ब्रामध्ये कपसाईजची निवड करणे जाते कठीण, मग वाचा

ब्रामध्ये कपसाईजची निवड करणे जाते कठीण, मग वाचा

ब्रा साईज निवडणे हे आजही कित्येक जणांसाठी कठीण असे काम आहे. आपली नेमकी साईज कोणती हे आजही अनेकांना कळत नाही. त्यामुळे ब्रा संदर्भात असणाऱ्या फिटिंगविषयी अनेकांना नेहमीच संशय असतो. गेल्यावेळी मी घेतलेली साईज ही 32 होती पण आता मला ती फारशी फिट बसत नाही. मी चुकीची साईज घेतली का? असा प्रश्न सतत पडत राहतो. कधीतरी विकत घेतलेल्या ब्राची साईज बरोबर असते.पण तरीही ब्रा नीट बसत नाही. यामागे कारण असते ते म्हणजे तुम्ही निवडलेली कपसाईज. तुम्ही चुकीची कपसाईज निवडली तरी देखील तुमच्या ब्राची फिटिंगही चुकू शकते. आता कपसाईज निवडताना नेमकी काय काळजी घ्यावी हे आता पाहुया.

बॅकलेस ड्रेससाठी कोणत्या ब्रा वापराव्या, 5 प्रकार

कपसाईज म्हणजे काय ?

Instagram

आता सगळ्यात आधी कपसाईज म्हणजे काय ते जाणून घेऊया. प्रत्येकाच्या स्तनांचा आकार हा वेगळा असतो. स्तनांना उभारी देण्यासाठी आणि त्यांना झाकण्यासाठी ब्रा चा जो गोलाकार भाग असतो त्याला कपसाईज म्हणतात. तुमच्या ब्राच्या साईजनुसार कपसाईज या बदलत असतात.  त्यामुळे ब्रा निवडीसाठी साईज जितकी महत्वाची असते तितकीच ‘कपसाईज’ ही महत्वाची  असते.  त्यामध्य असलेल्या साईज या A ते D अशा असतात. 

उदा. तुम्ही 32 नंबरची ब्रा घालत असाल आणि तुमच्या स्तनांचा आकार फारच लहान असेल तर तुमच्यासाठी कपसाईज मध्ये A किंवा B असा आकार निवडता येऊ शकतो.

म्हणून व्यायाम करताना तुम्ही घालायला हवी स्पोर्ट्स ब्रा... नाहीतर

कपसाईज निवडण्यासाठी टिप्स

Instagram

  1. कपसाईज ही सर्वस्वी तुमच्या स्तनांवर अवलंबून असते. तुमची ब्राची साईज आणि कपसाईज यामध्ये फरक असू शकतो. ज्यांची चण बारीक आहे पण स्तनांचा आकार मोठा आहे. अशांनी नेहमी त्यांच्या कपसाईजचा विचार करावा. तुम्हाला सगळ्या आकारांच्या ब्रामध्ये लहान ते मोठ्या अशा कपसाईज मिळू शकतात. तुम्ही त्यानुसार त्याची निवड करा. 
  2. जर तुम्ही जाड असाल पण तुमच्या स्तनांचा आकार लहान असेल तर तुम्ही छोटया कपसाईजच्या ब्रा निवडा. कारण जर तुम्ही ब्राचा आकार मोठा म्हणून कपसाईज अंदाजानुसार घेत असाल तर तुमच्या स्तनांकडे हा भाग खूप सैल होईल आणि तुम्हाला हवी असलेली ब्राची फिटिंग मिळू शकणार नाही. 
  3. जर तुम्ही पॅडेड किंवा पुशअप्स प्रकारातील ब्रा घेत असाल तर कपसाईज ही अत्यंत महत्वाची आहे. कारण या ब्राची साईज चुकली तर तुम्ही ब्रा विचित्र दिसू शकते. त्यामुळे यामध्ये कपसाईज निवडताना तुमच्या कप्सचा आकारानुसार त्याची निवड करा. जर तुम्हाला तुमची कपसाईज कळत नसेल तर तुम्ही एक्सपर्टची मदत घ्या. 
  4. जर तुमचे स्तन मोठे असतील तर तुम्ही खूप मोठ्या स्तनांच्या कप्ससाईज असलेल्या ब्रा घेऊ नका. कारण त्यामुळे तुमच्या स्तनांचा आकार अजूनच बेढब दिसेल. त्यामुळे ही काळजी घेणेही गरजेचे आहे. 
  5. ब्राची साईज आणि कपसाईज या दोन्ही गोष्टी परफेक्ट फिटिंगसाठी महत्वाच्या असतात. जर तुम्ही कपसाईजच्या गोंधळात ब्राची साईज चुकवली तरी देखील तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. अशा ब्रा तुम्हाला फिट बसणार नाहीत. 

आता ब्रा खरेदी करत असाल तर तुम्ही तुमच्या कपसाईजचाही विचार करा.त्यामुळे तुम्हाला ब्राची फिटिंग अधिक चांगल्या पद्धतीने कळू शकेल. 

 

स्टिक ऑन ब्रा वापरताय, तर तुम्हाला हे माहीत हवं (Stick-On Bra In Marathi)

त्वचा मऊ मुलायम राहावी असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही Myglamm चे प्रोडक्ट नक्की ट्राय करुन पाहा

Beauty

GLOW IRIDESCENT BRIGHTENING MOISTURISING CREAM

INR 1,595 AT MyGlamm