जोडीदाराला द्यायचंय सेक्समध्ये सुख, तर त्यासाठी सोप्या टिप्स

जोडीदाराला द्यायचंय सेक्समध्ये सुख, तर त्यासाठी सोप्या टिप्स

आपल्या आयुष्यात सध्या इतका घोळ असतो की अचानक आयुष्यात निरसता येत असते. सतत ऑफिसचं काम आणि न मिळणारा वेळ यामध्ये चिडचिड जास्त प्रमाणात वाढते. हीच गोष्ट सेक्स लाईफवरही परिणाम करत असते. कधीकधी तोचतोचपणादेखील रटाळवाणा होतो. मग अशावेळी आपल्याला प्रश्न पडतो की आपल्याला जोडीदाराला सेक्समध्ये नक्की कसं सुख देता येईल? आपल्या सेक्स लाईफमध्ये वेगळं काय करता येईल जेणेकरून हा कंटाळा आणि तोचतोचपणा निघून जाईल. याचा विचार करण्याची जास्त गरज नाही. आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगत आहोत जेणेकरून तुम्ही त्याचा उपयोग करून तुमच्या जोडीदाराला सेक्समध्ये अधिक सुख देऊ शकता आणि तुम्हालाही त्यातून आनंद मिळवता येईल. 

जोडीदाराचा मूड बनविणे

Shutterstock

तुम्हाला जर सेक्स करायचा असेल पण तुमच्या जोडीदाराचा मूड नसेल तर ही तुमची जबाबदारी आहे की, तुम्ही जोडीदाराचा मूड सेट कराल. तुम्ही त्याच्याबरोबर अशा गोष्टी बोलायला सुरूवात करा जेणेकरून तो उत्तेजित होईल. जोडीदाराचा मूड बदलतो आहे हे पाहून तुम्ही त्या पद्धतीने कपडे बदला आणि त्याला आवडतील असे कपडे घाला. जेणेकरून त्याला तुमच्या अधिक जवळ यावंसं वाटेल. तुम्ही जितकं जास्त त्यांना सेक्ससाठी उत्तेजित कराल तितका त्यांचा मूड अधिक चांगला होईल आणि तुम्हालाही त्यातून आनंद मिळेल. कधीही डायरेक्ट सेक्सला सुरूवात करू नका. बोलून अथवा फोरप्ले करून मगच सेक्सला सुरूवात करा. त्यामध्येही नवनवीन खेळ शोधून काढा. 

‘या’ नुकसानांपासून वाचायचं असेल तर करा प्राचीन नियमानुसार सेक्स

जोडीदाराला करा आकर्षित

Shutterstock

सुरूवातीला जो आकर्षकपणा एकमेकांसाठी असतो तो काही वर्षांनी कमी होतो. पण तुम्हाला जर सेक्समध्ये सुख द्यायचं असेल तर तो आकर्षिकपणा वाढवायला हवा. तुमच्या नात्याला पुन्हा नवंपण देण्यासाठी तुम्हाला दोघांनाही एकमेकांसाठी वेळ देत एकमेकांना आकर्षित करण्याची गरज आहे. जुने घालवलेले क्षण पुन्हा नव्याने आठवा आणि ते क्षण पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न करा. फोरप्ले करत जोडीदाराला अधिक आकर्षित करण्याचा प्रयत्न  करा. त्याला आवडतील असे अंतर्वस्त्र अथवा कपडे घाला जेणेकरून तो तुमच्याकडे अधिक आकर्षित होईल. 

लाजणे सोडून द्या

Giphy

तुम्ही तेव्हाच सेक्सचा आनंद घेऊ शकता जेव्हा तुम्हाला एकमेकांचा सहज स्पर्श होत असेल. कोणत्याही वेळी लाजणं हे तुम्हाला महागात पडू शकतं.  न लाजता तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर जितकं समरस व्हाल तितका तुम्हाला अधिक आनंद मिळेल. लाजल्यामुळे जोडीदाराचा जोश कमी होऊ शकतो. त्यामुळे सेक्स करताना सहसा मुलांना वाईल्ड सेक्स आवडतं, अशावेळी लाज सोडून त्याच्याशी समरस होऊन वाईल्ड सेक्स करण्याचा प्रयत्न करा. असं केल्याने तुम्हाला दोघांनाही अत्यानंद मिळेल आणि कंटाळवाण्या सेक्स लाईफमध्ये अधिक मजा येईल. 

सेक्स करताना सर्वात पहिले फिलिंग जाणवतं ते स्तनांना

मास्टरबेट करून स्वतःचा मूड बनवा

मास्टरबेशनचा पर्याय यासाठी देण्यात येत आहे की, तुमच्या आरोग्यासाठी हे जास्त चांगलं आहे. इतकंच नाही तर तज्ज्ञदेखील मास्टरबेट करण्याचा सल्ला देतात. वास्तविक आपले सेक्शुअल लाईफ निरोगी ठेवण्यासाठी हे फायदेशीर आहे. कोणतेही नको ते औषध घेण्यापेक्षा तुम्ही परफॉर्मन्ससाठी मास्टरबेट करून स्वतःचा मूड बनवू शकता. हे तुम्हाला अधिक फायदेशीर ठरते. 

डाएटमध्ये करा सुधारणा

तुम्हाला तुमच्या जोडीदाराला सेक्समध्ये सुख द्यायचं असेल तर तुम्हाला तुमच्या डाएटमध्येही सुधारणा करणे गरजेचे आहे. तुमच्या निरोगी सेक्स लाईफसाठी स्ट्रॉबेरी, बदाम, डार्क चॉकलेट यासारख्या खाण्याचा समावेश करून घ्या. तसंच तुम्हाला अधिक ऊर्जा मिळेल अशा आहारांचा समावेश करून घ्यायला हवा. 

सेक्स करण्याचे नक्की फायदे काय

धुम्रपान सोडा

Shutterstock

तुम्हाला कदाचित ही गोष्ट नक्की माहीत असेल. धुम्रपान हे सेक्स लाईफमधील परफॉर्मन्सवर जास्त परिणामकारक ठरते. त्यामुळे तुम्हाला जर सेक्समध्ये सुख हवं असेल अथवा जोडीदाराला द्यायचं असेल तर तुम्ही धुम्रपान करण्यापासून दूर राहा. तुम्ही तुमची लाईफस्टाईल बदलण्याची गरज आहे. 

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा