रोजच्या स्वयंपाकासाठी अर्ध्या तासात तयार होतील असे झटपट पदार्थ

रोजच्या स्वयंपाकासाठी अर्ध्या तासात तयार होतील असे झटपट पदार्थ


रोजचे जेवण चविष्ट बनवण्यासाठी खरंतर तुम्हाला खूप साहित्य आणि जास्त वेळ खर्च करण्याची मुळीच गरज नसते. अत्यंत साध्या आणि वैविध्यपूर्ण साहित्यांचा वापर करूनही तुम्ही तुमच्या कुटुंबाचे मन जिंकून घेऊ शकता. कारण स्वयंपाक पौष्टिक करण्यासाठी तुम्ही कोणत्या पदार्थांपासून तो तयार करत आहात हे महत्वाचं आहे. जर तुम्ही युक्तीने काही खास पदार्थ वापरून स्वयंपाक तयार केला तर तो झटपटही होईल आणि स्वादिष्टही...यासाठी जाणून घेऊ या या रेसिपीज. या स्पेशल रेसिपीज तुमचा वेळ तर वाचवतीलच पण त्यासोबत तुमच्या कुटुंबाचं योग्य पोषणही करतील.

या झटपट होणाऱ्या स्वादिष्ट रेसिपीज आमच्यासोबत शेअर केल्या आहेत शेफ वरूण इनामदार, सब्यसाची गोराय यांनी 

कोइम्बतूर मसाला राईस (शेफ वरूण इनामदार)

साहित्य - 

 • 3 कप बासमती तांदूळ, शिजवलेला
 • 3 टेबलस्पून तेल
 • 1 टीस्पून मोहरी
 • 1 टीस्पून जिरे
 • 1 कढीपत्त्याची काडी
 • 2-3 सुकवलेल्या लाल मिरच्या
 • 1/4 टीस्पून हिंग
 • 1/2 टीस्पून मिरी पावडर
 • 1 कप ताजा टोमॅटोची प्युरी
 • 1 टेबलस्पून काश्मिरी लाल मिरची पावडर
 • 1/2 टीस्पून गरम मसाला
 • 1/2 कप कॅलिफोर्निया अक्रोड, साधारण कापलेले
 • 1/2 टीस्पून हळद
 • चवीपुरते मीठ


बनवण्याची कृती -

 • कढईत तेल गरम करा. 
 • मोहरी आणि जिरे घाला. तडतडू द्या. 
 • कडीपत्ता, लाल मिरच्या आणि हिंग घाला. 
 • कॅलिफोर्निया अक्रोड परतून घ्या आणि टोमॅटो प्युरी टाका. 
 • मीठ घाला आणि सर्व पावडर मसाले घाला. 
 • टोमॅटो प्युरी घट्ट होऊन तिच्या मूळ आकाराच्या 1/3 झाली की मग त्यात भात घाला. 
 • मोठ्या आचेवर भात परतून घ्या. 
 • गरमागरम खायला द्या

पेपरडेल पेस्तो ( शेफ सब्यसाची गोराय)

साहित्य -

 • 3 1/2 कप कॅलिफोर्निया अक्रोड, भाजलेले
 • 4 कप इटालियन पार्सली पाने, बांधलेली
 • 2 कप पार्मिजियनो रेजियानो चीज, ताजे किसून4 लसूण पाकळ्या
 • 1 1/2 कप एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह तेल
 • चवीपुरते मीठ आणि मिरी
 • 4 पाऊंड पेपरडेल पास्ता, ताजे
 • 1 1/2 कप कॅलिफोर्निया अक्रोड, भाजून कापलेले

बनवण्याची कृती -

 • अर्धे अक्रोड, पार्सली, चीज आणि लसूण फूड फ्रोसेसरमध्ये घाला. नीट बारीक होईपर्यंत प्रोसेस करा. 
 • मिक्सर सुरू असताना त्यात अर्धे तेल घाला. मऊ बनवा. बाऊलमध्ये घ्या आणि उरलेले साहित्य मिक्सरमध्ये घाला. त्याचे दोन टप्पे करा. मीठ आणि मिरी घालून सजवा. बाजूला ठेवा (सुमारे ४ कप होतात).
 • उकळत्या मिठाच्या पाण्यात पास्ता नुकता शिजेपर्यंत म्हणजे साधारण ३ ते ४ मिनिटे शिजवा. पाणी काढा, शिजलेले थोडे पाणी ठेवा.
 • प्रत्येक सर्व्हिंगसाठी 1/4 कप वॉलनट पेस्तोसोबत २ कप शिजवलेला पास्ता टॉस करा आणि त्यात पेस्तो पातळ होण्यासाठी उरलेले शिजवलेले पाणी घाला. सर्व बाजूंनी नीट लागण्यासाठी टॉस करा. 
 • गरम पास्ता बाऊलमध्ये ठेवा. १ टेबलस्पून बारीक केलेले अक्रोड आणि किसलेले चीज गरजेप्रमाणे भुरभुरा. लगेच खायला द्या. 

चिली लाइम चिकन (शेफ सब्यसाची गोराय)

साहित्य

 • 3 टेबलस्पून बटर, विभागून 
 • 2 टीस्पून मेक्सिकन सीझनिंग ब्लेंड, विभागून
 • 2 टीस्पून लसूण मीठ, विभागून
 • 1/2 कप जाडसर वाटलेले किंवा कापलेले कॅलिफोर्निया अक्रोडाचे मगज. 
 • 4 छोटे चिकन ब्रेस्ट्स, बोनलेस
 • 2 टेबलस्पून लिंबाचा रस
 • 1 अॅव्हेकॅडो, सोलून, बारीक केलेला आणि चिरलेला
 • सिलांत्रो सीझन केलेला भात

बनवण्याची कृती -

 • एका मोठ्या कढईत 1 टेबलस्पून लोणी वितळवून घ्या. त्यात 1/2 टीस्पून मेक्सिकन सीझनिंग ब्लेंड घाला व 1/2 टीस्पून गार्लिक सॉल्ट घाला आणि अक्रोड परतून घ्या. 5 मिनिटे किंवा टोस्ट होईपर्यंत मध्यम आचेवर शिजवा आणि सतत हलवत राहा. कढईतून बाहेर काढा.
 • त्याच कढईत मध्यम आचेवर उरलेले लोणी वितळवून घ्या. उरलेले सीझनिंग ब्लेंड आणि गार्लिक सॉल्ट घाला. चिकन घाला आणि लोण्याने दोन्ही बाजूंना मिश्रण लावण्यासाठी परता. नीट शिजेपर्यंत दोन्ही बाजूंना 5 मिनिटे शिजवा. कढईत लिंबाचा रस घाला आणि पाच मिनिटे जास्त शिजवा. त्यावर अॅव्हेकॅडो घाला. 
 • भातासोबत चिकन खायला द्या.