करुन तुम्ही सुंदर दिसू शकता. कारण मास्क काढणार नसाल अशावेळी तुमचे डोळे सुंदर दिसणे फारच गरजेचे असते. त्यामुळे वॉटरप्रुफ मेकअपचा उपयोग करुनही तुम्ही फक्त डोळ्यांचा सुंदर मेकअप करु शकता. 

आता मास्क लावणार असाल तर जास्त काळजी करु नका. हे काही मेकअप हॅक्स वापरा तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. 

 ‘या’ लाईफ चेजिंग मेकअप टीप्स तुम्हाला माहित असायलाच हव्या

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Beauty

MyGlamm LIT Liquid Matte Lipstick

INR 395 AT MyGlamm