मेकअपनंतर सेटिंग पावडर वापरणे आहे गरजेचे, जाणून घ्या कसे

मेकअपनंतर सेटिंग पावडर वापरणे आहे गरजेचे, जाणून घ्या कसे

मेकअप करायला आवडत असेल तर आजचा विषय तुमच्यासाठी खास आहे. कारण तुम्हाला हवा तसा मेकअप केल्यानंतर चेहरा खुलून दिसावा असे आपल्या सगळ्यांना वाटते पण धूळ, माती, प्रदूषण, घाम आणि आता मास्क या सगळ्यांमुळे केलेला सगळा मेकअप वाया जातो. मेकअप टिकवून ठेवण्यासाठी तुमच्याकडे मेकअप सेटिंग स्प्रे नसेल तर तुम्ही किमान सेटिंग पावडरचा उपयोग करायला हवा. त्यामुळे तुमचा मेकअप अधिक काळासाठी टिकतो. सेटिंग पावडर म्हणजे काय? आणि त्याचा उपयोग कसा करायचा ते आता आपण जाणून घेऊया.

घरीच बनवा केमिकल फ्री आणि सुगंधी टाल्कम पावडर

सेटिंग पावडर म्हणजे काय?

Instagram

सेटिंग पावडर किंवा लुझ पावडर या नावाने ओळखली जाणारी ही खास मेकअप पावडर ओळखली जाते. ही पावडर टाल्क आणि सिलिका यांचे मिश्रण असते. मेकअपमध्ये असलेले अनेक तैलीय पदार्थ जागच्या जागी राहण्यासाठी सेटिंग पावडरचा उपयोग केला जातो हा याचा सर्वसाधारण उपयोग आहे. पण हाच फायदा मेकअप टिकवण्यासाठी फारच महत्वाचा आहे. कारण तुम्ही केलेला मेकअप जर टिकला तरच तो चांगला दिसू शकतो.

लहान मुलांसाठीच नाही तर मोठ्यांसाठीही बेबी पावडर आहे फायदेशीर

असा करा सेटिंग पावडरचा उपयोग

Instagram

  • सगळ्यात आधी सेटिंग पावडरचा फायदा वाचून तुम्ही त्याची खरेदी करत असाल तर तुम्हाला चांगली सेटिंग पावडर ही निवडता यायला हवी. त्यासाठी तुम्ही काही ऑनलाईन प्रोडक्ट चाळले तरी चालतील.
  • फिक्सिंग पावडर ही पारदर्शक असते त्यामध्ये कोणतीही शेड मिळत नाही. त्यामुळे तुम्ही अगदी निश्चिंत याची खरेदी करु शकता. जर तुम्ही मेकअपमध्ये कोणताही ग्लॉसी किंवा ग्लिटरी मेकअप वापरला नसेल आणि तुम्हाल तुमचा चेहरा छान चमकू द्यायचा असेल तर तुम्ही यामध्ये मिळणारा शिमर सेटिंग पावडरचा उपयोग करु शकता. 
  • सगळा मेकअप करुन झाल्यानंतर तुम्हाला ही सेटिंग पावडर लावायाची असते. ही पावडर तुम्ही ब्रशच्या साहाय्याने लावणे गरजेचे असते. अगदी हलक्या हाताने याचा प्रयोग तुमच्या चेहऱ्यावर करा. 
  • चेहऱ्यावरील टी झोन हा अनेकांना घाम आणि तेलकट त्वचा होण्याचा भाग असतो. या शिवाय काहींना हनुवटी गाल अशा काही भागांना घाम येतो. अशावेळी तुम्हाला घाम येणारे आणि तेलकट होणारे भाग ओळखून तुम्ही त्या भागांना पावडरचा सगळ्यात आधी हात लावायला विसरु नका. 
  • जर तुमच्याकडे ब्रश नसेल आणि तुम्ही पफचा उपयोग करण्याचा विचार करत असाल तरी काहीही हरकत नाही. पण असे करताना तुम्हाला अत्यंत सावकाशपणे याचा प्रयोग करावा लागेल. तुम्ही अगदी सॉफ्ट अशा पफचा यासाठी वापर करा त्याचा उत्तम रिझल्ट तुम्हाला मिळेल. 
  • सेटिंग पावडर म्हणून तुम्ही घरातील टाल्कम पावडरचा उपयोग करणार असाल तर तसे मुळीच करु नका. कारण टाल्कम पावडर ही ट्रान्सलुशंट मुळीच नसते. ती चेहऱ्यावर पांढरे डाग सोडू शकते. अगदी पर्याय नसताना त्याचा उपयोग करणे आणि तुम्ही केलेल्या प्रोफेशनल मेकअपवर याचा वापर करणे मुळीच उचित नाही. कारण त्यामुळे तुमचा मेकअप लुक उठून दिसणार नाही. 


आता चांगला मेकअप करत असाल तर एखादी छान सेटिंग पावडरही घ्या म्हणजे तुमच्या मेकअपला न्याय मिळेल. 

 

तुम्ही ही उत्तम सेटिंग पावडरच्या शोधात असाल तर MyGlamm ची ही सेटिंग पावडर नक्की वापरुन पाहा.

मेकअपसाठी असा करा बनाना सेटिंग पावडरचा वापर

Beauty

POSE HD SETTING POWDER - IVORY

INR 699 AT MyGlamm