ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
How To Reduce Redness On Face In Marathi

चेहऱ्यावरील लालिमा (रेडनेस) कमी करण्यासाठी उपाय (How To Reduce Redness On Face In Marathi)

कधी कधी त्वचेवर लाल डाग अर्थात लालिमा (रेडनेस) (redness on face) येतात. सूर्याच्या किरणांमुळे अथवा कोणत्या तरी अलर्जीमुळे हे डाग येत असतात. पण तुम्हाला हा त्रास सतत होत आहे का? असं असेल तर चेहऱ्यावरील लालिमा (रेडनेस) कमी करण्यसाठी आपण घरगुती आणि सोपे उपाय या लेखातून जाणून घेऊया. नक्की चेहऱ्यावर हा लालपणा का येतो आणि नैसर्गिक गोष्टींचा वापर करून आपण हे हटवू शकतो की नाही याची माहिती आपण या लेखातून घेणार आहोत. मुळात त्वचेवर लालपणा अर्थात लालिमा ही कपाळ, नाक, गाल आणि डोळ्यांच्या आसपास दिसून येते. या समस्येकडे दुर्लक्ष न करता यावर वेळेवर उपचार करणं अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा त्वचेसंबंधी अधिक समस्या होऊ शकतात. लवकरात लवकर हा लालपणा दूर करण्यासाठी उपाय करायला हवा. यावर कोणत्याही इतर उपायांपेक्षा घरगुती आणि सोपे उपाय करणे सोयीस्कर आहे. असेच काही उपाय आम्ही तुम्हाला सांगत आहोत. जाणून घ्या काय आहेत हे सोपे उपाय. पण त्याआधी नक्की चेहऱ्यावर लालिमा (रेडनेस) का येते त्याची कारणे जाणून घेणेही तितकेच गरजेचे आहे. 

चेहऱ्यावर लालपणा येण्याची कारणे (Causes Of Redness On Face In Marathi)

चेहऱ्यावर लालपणा येण्याची कारणे

instagram

ADVERTISEMENT

चेहऱ्यावर लालिमा येण्याची समस्या अनेक जणांना असते. ही समस्या सूर्यप्रकाशात जास्त वेळ आल्याने अथवा मेनोपॉज आणि रोसेसिया या कारणांमुळे होते. रोसेसिया ही एक त्वचेसंबंधित स्थिती आहे जी त्वचेमधील रक्तवाहिन्यांना पातळ करून त्वचेमध्ये लालपणा आणते. बऱ्याचदा त्वचेची जळजळ झाल्यानेही त्वचेवर लालपणा दिसून येतो. तर काही जणांना तापमानात बदल झाल्यास, चेहऱ्यावर लालिमा येते. तर काही जणांना दारूचे सेवन जास्त केल्यास हा त्रास होतो. प्रत्येकाच्या त्वचेनुसार याची कारणं आहेत. तर काही जणांना व्यायाम केल्याने आणि काही औषधांनीही ही समस्या सुरू होऊ शकते. विविध कारणांमुळे त्वचेवर रेडनेस येताना दिसून येतो. तसंच अगदी संवेदनशील त्वचा असणाऱ्यांपासून ते कोरडी त्वचा असणाऱ्या सर्वांना ही समस्या उद्धवू शकते. जाणून घेऊया महत्त्वाची कारणे 

  • शुष्क त्वचा 
  • अतिनील किरणे (Sunburn)
  • रोसेसिया (Rosacea)
  • चेहऱ्यावर येणारे पिंपल्स 
  • अलर्जीमुळे डर्मेटायटिस 
  • एक्झिमा (एटोपिक डर्मेटायटिस)

अशी लाल त्वचा लपवणं अशक्य आहे. पण तुम्हाला यापासून घरगुती उपाय करून नक्कीच सुटका मिळू शकते. तुमच्याकडे असणाऱ्या गोष्टीतूनही तुम्ही यावर उपाय करू शकता. जाणून घेऊया काय आहेत सोपे उपाय. त्याचप्रमाणे तुम्ही नियमित MyGlamm च्या वाईपआऊट सॅनिटाईझिंगचाही उपयोग करून घेऊ शकता.

चेहऱ्यावर लालिमा (रेडनेस) कमी करण्यासाठी टिप्स (Tips To Reduce Facial Redness In Marathi)

घरातल्या काही वस्तूंचा वापर करून आपण या समस्येपासून सुटका मिळवू शकतो. त्यासाठी नक्की काय करायचे ते आम्ही तुम्हाला सांगत आहोत. 

ADVERTISEMENT

कोल्ड कंप्रेस (Cold Compress)

कोल्ड कंप्रेस (Cold compress)

Shutterstock

अधिक तापमानामुळे आपल्या त्वचेवर सूज आणि लालपणा येऊ शकतो. अशावेळी कोल्ड कंप्रेसने आपण आपल्या चेहऱ्यावरील लालिमा कमी करण्यासाठी मदत घेऊ शकतो. हा अतिशय सोपा आणि परिमाणकारक उपाय आहे. चेहर्‍यावरील लालसरपणाशिवाय मराठीमध्ये बिकिनी शेव्हिंगबद्दल जाणून घ्या.

  • यासाठी तुम्हाला बर्फाचे पाणी आणि एका कपड्याची गरज लागेल. हा कपडा स्वच्छ असायला हवा. अन्यथा त्याचा उलटा परिणाम होऊ शकतो. 
  • सर्वात पहिल्यांदा कपडा पाण्यात भिजवून पिळून घ्या आणि लालसरपणा असणाऱ्या भागावर 10 मिनिट्स ठेवा 
  • दिवसातून असं दोन वेळा केल्यास, चेहऱ्यावर लालसरपणा निघून जाण्यास मदत मिळते

नारळाचे तेल (Coconut Oil)

नारळाचे तेल (Coconut oil)

ADVERTISEMENT

Shutterstock

नारळाचे तेल तर सगळ्यांच्याच घरात उपलब्ध असते. कधी कधी बॅक्टेरियामुळे त्वचेवर सूज आणि लालसरपणा अर्थात लालिमा येते. यासाठी नारळाचे तेल हा उत्तम पर्याय आहे. यामध्ये लॉरिक अॅसिड आढळते, ज्यामध्ये अँटिफंगल गुण असतात. याशिवाय हे संक्रमणावर योग्य उपचार करते आणि त्यामुळे चेहऱ्यावर लालिमा निघून जाण्यास मदत होते. 

  • रेडनेस घालविण्यासाठी तुम्ही एका चमच्यामध्ये नारळाचे तेल घ्या आणि लालसरपणा असणाऱ्या ठिकाणी बोटांनी अथवा कापसाच्या सहाय्याने लावा 
  • एक तास हे तसंच राहू द्या आणि मग पाण्याने चेहरा धुवा 
  • योग्य परिणामांसाठी दिवसातून दोन वेळा नारळाच्या तेलाचा हा प्रयोग करा 

लवेंडर तेल (Lavender Oil)

लवेंडर तेल (Lavender oil)

Shutterstock

ADVERTISEMENT

काही शोधानुसार, लवेंडर तेलामध्ये अँटिफंगल, अँटीइन्फ्लेमेटरी आणि अँटिमायक्रोबाय घटक असतात, जे बॅक्टेरियल इन्फेक्शनशी लढा देण्यास फायदेशीर ठरतात. तसंच बॅक्टेरियल इन्फेक्शन चेहऱ्यावरील लालिमा आणि सूज येण्यासाठी सर्वात मोठे कारण ठरते. त्यामुळे तुम्ही याचा वापर करू शकता. 

  • एका वाटीमध्ये 4 थेंब लवेंडर तेल घ्या आणि त्यात 2 थेंब ऑलिव्ह ऑईल मिक्स करा
  • कापसाच्या बोळ्याने तुम्ही चेहऱ्यावर ज्या ठिकाणी लालसरपणा दिसत आहे तिथे हे लावा 
  • 10 मिनिट्स तसंच राहू द्या आणि मग चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा 
  • दिवसातून दोन ते तीन वेळा तुम्ही हा प्रयोग केल्यास, चेहऱ्यावरील लालपणा निघून जाण्यास मदत मिळते

पेट्रोलियम जेली (Petroleum Jelly)

चेहऱ्यावर लालिमा पूर्ण तऱ्हेने नाहीशी होण्यासाठी पेट्रोलियम जेली हा उत्तम उपाय आहे. वास्तविक यामध्ये यौगिक असते ज्याला पेट्रोलियम म्हटले जाते. हे त्वचेमध्ये जाऊन त्वचा अधिक चांगली आणि स्वच्छ बनविण्यास फायदेशीर ठरते. पेट्रोलियम जेलीमध्ये अँटिमायक्रोबायल घटक असतात जे संक्रमणाशी दोन हात करून आपल्याला लालसरपणाविरुद्ध लढण्यास मदत करतात. 

  • एक चमचा पेट्रोलियम जेली घ्या आणि सूज आलेल्या अथवा लालसर झालेल्या ठिकाणी लावा 
  • रात्रभर असंच राहू द्या आणि सकाळी उठून चेहरा धुवा 
  • रोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही हा प्रयोग करा. तुमच्या चेहऱ्यावर लालसरपणा दिसणार नाही

दही (Curd)

दही (Curd)

Shutterstock

ADVERTISEMENT

दही वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटलं असेल. पण दही हे एक प्रोबायोटिक पदार्थ आहे. यामुळे तुमची त्वचा बाहेरील प्रदूषणापासून वाचते आणि त्वचेबद्दल संवेदनशीलता नियंत्रित करण्यासाठी याचा उपयोग होतो. त्यामुळे लालसरपणापासून सुटका मिळते. दह्याच्या मदतीने तुम्ही चेहऱ्यावरील लालिमा काढून टाकू शकता. आपण चॉकलेट, रिका आणि नियमित मेणाद्वारे अवांछित केस काढू शकता.

  • दोन चमचे दह्यात एक चमचा लिंबाचा रस मिक्स करून नीट फेटा 
  • चेहऱ्यावर जिथे जिथे लालसरपणा दिसून येत आहे तिथे हे मिश्रण लावा 
  • काही वेळानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा (लिंबाची अलर्जी असल्यास वापरू नका)
  • लवकरात लवकर चेहऱ्यावरील रेडनेसपासून सुटका हवी असेल तर आठवड्यातून दोन वेळा तरी किमान हा उपाय करण्याची आवश्यकता आहे. 

काकडी (Cucumber)

काकडी (Cucumber)

Shutterstock

काकडी हे फायटोकेमिकल्सचा एक चांगला स्रोत आहे. जो चेहऱ्यावरील लालिमा नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ठरतो. इतकंच नाही तर त्वचा स्वच्छ करण्यासह त्वचेवर मुलायमपणा ठेवण्यासाठीही याचा फायदा होतो. चेहऱ्यावरील लालपणा कमी करण्यासाठी याचा उपयोग कसा करायचा जाणून घ्या. 

ADVERTISEMENT
  • एक काकडी कापून ती किसून घ्या 
  • हे तुम्ही चेहऱ्यावरील लालसरपणा असणाऱ्या ठिकाणी लावा 
  • 15 मिनिट्स तसंच ठेवा आणि मग पाण्याने चेहरा धुवा 
  • आठवड्यातून तीन ते चार वेळा हा प्रयोग तुम्ही योग्य परिणामांसाठी करू शकता. यामुळे त्वचा अधिक तजेलदार दिसते

कोरफड जेल (Aloe Vera Gel)

कोरफड जेल (Aloe vera gel)

Shutterstock

कोरफड जेलमध्ये अँटिइन्फ्लेमेटरी गुण आढळतात आणि यामुळे चेहऱ्यावरील लालिमा कमी होण्यास मदत मिळते. तसंच कोणतेही घाव असल्यासदेखील त्यावरील लालिमा कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. कारण हे घाव लवकर भरण्यास मदत करते. 

  • कोरफड पानातून ताजी जेल काढून घ्या 
  • लालिमा असणाऱ्या ठिकाणी ही जेल लावा 
  • रात्रभर तसंच राहू द्या आणि सकाळी उठून चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवा 
  • रेडनेस कमी करण्यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही याचा वापर करू शकता 

मध (Honey)

मध (Honey)

ADVERTISEMENT

Shutterstock

त्वचेसंबंधी समस्या असल्यास, मध हा त्यावरील उत्तम उपाय आहे. वास्तविक मधामुळे घाव आणि लालसरपणा पटकन भरला जातो. त्यामुळे चेहऱ्यावरील सूज आणि लालसरपणा हा त्वरीत कमी करण्यसाठी मधाचा उपयोग होतो. यामध्ये असणारे अँटिऑक्सिडंट्समुळे मदत मिळते.

  • लालिमा घालविण्यासाठी एक चमचा मध घ्या आणि प्रभावित ठिकाणी लावा 
  • दिवसातून तीन ते चार वेळा तुम्ही हा प्रयोग करा. काही वेळ ठेवा आणि मग पाण्याने धुवा

ग्रीन टी (Green Tea)

ग्रीन टी (Green tea)

Shutterstock

ADVERTISEMENT

ग्रीन टी मध्ये बरेचसे अँटिइन्फ्लेमेटरी गुण आढळतात, जे त्वचेवरील सूज आणि लालिमा कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. याचा वापर करणेही अत्यंत सोपे आहे

  • रोज ग्रीन टी बनवा आणि साधारण 40 मिनिट्सपर्यंत फ्रिजमध्ये ठेवा 
  • त्यानंतर एक स्वच्छ कपडा घ्या आणि तो यामध्ये भिजवा 
  • या ग्रीन टीमध्ये भिजलेल्या कपड्याने लालिमा असणाऱ्या ठिकाणी लाऊन हलक्या हाताने मालिश करा 
  • योग्य परिणामासाठी हे रोज करा. लवकरच लालिमा निघून गेलेली दिसेल

हळद (Turmeric)

हळद (Turmeric)

Shutterstock

हळद ही नैसर्गिक अँटिसेप्टिक म्हणून वापरली जाते. त्यामुळे त्वचेसंबंधी कोणत्याही समस्येवर हा उत्तम उपाय आहे. हळद एक हर्बल अँटिइन्फ्लेमेटरी आहे. यामुळे कितीही त्रासदायक लालसरपणा असला तरीही तो कमी करण्यास फायदा मिळतो. तसंच चेहऱ्यावरील लालिमा पूर्ण नष्ट करण्यासाठीही याचा उपयोग होतो. 

ADVERTISEMENT
  • चुटकीभर हळदी पावडरमध्ये 2-3 थेंब नारळाचे तेल मिक्स करा
  • हे तुम्ही लालसरपणा असणाऱ्या भागाला लावा
  • हवं तर तुम्ही पाण्यासह हळद पावडर मिसळूनही उपयोग करून घेऊ शकता 
  • सुकल्यावर थंड पाण्याने धुवा 
  • रोज याचा उपयोग केल्यास तुम्हाला सुटका मिळेल

ओटमील (Oatmeal)

ओटमील (oatmeal)

Shutterstock

कोलायडल ओटमील चेहऱ्यावर दिसणाऱ्या लालिमा काढून टाकण्यासाठी फायदेशीर आहे. कोलायडल ओटमील हा दलियाचे एक स्वरूप आहे. यामुळे केवळ मॉईस्चराईजिंगच होत नाही तर अँटिइन्फ्लेमेटरी गुणामुळे होणाऱ्या जळजळीतूनही सुटका मिळते. 

  • पाण्यामध्ये ओटमील व्यवस्थित मिक्स करून घ्या 
  • लोशनप्रमाणे तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हाताने रगडा 
  • 10 मिनिट्स सुकू द्या आणि नंतर पाण्याने धुवा 
  • तुम्हाला स्वतःला याचा परिणाम त्वरीत दिसून येईल

ADVERTISEMENT

चेहऱ्यावरील लालिमा कमी करण्यासाठी करा हे बदल (Lifestyle Changes To Remove Redness On Face In Marathi)

चेहऱ्यावरील लालिमा (रेडनेस) कमी करण्यासाठी आपल्या जीवनशैलीमध्येही काही बदल करण्याची आवश्यकता आहे. ते बदल नक्की काय आहेत ते जाणून घेऊया. मऊ चमकणार्‍या त्वचेसाठी रासायनिक त्वचेची साल सोलून पहा.

  • तणाव आणि चिंतांपासून दूर राहा
  • आपल्या आहारातून अलर्जीवाले खाद्यपदार्थ काढून टाका. त्याऐवजी अँटीइन्फ्लेमेटरी गुण असणारे अर्थात आलं, अव्हॅकॅडो अशा पदार्थांचे सेवन करा 
  • दिवसातून एक वेळा चेहरा नक्की धुवा. चेहरा धुण्यासाठी कोमट पाण्याचा उपयोग करा 
  • थंडीमध्ये चेहरा चांगला मॉईस्चराईज करत राहा
  • धुम्रपानापासून दूर राहा.  कारण यामुळे रेडनेस अधिक वाढते 
  • घरातून नियमित बाहेर जाताना सनस्क्रिनचा वापर कराच
  • तुमचा चेहरा लाल होत असेल अथवा सुजत असेल तर उष्णतेपासून दूर राहा आणि त्यावर बर्फ लावा 
  • हंगामानुसार कपडे घाला 
  • जंक फूड टाळा आणि आहारात पौष्टिक जेवणाचा समावेश करा 
  • दारू पिणे टाळा 
  • रिलॅक्सेशन टेक्निक पाळण्याचा प्रयत्न करा 

प्रश्नोत्तरे (FAQ’s)

1. टूथपेस्टमुळे लालसरपणा कमी होतो का?

टूथपेस्टमुळे पिंपल्स, रॅशेस अथवा पुरळ हे डिहायड्रेट करता येतात. त्यामुळे चेहऱ्यावरील लालिमा कमी करण्यासाठी फायदे होऊ शकतो. पण तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडून याबाबत सल्ला घेणे जास्त सोयीस्कर ठरेल.

2. चेहऱ्यावरील लालिमा कमी करण्यासाठी कोणते उत्कृष्ट मॉईस्चराईजर आहे?

तुमच्या चेहऱ्यावर लालिमेमुळे डाग आले असतील तर तुम्ही हर्बल फेसवॉशचा उपयोग करून घेऊ शकता. यामुळे सूज कमी करून लालिमा कमी करता येते. तसंच यामध्ये असणारा कोरफडचा अर्क तुम्हाला फायदा मिळवून देतो.

3. लालिमेपासून वाचण्यासाठी चेहऱ्याची कशी काळजी घ्यावी?

पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश करून घ्या. बाहेर जाताना नेहमी सनस्क्रिन लावा आणि उष्णतेपासून दूर राहा. तसंच चेहरा नेहमी मॉईस्चराईज करा आणि दिवसातून किमान एकदा तरी चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे चेहऱ्याची व्यवस्थित काळजी घेतली जाते. तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

11 Sep 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT