केसांसंदर्भात संपूर्ण जगातील महिलांना पडतात हे 10 प्रश्न

केसांसंदर्भात संपूर्ण जगातील महिलांना पडतात हे 10 प्रश्न

‘केस’ हा जागतिक विषय आहे. जगाच्या नकाशाचा विचार करता या टोकापासून ते अगदी त्या शेवटच्या टोकापर्यंत पृथ्वीवरील सगळ्या महिलांना केसांसंदर्भात अनेक तक्रारी असतात. केस सुंदर राहण्याचा या सगळ्याच महिलांचा आटापिटा असतो. त्यामुळे त्यांना पडणारे प्रश्न हे देखील सर्वसाधारणपणे सारखेच असतात. केसांसंदर्भात अशाच काही गोष्टींचा शोध घेतल्यानंतर आम्हाला असे 10 प्रश्न दिसले ते सगळ्या महिलांचे अगदी सर्वसाधारण प्रश्न आहेत. या निवडक प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केला आहे. ज्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल.

जलद गतीने केस कसे वाढवता येतील?

उत्तर:  केसांची वाढ ही प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असते. कोणत्याही तेलाने केसांची वाढ होण्यास मदत होत नाही. तर तेल केवळ तुमच्या स्काल्पला नरीश करण्याचे काम करतात. तुम्ही काय खाता? तुमची लाईफस्टाईल काय यावर तुमच्या केसांची वाढ ही सर्वस्वी अवलंबून असते. केस उत्तम वाढायला हवे असतील तर तुम्ही आहार चौकस ठेवा. केसांची योग्य काळजी घ्या. त्यामुळे केस वाढण्यास मदत होईल. बाकी केसांची वाढ ही प्रत्येक व्यक्तीवरच अवलंबून असते. 

केसगळती कशी थांबवावी?

केसगळतीची समस्या हा समस्त महिलांना सतावणारा विषय. काही जणांना केस गळती कशाला म्हणावी ते कळत नाही. जर तुमचे दिवसाला 100 केस गळत असतील तर त्याला केस गळती असे म्हणून शकत नाही. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार कमजोर झालेले केस हे गळतच असतात.दिवसाला हा आकडा 100 इतका असेल तर फार काळजी करण्याचे कारण नाही. पण जर केसांचा पुंजकाच्या पुंजका गळत असेल तर मात्र तुम्ही त्याची काळजी घेणे गरजेचे आहे. केस गळण्याची अनेक कारणे असतात. हार्मोन्स, असंतुलित आहार, वय अशा बऱ्याच गोष्टी त्यासाठी कारणीभूत असतात. त्यामुळे तुम्ही योग्य कारण जाणून घेऊन त्यावर उपचार करणे गरजेचे असते.

केस का दुंभगतात?

केसांची वाढ उत्तम झाली तरी देखील केस दुभंगण्याची तक्रारही अनेकांची असते. केस का दुभंगतात याला कारण आहेत तुमचे कोरडे केस. केसांचा कोरडेपणा वाढला की केस दुभंगण्याच्या तक्रारी सुरु होतात. केसांवर सतत हिटचा प्रयोग होत असेल तरीदेखील तुमच्या केसांना हा त्रास अगदी हमखास जाणवून लागतो. त्यामुळे याचा प्रयोग केसांवर कमी करा. 

प्रवासादरम्यान तुमचेही केस होतात खराब,मग अशी घ्या काळजी

दुभंगलेल्या केसांची काळजी कशी घ्यावी?

तुमचे केस ठराविक वाढीनंतर सतत दुभंगत असतील तर तुम्ही केस कापत राहा. शिवाय केसांना पोषण मिळण्यासाठी केसांची योग्य काळजी घेत राहा त्यामुळे हा त्रास कमी होईल.

निरोगी केस निरोगीआरोग्याचे लक्षण आहे का?

अर्थात तुमच्या शरीराचा प्रत्येक भाग तुम्ही निरोगी आहात की नाही ते दाखवत असतो. केसगळती सुरु झाली की, तुमच्या शरीरात व्हिटॅमिन्सची कमतरता झाली हे समजावे. शिवाय तुमच्या डाएटमध्ये अशा काही गोष्टी आल्या आहेत ज्याचा प्रभाव तुमच्या केसांवर होत आहे. केसगळती सुरु झाली की,तुमच्या आरोग्याच्या तक्रारी जसे हार्मोन्सबदल असे काही बदलही कारणीभूत असतात.

निरोगी केसांसाठी आहारात काय असायला हवे?

केसांच्या वाढीसाठी व्हिटॅमिन D, B,C  आवश्यक असते. यासाठी तुमच्या आहारात बायोटीन असलेले खाद्यपदार्थ असायला हवेत. उदा. मासे, चिकन, ड्रायफ्रुट्स, रताळे असे काही पदार्थ तुमच्या आहारात असायलाच हवे. याशिवाय तुम्ही सोयाबीन, पालेभाज्या, फळे ही मोठ्याप्रमाणात खायला हवे. आपल्या शरीरात तेलाची निर्मिती होत असते पण हे तेल तुमच्या स्काल्पवर साचले तर केसांची वाढ खुंटते आणि केस गळती सुरु होते. त्यामुळे तुम्ही बर्गर-पिझ्झा किंवा तेलकट पदार्थांचे सेवन फार करायला नको.

केस धुण्याआधी करा हा उपाय, केसांचे गळणे होईल कमी

कोणत्या व्हिटॅमिन्सच्या सेवनाने केसांची योग्य वाढ होऊ शकते?

केसांच्या वाढीसाठी व्हिटॅमिन A, B, C,D आवश्यक असतात. वाढीसोबतच केसांना मुलायम ठेवण्याचे काम ते करतात. हे घटक असलेल्या पदार्थांचे सेवन केसांसाठी अत्यंत फायदेशीर ठरु शकते.

पातळ झालेल्या केसांची वाढ पूर्ववत होते का?

अगदी कोणत्याही वयात तुमच्या केसांची वाढ ही पूर्ववत करता येऊ शकते. वयोमानानुसार केसांची वाढ ही कमी होत असली तर त्यासाठी तुमचा आहार कारणीभूत असतो. काही वयस्क महिलांचे केस हे त्यांच्या म्हातारपणातही अगदी चांगले असतात. केसांच्या समस्येकडे काळजीपूर्वक लक्ष दिले की, तुमचे केस कितीही पातळ झाले तरीही त्यांची वाढ पूर्ववत करता येते.

 

महिलांमध्ये केसगळती जास्त का होते?

महिलांमध्येच नाही तर पुरुषांनाही केसगळतीचा त्रास असतो. कोणत्याही देशांमध्ये पुरुषांचे केस मोठे वाढवण्याची फारशी पद्धत नसल्यामुळे केसगळती ही महिलांप्रमाणे जाणवून येत नसली तर टक्कल पडण्याची अधिक शक्यता पुरुषांमध्येसुद्धा असते. त्यामुळे महिलांमध्ये केसगळती जास्त होते असे ठामपणे सांगता येत नाही. पण पुरुषांच्या तुलनेत महिलांचे शरीर हे वेगळे असते. त्यांच्या शरीरात वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळे बदल होत राहतात.

चांगल्या केसांसाठी आठवड्यातून कितीवेळा केस धुणे गरजेचे असते?

केसांच्या वाढीसोबत केसांची स्वच्छता राखणे हे फार गरजेचे असते. आठवड्यातून दोनदा चांगला शॅम्पू वापरुन तुम्ही केस स्वच्छ धुवा. केस धुतल्यामुळे स्काल्प स्वच्छ होण्यास मदत होते. 


आता केसांसंदर्भात हे 10 प्रश्न तुम्हालाही पडत असतील तर तुम्ही केसांची अशा पद्धतीने घ्या काळजी.

केस गळतीवर वेळीच करा उपचार