आजकाल अनेकांना तरूणपणीच केस पांढरे होण्याची समस्या जाणवते. थोडेच केस पांढरे असतील आणि ते काळे करण्यासाठी कृत्रिम डाय अथवा हेअर कलरचा वापर केला तर हळूहळू सगळेच केस पांढरे होतात असा अनेकांचा अनुभव आहे. यासाठी केस कमी प्रमाणात पांढरे असतील तेव्हाच नैसर्गिक उपाय केसांवर करायला हवेत. ज्यामुळे केस काळे तर होतात शिवाय त्यांचे जास्त नुकसानही होत नाही. मेंदीप्रमाणाच आवळ्यानेही तुम्ही घरगुती हेअर डाय बनवू शकता. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, बी, लोह, फॉफ्सरस, कॅरोटीन असतं. ज्यामुळे तुमचे केस नैसर्गिक पद्धतीने काळे होतात. शिवाय केसांचे आरोग्यही सुधारते.यासाठी ही माहिती अवश्य वाचा
आवळ्याचा वापर करून तुम्ही निरनिराळ्या पद्धतीने केसांसाठी नैसर्गिक डाय तयार करू शकता.
आवळ्यातील पोषक घटकांमुळे केस त्वरीत काळे तर होतातच. शिवाय ते मजबूत आणि घनदाटही होतात. आवळ्यामध्ये फायटो न्युट्रियंट्स, व्हिटॅमिन आणि खनिज पदार्थ असतात. आवळ्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि केसांना योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळते. ज्यामुळे तुमच्या केसांचे आरोग्य सुधारते. आवळ्यामधील या गुणकारी घटकांमुळे तुमच्या केसांच्या वाढीला चालना मिळते. आवळ्यामध्ये कोलीजन असते ज्यामुळे केसांवरील जुन्या पेशी निघून जातात आणि नवीन पेशींची निर्मिती होते. यासाठी आहारामध्ये आवळ्याचा समावेश करा. आवळयापासून तयार करण्यात आलेली लोणची, मोरावळे आणि विविध प्रकार खा. आवळ्याचा चवनप्राश खाण्याने तुमची रोग प्रतिकार शक्तीदेखील वाढते. केस काळे करण्यासाठी आम्ही शेअर केलेले नैसर्गिक डाय तर अवश्य वापरा. मात्र केस कायम काळे राहावेत यासाठी केसांना आवळ्यापासून तयार केलेलं तेल लावा. ज्यामुळे तुमचे केस काळेभोर आणि मजबूत होतील.