सेलिब्रिटीसारखा मेकअप हवा असेल तर वापरा उत्कृष्ट मेकअप उत्पादने

सेलिब्रिटीसारखा मेकअप हवा असेल तर वापरा उत्कृष्ट मेकअप उत्पादने

मेकअप करणं ही एक कला आहे आणि तुमचा आत्मविश्वास सुंदर दिसण्यासह वाढतो. नेहमी आपण मेकअप करतोच. पण आपल्याला कधीतरी नक्कीच मनात येतं की, आपल्या आवडत्या सेलिब्रिटीप्रमाणे मेकअप आपण करावा. पण सेलिब्रिटी वापरत असणारी नक्की उत्पादनं कोणती आहेत? त्याचा शोध घेणं कठीण वाटतं. पण असा सेलिब्रिटीसारखा मेकअप करणं ही काही कठीण गोष्ट नक्कीच नाही. तसंच यासाठी खूप मेकअप उत्पादनांची गरज आहे असंही नाही. योग्य मेकअप उत्पादनं (Must Have Makeup Products) आणि त्याचा योग्य वापर केल्यावर तुम्हाला घरच्या घरीदेखील असा लुक नक्कीच मिळवता येईल. आम्ही तुम्हाला याबाबत अधिक माहिती देत आहोत.

ब्यूटी किटमध्ये नक्की समाविष्ट करून घ्या ही मेकअपची उत्पादने (Must Have Makeup Products List in Marathi)

आम्ही तुम्हाला काही असा मेकअप उत्पादनांच्या बाबतीत सांगणार आहोत, जे तुम्ही तुमच्या मेकअप किटमध्ये समाविष्ट करून सेलिब्रिटीसारखा लुक मिळवू शकता. अशी कोणती उत्पादनं आहेत ते पाहूया - 

MyGlamm

9 इन 1 आयशॅडो पॅलेट (MANISH MALHOTRA 9 IN 1 EYESHADOW PALETTE)

Beauty

Manish Malhotra 9 in 1 Eyeshadow Palette - Rendezvous

INR 1,850 AT MyGlamm

एकदम सेलब्रिटीसारखा परफेक्ट मॅट आय लुक हवा असेल तर तुम्हाला यापेक्षा चांगला पर्याय सापडणार नाही. तुमच्याजवळ नेहमी चांगला आयशॅडो पॅलेट असायला हवा. त्यासाठी तुम्ही Myglamm च्या मनिष मल्होत्रा 9 इन 1 आईशॅडो पॅलेट (MANISH MALHOTRA 9 IN 1 EYESHADOW PALETTE) चा वापर नक्की करू शकता. यामध्ये तुम्हाला 9 उत्तम ट्रेंडी मॅट शेड्स सापडतील. जे प्रत्येक स्किन टोनसाठी उपयोगी ठरतात. तसंच हे दिसायलाही अति भपकेबाज दिसत नाही. याचे पिगमेंटेशन अन्य आयशॅडो पॅलेटच्या तुलनेत खूपच चांगले आहे आणि हे मुळात हे जास्त वेळ डोळ्यांवर टिकून राहाते. 

ऑनलाईन फाऊंडेशन आणि कन्सीलर खरेदी करताना लक्षात ठेवा महत्त्वाच्या गोष्टी

फाऊंडेशन पॅलेट (TOTAL MAKEOVER FF CREAM FOUNDATION PALETTE)

Beauty

Total Makeover FF Cream Foundation Palette - Cappuccino

INR 1,450 AT MyGlamm

तुम्ही एखाद्या अशा मेकअप उत्पादनाच्या शोधात असाल जे बहुगुणी अर्थात त्याचा जास्त चांगला वापर करता येईल तर तुमच्या मेकअप किटमध्ये Myglamm च्या टोटल मेकओवर  FF क्रीम फाऊंडेशन पॅलेटचा समावेश नक्कीच असयला हवा. याचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे 5 इन 1 आहे. अर्थात यामध्ये प्रायमर, कन्सीलर, फाऊंडेशन, कॉम्पॅक्ट विथ एसपीएफ 30 आणि स्किन टोन करेक्टर एकत्र आहेत. इतकंच नाही तर या मेकअप उत्पादनाला 2019 मध्ये कॉस्मोपॉलिटिन ब्यूटी अवॉर्ड्स मध्ये बेस्ट लाँग लास्टिंग फाउंडेशन (TOTAL MAKEOVER FF CREAM FOUNDATION PALETTE) चा पुरस्कारही प्राप्त झाला आहे. यापेक्षा चांगले मल्टीपर्पज फाऊंडेशन तुम्हाला कुठेही मिळणार नाही हे नक्की. 

तुम्हाला माहीत आहे का, सौंदर्यप्रसाधनांचा वापर किती वर्ष करू शकता

पोझ HD लिपस्टिक - ट्रू रेड (POSE HD LIPSTICK - TRUE RED)

Beauty

POSE HD Lipstick - True Red

INR 599 AT MyGlamm

तुम्हाला जर मर्लिन मुनरोवाली परफेक्ट रेड लिपस्टिक शेड हवी असेल तर तुमचं हे स्वप्न पूर्ण झालं असं समजा. कारण Myglamm ची ट्रू रेड एक क्लासिक रेड लिपस्टिक शेड असून ही लिपस्टिक एकदम मर्लिन मुनरो च्या् लिपस्टिक कलरप्रमाणे आहे. याच कारणामुळे पोझ HD लिपस्टिक ची ट्रू रेड शेड (POSE HD LIPSTICK - TRUE RED) बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचीदेखील आवडती आहे. याशिवाय ही लिपस्टिक मोरिंगा ऑईल आणि विटामिन ई युक्त असून ओठांना नेहमी हायड्रेट ठेवण्यास फायदेशीर ठरते आणि मॅट फिनिश लुकही देते.   

त्वचेचं सौंदर्य वाढवण्यासाठी वापरता येतात चारकोल ब्युटी उत्पादनं, काय आहेत फायदे

जेट सेट आईज काजल आईलाइनर (JET SET EYES KAJAL EYELINER)

Beauty

Jet Set Eyes Kajal Eyeliner - Noir

INR 750 AT MyGlamm

आपण नेहमी आपल्या डोळ्यांना सुंदर बनविण्यासाठी आयलायनरचा वापर करत असतो. पण बऱ्याचदा विचार करताना नक्की कोणतं आयलायनर वापरायचं यामध्ये  आपली धांदल उडते. तुम्ही जर आताच आयलायनर लावायला शिकला असाल तर तुम्हाला इतका विचार करायची गरज नाही. कारण, Myglamm चे जेट सेट आईज काजल आयलायनर (JET SET EYES KAJAL EYELINER) तुम्हाला नक्कीच निराश करणार नाही. हे तीन शेड (ब्राऊन, काळा आणि निळा) यामध्ये उपलब्ध आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार निवड करू शकता. हे आयलायनर तुम्ही काजळ म्हणूनही वापरू शकता. हे वॉटकप्रूफ असून जास्त वेळ टिकून राहाते. तसंच हे डोळ्यांसाठी सुरक्षित आहे. 

फ्लेवर्ड हाईलाइटर (K.PLAY FLAVOURED HIGHLIGHTER)

Make Up

K.PLAY FLAVOURED HIGHLIGHTER

INR 645 AT MyGlamm

चेहऱ्याच्या हायलायटिंगसंदर्भात तुम्ही कोणत्याही मेकअप करणाऱ्याला विचारलं तर हायलायटरशिवाय मेकअप करणं व्यर्थ आहे असंच उत्तर येईल. बारीक चेहरा जाड आणि जाडा चेहरा बारीक दाखविण्यासाठी आजकाल चेहऱ्याचा काही भाग हायलाईट करण्याचा ट्रेंडच आहे. तुम्हाला दीपिका पादुकोण अथवा आदिती राव हैदरीसारखा ग्लोईंग लुक हवा असेल तर Myglamm चे हे फ्लेवर्ड हायलायटर (K.PLAY FLAVOURED HIGHLIGHTER) तुम्ही तुमच्या मेकअप किटमध्ये नक्की समाविष्ट करून घ्या. ही मेलन फ्लेवर्ड लाईट रिफ्लेक्टिक इल्युमिनेटिंग पावडर आहे जी तुमच्या चेहऱ्याच्या योग्य भागांना हायलाईट करण्यास मदत करते. हे तुमच्या चेहऱ्याला अधिक ब्राईट, चमकदार, हायड्रेटेड लुक देते. यामध्ये असणारे नैसर्गिक तत्व तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर ठरतात आणि तुम्हाला सुंदर दिसण्यासाठी मदत करते. तसंच याचा सुगंधही चांगला असतो. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक