न्यूड लिपस्टिक वापरण्यापूर्वी या गोष्टी अवश्य लक्षात ठेवा

न्यूड लिपस्टिक वापरण्यापूर्वी या गोष्टी अवश्य लक्षात ठेवा

आजकाल लाल, गुलाबी, मरून अशा डार्क आणि ब्राईट शेड प्रमाणे एखादी न्यूड शेड लिपस्टिकही प्रत्येकीच्या मेकअप किटमध्ये असतेच. कारण नॅचरल अथवा नो मेकअप लुकसाठी न्यूड लिपस्टिक लावणं फायदेशीर ठरतं. शिवाय कोणत्याही स्किन टोनची स्त्रीला न्यूड शेड लिपस्टिक सूट होऊ शकते. मात्र न्यूड लिपस्टिकमध्येही अनेक शेड्स असतात. त्यामुळे या शेड निवडताना तुम्ही सावध असायला हवं. कारण जर तुमची शेड चुकली तर तुमचा पूर्ण लुकच खराब होऊ शकतो.  न्यूड लिपस्टिकची शेड निवडताना नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या, न्यूड लिपस्टिकसह कोणता लुक करावा, न्यूड लिपस्टिक ओठांवर कशी लावावी यासाठी आम्ही काही बेसिक मेकअप टिप्स तुमच्यासोबत शेअर करत आहोत. ज्यामुळे तुमचा एखादा क्लासी, नो मेकअप, नॅचरल लुकही परफेक्ट होईल. 

न्यूड लिपस्टिक लावताना या गोष्टी ठेवा लक्षात -

न्यूड लिपस्टिक शेड तुमची कितीही फेव्हरेट शेड असली तरी ती लावताना या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा. 

योग्य न्यूड शेडची निवड करा -


न्यूड लिपस्टिक लावताना योग्य शेड निवडणं खूपच गरजेचं आहे. कारण जर तुमच्या स्किन टोनला ती मॅच झाली नाही तर तुमचा पूर्ण लुकच खराब होतो. न्यूड लिपस्टिकमध्ये अनेक शेड आहेत. परफेक्ट शेड निवडण्याची युक्ती म्हणजे तुमच्या स्किन टोनपेक्षा थोड्या डार्क शेडची लिपस्टिक निवडा. ज्यामुळे तुमचे ओठ आकर्षक आणि नॅचरल वाटतील.

Shutterstock

ओठ एक्सफोलिएट करा -

कोणतीही लिपस्टिक लावताना नेहमी या गोष्टीची काळजी घ्यायला हवी. कारण त्यामुळे तुमच्या ओठांवरील डेड स्कीन निघून जाते आणि तुमचे ओठ मऊ, मुलायम होतात. शिवाय जेव्हा तुम्ही असे तुमचे ओठ स्वच्छ करता तेव्हा त्यानंतर लावलेली लिपस्टिक तुमच्या ओठांवर खूप वेळ टिकण्यास मदत होते. लिपस्टिकमध्ये ओठ आकर्षक, मऊ आणि सुंदर दिसण्यासाठी  ही स्टेप फॉलो करणं फार गरजेचं आहे.  तुम्ही यासाठी एखादं बाजारात मिळणारं लिप स्क्रब वापरू शकता अथवा घरगूती वस्तूंपासून तयार केलेला  स्क्रब वापरू शकता. मात्र वेळच्या वेळी ओठांना एक्सफोलिएट करा ज्यामुळे तुमची न्यूड लिपस्टिक शेड जास्त उठून दिसेल.

Shutterstock

सर्वात आधी प्रायमर लावा -

लिपस्टिक लावताना फक्त ओठ स्वच्छ करून चालणार नाही. कारण जर तुम्हाला ती जास्त काळ ओठांवर टिकावी असं वाटत असेल तर लिपस्टिक लावण्यापू्र्वी तुमच्या ओठांना चांगलं प्रायमरदेखील लावा. ओठ स्वच्छ केल्यावर तुम्ही थोडं फाऊंडेशन अथवा लिप प्रायमर तुमच्या ओठांवर लावून ते व्यवस्थित ब्लेंड करू शकता. ज्यामुळे तुमच्या ओठांवर एक छान बेस तयार होईल. या टिप्समुळे तुमचे ओठ दिवसभर मॉईस्चराईझदेखील राहतील. जर तुमच्या ओठांवर काळेपणा असेल आणि ते एकसामान वाटत नसतील तर तुम्ही लिपस्टिक लावण्यापू्वी त्यांना एकसमान टोन देण्यासाठी कन्सिलरही वापरू शकता. 

Shutterstock

मेकअपने असा बॅलन्स करा तुमचा लुक -

न्यूड लिपस्टिक लावल्यावर जर तुम्ही मेकअपने तुमचा लुक बॅलन्स केला नाही तर चेहरा खूपच डल दिसेल. यासाठीच तुमच्या न्यूड लिपस्टिकला साजेसं ब्लश गालांवर आणि डोळ्यांवर स्मोकी लुक किंवा विंग आय लायनर तुम्ही ट्राय करू शकता. 

Shutterstock

तज्ञ्जांचा सल्ला घ्या -

जर तुम्ही अगदी पहिल्यांदाच न्यूड लिपस्टिक लावणार असाल तर तुम्हाला नेमकी कोणती शेड निवडावी असा प्रश्न पडू शकतो. जर तुम्ही स्वतःच्या स्किन टोननुसार शेड निवडू शकत नसाल तर एखाद्या तज्ञ्ज व्यक्तीचा सल्ला घ्या. ज्यामुळे तुम्हाला एक परफेक्ट न्यूड लिपस्टिक विकत घेता येईल.

Beauty

Manish Malhotra Hi-Shine Lipstick - Barely Nude

INR 950 AT MyGlamm