नेलपेंटमध्ये नव्या ट्रेंडनुसार कितीतरी नव्या शेड कायमच शेड येत असतात. निऑन, मॅट, ग्लॉसी, ग्लिटरी अशा वेगवेळ्या शेड्स आपण नखांचे सौंदर्य वाढवण्यासाठी नेहमीच लावून पाहतो. त्यातल्या त्यात सगळ्यावर जाणारी अशी नेलपेंटची शेड म्हणजे ‘लाल’. कोणत्याही खास कार्यक्रमापासून ते अगदी डेलीवेअरपर्यंत लाल रंगाच्या वेगवेगळ्या शेड आपण हातापायांच्या नखांना लावत असतो. एका लाल रंगामध्येच कितीतरी शेड्स असतात. ज्या तुम्हाला वेगवेगळ्या कारणांसाठी लावता येऊ शकतात. आज आपण लाल रंगाच्या अशाच काही शेड्स पाहणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला नेमकी कोणती शेड घ्यायची ते कळेल. चला तर मग जाणून घेऊया लाल रंगाच्या नेलपेंटमधील सुंदर शेड्स.
MyGlamm ची लाल रंगाची ही शेड एक क्लासिक लाल रंग आहे. ही एक ग्लॉसी नेलपेंटचा प्रकार असून तुमच्या प्रत्येक स्ट्रोकसोब ती अधिक उठून दिसते. आता हा क्लासिक लाल रंग असल्यामुळे तुम्ही एखाद्या लग्न समारंभासाठी किंवा तुम्ही एखाद्या पार्टीला जाणार असाल तर हा रंग लावू शकता. हा रंग तुमची स्किनटोन कोणतीही असली तरी देखील उठून दिसतो. हा रंग दीर्घकाळासाठी टिकू शकतो असा कंपनीचा विश्वास आहे. शिवाय हा रंग दिवसेंदिवस जास्ती चांगला दिसतो.
फायदे : दीर्घकाळासाठी टिकणारी ही नेलपेंट छान शोभून दिसणारी आहे. हा शेड छान उठून दिसतो.
तोटे : याचे फार काही तोटे नाही.
लग्नाचा सीझन म्हटला की, तयारी आलीच त्यात जर तुम्ही नखांना सुंदर आणि उठावदार दाखवू इच्छित असाल तर Nykaa ची हा लालरंग तुमच्यासाठी फारच सुंदर आहे. लाल रंगाच्या शेडमधील थोडासा मरुन रंगाकडे झुकणारा हा रंग आहे जो दिसायला फारच ड्रामॅटिक आणि सुंदर दिसतो. तुम्ही लग्नासाठी अगदी कोणत्याही रंगाचे कपडे घातले असतील तरी देखील हा रंग तुम्हाला छान दिसू शकतो. तुमच्या बजेटमध्ये बसणारा लालचा हा शेड तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवा असा आहे.
फायदे : लग्न आणि समारंभासाठी खूप चांगला असा हा रंग आहे.
तोटे : जर तुम्हाला लाल भडक रंग हवा असेल तर हा रंग तुम्हाला चालणार नाही.
लालबुंद असा रंग तुम्हाला हवा असेल तर मेकअप क्षेत्रात नव्याने आलेला Kay Beauty चा हा नेलपेंट शेड फारच सुंदर आहे. काही जणांना लाल नेलपेंटचा रंग हा फार ब्राईट आणि फ्रेश असा आवडतो. नखांना तो लावल्यानंतर तुमच्या नखांकडेच सगळ्यांचे लक्ष जावे अनेकांना वाटते. लाल रंगाचा हा शेड तुम्हाला एखाद्या इव्हेंटला, पार्टीला योग्य आहे. पण हा रंग तुम्ही ऑफिससाठी अजिबात लावू शकत नाही. कारण हा रंग फारच रेड हॉट असल्यामुळे तुमची नखं या नेलपेंटमध्ये फॉर्मल दिसत नाहीत.
फायदे : याचा कोट खूप छान बसतो. अगदी बॉटलमध्ये दाखवल्याप्रमाणे दिसतो.
तोटे : लाल रंगाची ही नेलपेंट लावताना त्याचा ब्रश मोठा असल्यामुळे तुम्हाला लावताना खूप काळजी घ्यावी लागते.
तुमच्या बजेटमध्ये बसणारा आणखी एक ब्रँड म्हणजे Elle18. तुम्हाला नेलपेंट घेण्याची आवड असेल आणि तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये काही गोष्टी हव्या असतील तर तुम्ही यामध्येही नेलपेंट निवडू शकता. लाल रंगाचा हा शेड ग्लॉसी प्रकारातील असून तुम्ही हा कधीही वापरु शकता. ही नेलपेंट लावायला तशी फार सोपी आहे. त्यामुळे तुम्हाला लावताना फार काही काळजी घ्यावी लागत नाही. ही नेल पॉलिश रिमुव्हरने अगदी सहज निघते.
फायदे : स्वस्त आणि मस्त असा हा ब्रँड आहे.
तोटे : ही जास्त काळ टिकत नाही
Masaba कलेक्शन मधील लाल रंगाच्या नेलपेंटमधील ही शेड तुम्हाला आवडेल अशी आहे. तुम्हाला अगदी कोणत्याही वेअरवर घालता येईल अशी ही लालमधील शेड आहे. नेलपेंटचा एक कोटही नखांची सुंदरता वाढवण्यासाठी पुरेसा आहे. हा रंग थोडा घट्ट आणि जाडसर दिसत असल्यामुळे हा रंग तुमच्या नखांना शोभून दिसतो. आकर्षक पॅकिंग आणि खिशाला परवडणाऱ्या दरामध्ये ही नेलपेंट मिळत असल्यामुळे तुमच्याकडे हा रंग असायलात हवा असा हा रंग आहे.
फायदे : खिशाला परवडणारा हा एक मस्त ब्रँड आहे.याचा रंग फार आकर्षक आहे
तोटे : याचे फार काही तोटे नाहीत
बजेटमध्ये बसेल असा नेलपेंटमधील आणखी एक ब्रँड म्हणजे Faces Canada. यांचा लाल रंगामधील हॉट पेपरीका हा शेड तुम्ही हमखास लावून पाहायला हवा. पेपरीका म्हणजे लाल मिरची.या लाल मिरचीचा लालचुटुक रंग तुमच्या नखांना चांगलाच खुलून दिसतो. तुम्हाला बॉटलवर दाखवलेला रंग नखांना आणण्यासाठी किमान दोन कोट तरी नेलपेंट लावावी लागते. या नेलपेंटची किंमत फार जास्तही नाही.तुमच्या खिशाला परवडणारी आहे.
फायदे : खिशाला परवडणारी आणि मस्त अशी ही नेलपेंट आहे. याचे दोन कोटही पुरेसे आहेत.
तोटे : या नेलपेंटचे किमान दोन कोट तरी लावायला हवे.
नखांना सुंदर आणि एकसारखे दिसण्याचे काम जेलपॉलिश फार चांगल्यापद्धतीने करु शकते. Nykaa मध्ये मिळणारी ही जेलपॉलिश दिसायलाच नाही तर नखांवर ही फार चांगल्या पद्धतीने लागते. अगदी एक कोट लावल्यानंतरच तुमची नखं सुंदर दिसू लागतात. जेल पॉलिश ही हल्लीचा ट्रेंड आहे. या नेलपेंटचा कोट चांगला लागतो. या नेलपेंटचा रिव्ह्यू फार चांगला आहे. याची फिनिशिंग फार चांगली असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.
फायदे : बजेटमध्ये बसणारी आणि चांगल्या फिनिशिंगची ही नेलपेंट आहे
तोटे : याबद्दल फार काही वाईट कमेंट्स नाहीत.त्यामुळे यात काही नकारात्मक मुद्दे नाही
Lotus या कंपनीचे अनेक प्रोडक्ट डोळे झाकून घेण्यासारखे आहेत. यांच्या नेलपेंट रेंजही अनेकांना आवडणाऱ्या आहेत. जर तुम्ही लाल रंगाची नेलपेंट शोधत असाल आणि तुम्हाला इतर कोणताही रंग फारसा आवडत नसेल तर तुम्ही या रंगाची निवड करु शकता. क्रिमसन रेड हा शेड अनेकांच्या आवडीचा लाल रंगाचा शेड आहे. याचा एक कोटही तुमच्या नखांसाठी पुरेसा आहे. दुसरा कोट लावताना तुम्ही अत्यंत काळजीपूर्वक ही नेलपेंट लावायला हवी. कारण पहिला कोट नीट लागला नसेल तर दुसरा कोट लागताना खूप त्रास होतो.
फायदे : बजेट फ्रेंडली असा नेलपेंटचा हा पर्याय आहे.
तोटे : दुसरा कोट लावताना तुम्ही थोडी काळजी घेणे गरजेचे असते.
मेकअप उत्पादनांमध्ये Kiko Milano याचे नाव आहे. तुम्ही लाल रंगाच्या नेलपेंटच्या शोधात असाल तर तुम्हाला या ब्रँडमध्ये एक उत्कृष्ट लाल रंग मिळू शकतो. ‘फायर रेड’ असे या शेडचे नाव असून ही शेड लाल रंगाची एकदम ब्राईट शेड आहे. ही नेलपेंट फारच घट्ट असल्यामुळे ती वाळण्यासाठी थोडासा वेळ लागतो अशी अनेकांची तक्रार आहे. जर तुम्हाला हा शेड आवडला असेल तर तुम्ही नेलपेंट वाळवण्यासाठी खास मशीनचा उपयोग करु शकता.
फायदे : या नेलपेंटची फिनिशिंग फार चांगली आहे.पण त्यासाठी तुम्हाला थोडी वाट पाहावी लागते
तोटे : याची किंमत नेलपेंटच्या तुलनेत अधिक आहे.
चेरीसारखा लालचुटूक रंग तुम्हाला आवडत असेल तर तुमच्यासाठी Lakmeची ही नेलपेंट उत्तम पर्याय आहे. Primer + Gloss असा त्याचा फायदा असल्यामुळे त्या नखांवर अगदी एकसारख्या लावण्यास मदत मिळते. चेरी जशी फ्रेश दिसते तशी ही नेलपेंट नखांवर शोभून दिसते. लॅक्मे हा मेकअप रेंजमधील अग्रगण्य ब्रँड आहे. किंमतीच्या तुलनेत हे प्रोडक्ट चांगले आहे. दोन कोट आणि वाळण्यासाठी दोन मिनिटं ही पुरेशी आहे.
फायदे : नेलपेंट सुकणं हे यामध्ये फार सोपे असते.
तोटे : याची किंमत इतर नेलपेंटच्या तुलनेत अधिक आहे.
नेलपेंट रेंजमध्ये कलरबार या कंपनीचे नावही फार प्रसिद्ध आहे. त्याची लालमधील Haute paper ही शेड शिमरी प्रकारामध्ये मोडणारी आहे. ही पार्टीसाठी एकदम परफेक्ट अशी शेड आहे. हिचा शिमर इफेक्ट चांगला दिसत असल्यामुळे तुम्ही त्याचा उपयोग एखाद्या पार्टीसाठी किंवा खास समारंभासाठी करु शकता. या नेलपेंटचे दोन कोट तुमच्या नखांसाठी पुरेसे आहेत. किंमतीच्या तुलनेत ही एक चांगली निवड आहे.
फायदे : नेलपेंटचे दोन कोट तुम्हाला एक चांगला लुक देण्यासाठी पुरेसे आहे
तोटे : जर तुम्हाला नेलपेंट नीट लावता आली नाही तर ती तुम्हाला चांगला लुक देऊ शकत नाही.
तुम्हाला खूप ग्लॉसी किंवा चमकदार नेलपेंट अशी नेलपेंट आवडत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने मॅट नेलपेंट लावू शकता. मॅट नेलपेंट या पार्टी किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमासाठी चांगले दिसतात. यामधील ब्राईट रेडही शेड थोडी मरुनकडे झुकणारी शेड असून ही शेड दिसायला फार छान दिसते. मॅट नेलपेंट या दिसायला छान दिसतात. तुमच्या नखांना एक वेगळा ग्लॅमरस लुक देतात.
फायदे : तुमच्या बजेटमध्ये बसणारी अशी ही परफेक्ट मॅट नेलपेंट आहे.
तोटे : मॅट नेलपेंटचे जास्त स्ट्रोक लावल्यानंतर नखं खडबडीत दिसू लागतात.
आता तुम्हाला हा लाल रंगाच्या नेलपेंटमधील काही शेड्स हव्या असतील तर तुम्ही यापैकी काही लाल रंगाच्या शेड्स निवडू शकता.