कशीही शरीरयष्टी असली तरी हे स्कर्ट दिसतील एकदम परफेक्ट

कशीही शरीरयष्टी असली तरी हे स्कर्ट दिसतील एकदम परफेक्ट

नव्या ट्रेंडचे कपडे घालून पाहायला अनेकांना आवडतं. पण बरेचदा उंची, जाडी या सगळ्या गोष्टींमुळे आपण काही कपडे घालून पाहायला बघत नाही. विशेषत: हल्ली जीन्सपेक्षाही मोकळे स्कर्ट घालायला अनेकांना आवडता. पण स्कर्ट चांगले दिसतील की नाही. वयोमानानुसार कोणते स्कर्ट घालायला हवे असे प्रश्न तुम्हाला पडला असेल तर अगदी कोणत्याही वयात शोभू शकतील असे काही स्कर्टचे प्रकार आम्ही तुमच्यासाठी निवडले आहेत. जे तुम्हाला छान शोभूनही दिसतील आणि तुम्ही त्यामध्ये सुंदर दिसत असल्याचा विश्वासही तुम्हाला देईल.

स्टायलिश लुकसाठी ट्राय करा 'हे' विविध प्रकारचे ट्रेंडी स्कर्ट

व्हिटेंज ए लाईन स्कर्ट

Instagram

समोरुन बटणं आणि ए लाईन  आकार असलेले हे व्हिटेंज स्कर्ट आता पुन्हा एकदा फॅशन इन आहेत. मॅक्सी लेंथ किंवा त्याहून थोड्या लहान आकारामध्ये हे स्कर्ट मिळतात. तुमची उंची कमी असेल किंवा तुम्ही खूप जाड असाल तरी तुम्हाला स्कर्टचा हा प्रकार खूपच स्मार्ट दिसतो. प्लेन किंवा प्रिंटेड असा स्कर्ट निवडून तुम्ही त्यावर छान टीशर्ट घातले की, हे स्कर्ट उठून दिसतात. टीशर्ट टक इन करुन तुम्हाला यामध्ये एक चांगला लुक तयार करता येऊ शकतो. हा स्कर्टचा पॅटर्न अंगाला अजिबात चिकटत नाही त्यामुळे तुम्ही बारीक असा किंवा जाड यामध्ये तुमचे अवयव फारसे दिसून येत नाही. तुम्हाला तुमच्यावर विश्वास असेल तर तुम्ही त्यावर क्रॉप टॉपही घालू शकता. 

मेटॅलिक प्लेटेड स्कर्ट

Instagram

 सध्याचा हा नवा ट्रेंड अनेकांना आवडला आहे. एखाद्या पार्टीसाठी किंवा इव्हेंटसाठी स्कर्ट घालताना तो स्कर्ट तितकाच हटके आणि कम्फर्टेबल असायला हवा. मेटॅलिक प्लेटेड हा स्कर्ट अगदी तसाच कम्फर्टेबल आहे. मेटॅलिक शेडमध्ये तुम्हाला अनेक चांगल्या शेड्स मिळतील. तुम्ही एखाद्या छान फॅन्सी टॉपवर हे स्कर्ट घालू शकता. याचे मटेरिअल ग्लॉसी असले तरी देखील हा स्कर्ट अंगाला चिकटत नाही. या स्कर्टखाली तुम्हाला स्निकर्सपासून ते अगदी हाय हिल्सपर्यंत कार्यक्रमानुसार कोणतेही फुटवेअर घालता येईल.

डेनिम मॅक्सी स्कर्ट

Instagram

डेनिम स्कर्टचा प्रकार हा एव्हरग्रीन असा प्रकार आहे. तुम्ही अगदी कधीही आणि कोणत्याही प्रसंगी हा स्कर्ट घालू शकता. पिकनिक किंवा लॉग जर्नीसाठी तुम्ही कुठे बाहेर जाणार असाल तर तुम्ही डेनिममधील टाईट स्कर्टसोडून थोडा सैल आणि लांब स्कर्ट घाला. हल्ली अनेक चांगल्या ब्रँडमध्ये हे स्कर्ट मिळतात. शर्ट, टिशर्ट तुम्हाला आवडेल ते टॉप तुम्हाला यावर घालता येऊ शकतात. हे स्कर्ट तुम्ही बारीक किंवा जाड असाल तरी देखील चांगला दिसतो. तुम्हाला ट्रेंडी दिसतो. 

अशाप्रकारचे कपडे घातल्यास दिसणार नाही तुमचं #tummyfat

रॅप अराऊंड स्कर्ट

Instagram

झटपट घालता येईल असा ट्रेंडी स्कर्टचा प्रकार म्हणजे रॅप अराऊंड स्कर्ट. हा स्कर्ट म्हणजे एक मोठा लांबलचक कपडा. ज्याला तुम्हाला कमरेभोवती गुंडाळून त्याचा स्कर्ट करायचा असतो.  जर तुम्हाला हा स्कर्ट अंगाला फारच चिकटून तुम्ही जाड वाटत असाल असे वाटत असेल तर तुम्ही या स्कर्टवर क्रॉप टॉप ऐवजी थोडा लांब टॉप घाला.शॉर्ट कुडती हा प्रकार सुद्धा तुम्ही यावर घालू शकता. 


हे चार स्कर्टचे प्रकार तुम्हीही नक्की ट्राय करा.

तुमच्या वॉडरोबमध्ये असायलाच हव्यात या गोष्टी!