फक्त ब्लशरचा उपयोग करुन दिसा सुंदर

फक्त ब्लशरचा उपयोग करुन दिसा सुंदर

रोज खूप मेकअप करायला आवडत नसेल पण तरीही फोटोसाठी कायम रेडी राहायचं असेल तर तुम्ही अगदी कमीत कमी मेकअप वापरुनही सुंदर दिसू शकता. मेकअप पाऊचमधील ‘ब्लशर’ हा असा प्रकार आहे ज्याच्या वापरामुळे तुम्ही एकदम फ्रेश आणि सुंदर दिसता. तुमच्या मेकअप पाऊचमधील ब्लशरचा नेमका कसा उपयोग करायचा याविषयी अधिक माहिती देणार आहोत. म्हणजे तुम्ही कुठेही बाहेर गेला तर तुम्हाला त्याचा वापर करता येईल. चला करुया सुरुवात

मस्कारा लावताना होतोय त्रास, तर खास सोप्या हॅक्स

असे लावा ब्लशर

Instagram

गालाला लावणारे ब्लशर हा मेकअपमधील असा ट्विस्ट देणारा प्रोडक्ट आहे ज्याच्या वापरामुळे अगदी काहीच मिनिटात तुमचे सौंदर्य खुलते. गालाला छान लालसर झाक आली की, तुमचा चेहरा एकदम खुलून दिसतो. हे ब्लशर नेमके कसे लावायचे ते जाणून घेऊया. 

  • सगळ्यात आधी चेहरा स्वच्छ करुन घ्या. चेहऱ्याला एखादे मॉश्चरायझर किंवा चांगले लोशन लावा. 
  • त्यावर अगदी थोडेसे ब्लशर घेऊन तुमच्या चीक बोन्स, नाकाच्या टीपला आणि हनुवटीला लावा. ब्लशर लावण्यासाठी तुम्ही ब्रशचा उपयोग करा. त्यामुळे ते नीट लागेल. 
  • ब्लशरचा प्रयोग केल्यानंतर त्यावर ब्रशनेच सेटिंग पावडर लावा. चेहऱ्यावर पिंग्मेट्स पडू देऊ नका.

केस लांबसडक वाढवण्यासाठी तेल नाही तर या गोष्टींची आहे गरज

ब्लशरची निवड

Instagram

ब्लशरचा सर्वसाधारण रंग हा गुलाबी असला तरीसुद्धा तुमच्या चेहऱ्यानुसार तुम्हाला त्याची निवड करणे गरजेचे असते. ब्लशरमध्ये वेगवेगळे शेड्स येतात. त्यापैकी तुमच्या त्वचेला योग्य वाटेल असे ब्लशर निवडण्यासाठी खालील गोष्टींची काळजी घ्या. 

  • स्किनटोननुसार ब्लशरची निवड करताना उजळ ते गव्हाळ रंगाला फिक्कट गुलाबी ते गडद चांगला दिसतो. पण गडद गुलाबी रंग हा फक्त पार्टी किंवा काही खास कार्यक्रमांसाठी चांगला दिसतो. जर डेलीवेअरसाठी तुम्ही ब्लशरचा उपयोग करणार असाल तर ही शेड लाईट असू द्या. 
  • गव्हाळ रंगाला कोणत्याही शेड चांगल्या दिसतात. त्यांच्या स्किनटोनमध्ये त्या अगदी सहज मिसळून जातात. पण या रंगाच्या व्यक्तिनींही फार गडद आणि चेहरा काळा दिसेल असे शेड निवडू नयेत. 
  • सावळ्या त्वचेलाही ब्लशर फार चांगले दिसतात. डार्क ते मरुन रंगाची निवड करावी. हा रंग या स्किनटोनवर अधिक खुलून दिसतो. फिक्कट रंगाची निवड या स्किनटोनसाठी चुकीची निवड ठरु शकते.
  • ब्लशर हे क्रिम आणि पावडर असा दोन्ही स्वरुपात मिळते. तुम्ही दोन्हीचा उपयोग करु शकता. क्रिम ब्लशर वापरणे फार सोपे असते आणि ते चेहऱ्यावर फारच नैसर्गिक दिसते. एखाद्या लिप बामप्रमाणे तुम्हाला ते लावावे लागते. 

आता स्किनटोननुसार ब्लशरची निवड करावी म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होईल.

 

या चुका टाळा

Instagram

  • ब्लशरचा उपयोग करताना तुम्ही काही चुका देखील टाळायला हव्यात. गाल लाल किंवा गुलाबी दिसण्यापेक्षा ते फ्रेश दिसणे गरजेचे असते. अशावेळी जर तुम्ही खूप जास्त ब्लशरच वापर करत असाल तर तुमचा चेहरा फ्रेश नाही तर खूप मेकअप केलेलाच दिसेल. 
  • ब्लशर जास्त काळ टिकावे म्हणून तुम्ही ते जास्त लावत असाल तर ही सगळ्यात मोठी चूक आहे कारण त्यामुळे तुमचा चेहरा काळवंडलेला दिसू शकतो. 
  • पावडर ब्लशरचे पिंग्मेंट हे आजुबाजूला पडू शकतात.त्यामुळे ते हाताने लावण्यापेक्षा त्यासाठी ब्रशचा उपयोग करणे उत्तम राहील. 

आता जर तुम्ही ब्लशरचा उपयोग करणार असाल तर या टिप्सचा उपयोग नक्की करा. 

ऑक्सिजन फेशिअलचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का

जर तुम्ही उत्तम ब्लशरच्या शोधात असाल तर तुम्ही माय ग्लॅमचे हे प्रोडक्ट नक्की ट्राय करु शकता.

Make Up

The POSE Blush Duo by MyGlamm

INR 699 AT MyGlamm