कोविड - 19 चा प्रादूर्भाव वाढत असल्यामुळे सध्या सर्वांनीच स्वतःची योग्य काळजी घेण्याची गरज आहे. या आजाराने जागतिक पातळीवरील हाहाःकार माजवला आहे. लॉकडाऊन आणि घराबाहेर जाण्यावर मर्यांदा आल्यामुळे शारीरिक हालचाल सध्या कमी झाली आहे. सहाजिकच यामुळे हातपायाची हालचाल कमी होऊन स्नायू जखडले जाण्याची जास्त शक्यता आहे. शिवाय घराबाहेर न जाण्यामुळे सूर्यप्रकाशही शरीराल कमी कमी प्रमाणात मिळतो. ज्यामुळे व्हिटॅमिन डीच्या अभावामुळे होणारे आजार वाढू शकतात. शरीरात पुरेशी ऊर्जा आणि शक्ती नसल्यामुळे थकवा आणि कंटाळा येतो. शरीराची काळजी घेताना हाडांचीही व्यवस्थित निगा राखणं गरजेचं आहे.ज्या गोष्टीकडे आपण नीट लक्ष द्यायला हवं आपण नेहमी तिकडेच दुर्लक्ष करतो. जर हाडांची घनता म्हणजेच बोन डेन्टिसी कमी झाली तर याचे भविष्यात गंभीर परिणाम होऊ शकतात. पुरूष आणि महिलां दोघांनाही या समस्येमुळे त्रास जाणवू शकतो. यासाठीच भविष्य आणि आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी या काळातही घरीच राहून स्वतःच्या हाडांची योग्य काळजी घ्यायला हवी. जाणून घ्या घरात राहून तुम्ही तुमच्या हाडांच्या मजबूतीसाठी काय उपाय करू शकता. हे उपाय मिलेनियम हर्बल केअरचे वैद्यकीय सल्लागार कार्यकारी डॉ दीपेश महेंद्र वाघमारे यांनी सुचवलेले आहेत.
कॅल्शियमच्या चांगल्या स्त्रोतांमध्ये कमी चरबीयुक्त डेअरी उत्पादने, हिरव्या पालेभाज्या आणि कोरडे फळ यांचा समावेश होतो. व्हिटॅमिन डीसाठी तुम्ही तृणधान्य, अंड्यातील पिवळा बलक, मासे आणि दूध यांचा समावेश आहारात करू शकता. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी आपल्या हाडांच्या संरक्षणासाठी गरजेचे आहे. कॅल्शियममुळे हाडांची झीज भरून निघते आणि व्हिटॅमिन डी आपल्या शरीरात कॅल्शियम प्रभावीपणे शोषण्यास मदत करते.
शरीराला पुरेसा व्हिटॅमिन डी मिळविण्यासाठी सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येणं हा एक नैसर्गिक मार्ग आहे सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट बी (यू वी बी) किरणांनी त्वचेच्या पेशींमध्ये कोलेस्ट्रॉल आणि व्हिटॅमिन डी संश्लेषणासाठी ऊर्जा प्रदान करते. पॅन-इंडियाच्या संशोधनानुसार सूर्य प्रकाशात जाण्याची सर्वात योग्य वेळ म्हणजे सकाळी 11 ते 1 आहे. कारण या वेळेत अल्ट्राव्हायोलेट बी (यू वी बी) किरणांची तरंगदैर्ध्य २९०-३२० nm असतो. ज्यामुळे त्वचेला सुर्यप्रकाळातील व्हिटॅमिन डी बनविणे सोपे जाते.
स्नायूंप्रमाणेच व्यायामानेही हाडे मजबूत होतात. चालणे, पायर्या चढणे, वजन उचलणे आणि नृत्य करणे यासारखे व्यायाम करा. कारण निरोगी हाडे मिळवणे म्हणजे पुरेसा व्यायाम करून ताकद वाढवणे आणि वजन कमी करणे. यासाठी दररोज 30 मिनिटांचा व्यायाम करण्याचा प्रयत्न करा. सकाळी लवकर उठून चालल्यावर त्याचे फायदेही मिळू शकतात.
धूम्रपान आणि मद्यपान यामुळे हाडांचे नुकसान होते आणि हाडे कमकुवत होतात. या सवयी नकळत हाडांना रक्तपुरवठा कमी करतात, हाडे तयार करणार्या पेशींचे उत्पादन कमी करतात आणि कॅल्शियम शोषण बिघडवू शकतात. या सवयी टाळून हाडांच्या नुकसान तुम्ही कमी करू शकता. निरोगी शरीरासाठी चांगली जीवनशैली वरदान आहे हे वेळीच ओळखा आणि तिचा अवलंब करा.
हाडांच्या आरोग्यास प्रोत्साहन देण्यासाठी अनेक औषधी वनस्पती आणि फायटो-औषधांचा उल्लेख आयुर्वेदात करण्यात आले आहे. हडजोड, सलाई गुग्गुल, अश्वगंधा आणि बाला यासारख्या औषधी वनस्पती हाडांच्या पेशी होमिओस्टेसिस (ऑस्टिओब्लास्ट आणि ऑस्टिओक्लास्ट) हाडांची घनता (Bone Density) सुधारण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध आहेत. अर्जुन, मेथी, लाखा या औषधी वनस्पती जैव-उपलब्ध कॅल्शियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन सी, म्यूकोपोलिसेकेराइड्स, खनिजे आणि फायटोस्ट्रोजेनचा सेंद्रिय स्रोत म्हणून काम करतात, त्यापैकी सर्व निरोगी हाडांसाठी आवश्यक घटक आहेत. त्यामुळे शक्य असल्यास या औषधांचा या काळात वापर करा.
शरीराची योग्य काळजी घेण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी योग्य जीवनशैलीचा अवलंब करणे खूप गरजेचं आहे.बदलत्या जीवनशैलीमुळे आज अनेकक बदल झाले आहेत ज्याचा परिणाम तुमच्या शरीर, हाडे यांच्यावर होऊ शकतो. यासाठीच या गोष्टी फॉलो करा आणि निरोगी राहण्यासाठी प्रयत्न करा.