ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
ऑक्टोबर हिटमध्ये सणासमारंभाला ट्राय करा स्टायलिश आणि आकर्षक ब्लाऊज

ऑक्टोबर हिटमध्ये सणासमारंभाला ट्राय करा स्टायलिश आणि आकर्षक ब्लाऊज

ऑक्टोबर हिटमध्ये कोणत्याही सणासमारंभाला साडी नेसायचं म्हटलं की घामाने भिजून कपडे खराब होण्याची भीती असते. त्यातही आपल्याला ब्लाऊज आणि साडी हे दोन्ही सांभाळताना नक्कीच दमछाक होत असते. पण तरीही आपल्याला साडी आणि ब्लाऊज हे कॉम्बिनेशन करायचं असेल आपण ब्लाऊजच्या वेगवेगळ्या स्टाईल्स नक्कीच करू शकतो. या गरमीच्या दिवसात स्टाईल आणि ड्रेसिंग सेन्समध्ये खूपच बदल होतो. यावेळी जास्तीत जास्त कूल आणि आरामदायी कपडे घालावे असं सगळ्यांनाच वाटतं. तसंच काहीही असलं तरी आकर्षक दिसणं आणि फॅशन आणि स्टाईल करणं हा प्रत्येक महिलेचा हक्क आहे. त्यामध्ये कुठेही कमीजास्त झालेले कोणालाही आवडत नाही. मग अशावेळी सणासमारंभाला तुम्ही स्टायलिश आणि आकर्षक ब्लाऊज वापरून पाहू शकता. साडी म्हटलं की सर्वात पहिले यावर कोणता आकर्षक आणि वेगळ्या स्टाईलचा ब्लाऊज घालायचा याचा विचार सुरू होतो. तो स्टायलिश,आकर्षक आणि तितकाच आरामदायीदेखील असायला हवा या लेखातून आम्ही तुम्हाला याबद्दल अधिक माहिती देणार आहोत. तुम्ही कोणत्या प्रकारचे ब्लाऊज वापरू शकता ते यातून जाणून घ्या.

राऊंड शेप ब्लाऊज (Round Shape Blouse)

instagram

साडीसह नेहमीच्या आकारातील अथवा नेहमीच्या स्टाईलमधील ब्लाऊज वापरण्यापेक्षा अधिक गरम होत असेल तर तुम्ही राऊंड शेप ब्लाऊजचा वापर करा. स्टायलिश लुकसाठी तुम्ही अशा तऱ्हेचा ब्लाऊज शिऊन घेऊ शकता. राऊंड शेप ब्लाऊज हा खूपच स्टायलिश दिसतो. तसंच तुम्ही याचे डिझाईन अगदी सहज बनवून घेऊ शकता. यामध्ये तुम्ही वेगवेगळे प्रयोगही करू शकता. तुम्ही त्याला फ्रील जोडू शकता अथवा ब्लाऊजला राऊंडशेपच्या आत राहिलेल्या जागेत तुम्ही वेगवेगळ्या बुट्ट्या पण लाऊ शकता. 

ADVERTISEMENT

नॉटेड स्टाईल (Knotted Blouse)

Instagram

स्टायलिश लुकसाठी आणि आकर्षक दिसण्यासाठी तुम्ही नॉटेड ब्लाऊजचा वापर करून घेऊ शकता. तसंच यामुळे तुम्हाला गरमही कमी होतं. नॉटेड ब्लाऊज सध्या ट्रेंडमध्येदेखील आहे. याबरोबर तुम्ही साडीच नाही तर अगदी लाँग स्कर्टही घालू शकता. या लुकने तुम्ही अधिक स्टायलिश दिसू शकता. तसंच तुम्हाला अशा ब्लाऊजमुळे उष्णतेचा त्रासही होत नाही. 

ब्लाऊज पीसपासून कसे शिवायचे मास्क.. सांगतेय विद्या बालन

ADVERTISEMENT

डीप नेक ब्लाऊज (Deep Neck Blouse)

Instagram

तुम्हाला बॅकलेस ब्लाऊज घालायचा नसेल तर तुम्ही डीप नेक ब्लाऊज घालू शकता. यामध्ये तुम्ही अतिशय आकर्षक आणि स्टायलिश दिसू शकता. तसंच साडीला मिसमॅच ब्लाऊज असेल तर सौंदर्यात अधिक भर पडू शकेल. तुम्ही असा ब्लाऊज अगदी उत्तमरित्या कॅरी करू शकता. 

बॅकलेस ब्लाऊज घालायचा असेल तर त्यापूर्वी घ्या अशी काळजी

ADVERTISEMENT

ट्रान्सपरंट हाफ राऊंड नेक (Transparent Half Round Neck)

instagram

तुम्हाला काही नवी स्टाईल ट्राय करायची असेल आणि तुम्हाला अशा सणासमारंभामध्ये वेगळं आणि अधिक उठून दिसायचं असेल तर तुम्ही अशा डिझाईनच्या ब्लाऊजची निवड करू शकता. ट्रान्सपरंट हाफ राऊंड नेक हे अतिशय युनिक डिझाईन आहे आणि तुम्हाला हे घालून सावरणंही सोपं आहे. तसंच या ब्लाऊजमध्ये जास्त गरमही होत नाही. तुम्ही अशा स्वरूपाच्या डिझाईनमध्ये अगदी सेंटर ऑफ अट्रॅक्शन अर्थात आकर्षणाचे केंद्रबिंदू ठराल हे नक्की. आजकाल ही फॅशन महिलांना खूपच आवडत आहे. तुम्हीदेखील नक्की एकदा करून पाहा. 

सणाच्या दिवसात खास लुक देतील ब्लाऊजचे हे हॉट डिझाईन्स

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

16 Sep 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT