आजकाल आयुष्य इतकं धावपळीचं झालं आहे की बऱ्याचदा आपल्या त्वचेची काळजी घेणंही शक्य होत नाही. तर काही महिला त्वचेची काळजी घेताना फेशियल, टोनर, मॉईस्चराईजर आणि सीरम इतक्या गोष्टींचा वापर करतात. या सौंदर्य प्रसाधानांचा वापर केल्यानंतर बराच काळ त्वचेवर नक्कीच चमक पाहायला मिळते. पण तुम्हाला एकदा रात्रीत जर चेहऱ्यावर चमक हवी असेल तर तर तुम्ही आम्ही सांगितलेला हा फेसपॅक नक्की वापरून पाहू शकता. झोपताना तुम्ही हा अप्रतिम फेसपॅक लावल्यास, तुम्हाला तजेलदार त्वचा मिळेल. या मास्कने तुमची त्वचा तजेलदार तर होईलच त्याशिवाय त्यावरील चमक दिसून येईल. व्यस्त लाईफस्टाईलमुळे त्वचेला योग्य पोषण मिळत नाही. तसंच नियमित आयुष्यातील तणावामुळे त्वचेवर खूपच परिणाम होतो. त्यामुळे त्वचेची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं ठरतं. हा नाईट मास्क तुमच्या त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त आहे. पाहूया नक्की कसा वापरायचा आणि काय आहेत फायदे.
हळद ही आपल्या शरीराला अनेक गोष्टींसाठी उपयुक्त आहे. हळदीमध्ये अँटिमायक्रोबायल आणि अँटिइन्फ्लेमेटरी घटक असतात आणि हे आपल्या त्वचेवर अँटिऑक्सिडंट्सचे काम करत असतात. यामुळे त्वचेवरील अॅक्ने आणि निस्तेजपणा कमी होऊन तुम्हाला एका रात्रीत चेहऱ्यावर चमक मिळते. दुधात असणारे लॅक्टिक अॅसिड हे त्वचेला अधिक चमक देऊन त्वचेवरील निस्तेजपणा दूर करण्यास मदत करते.
कसे वापरावे
एक चमचा कच्च्या दुधामध्ये अर्धा चमचा हळद पावडर मिक्स करा. त्यानंतर त्यात कापसाचा बोळा बुडवून संपूर्ण चेहऱ्यावर हे लावा. ज्याप्रमाणे तुम्ही चेहऱ्याला टोनर लावता त्याचप्रमाणे याचा वापर करा. बेडवर झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर हे सुकू द्या. झोपताना तुम्ही उशीचे कव्हर जुने घातले आहे ना याची खात्री करून घ्या. कारण झोपेत हळदीचे डाग त्याला लागण्याची शक्यता असते. सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्याने तुम्ही चेहरा धुवा. तुम्हाला स्वतःलाच चेहऱ्यात फरक जाणवेल.
त्वचेचं सौंदर्य वाढवण्यासाठी वापरता येतात चारकोल ब्युटी उत्पादनं, काय आहेत फायदे
रात्री झोपताना त्वचा हील करण्यासाठी आणि रिपेअर करण्यासाठी हा नाईट फेसमास्क अत्यंत गुणकारी आहे. तुम्ही रात्री फेसमास्क वापरला तर त्यामुळे तुमची त्वचा तर तजेलदार होईलच त्याशिवाय त्वचेवरील समस्यादेखील दूर होईल.
दिवसाच्या वेळी फेसमास्क 20 मिनिट्स तुम्ही लाऊ शकता. पण रात्रीची वेळ अशी असते जेव्हा त्वचेला फेसमास्कमधून जास्त पोषण मिळते. रात्री मास्क लावल्याने त्वचेचे अधिक खोलपणाने पोषण होते. तसेच त्वचेला अधिक वेळही मिळतो.
तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्ही ओव्हरनाईट फेसमास्क लावा आणि त्वचेला योग्य हायड्रेशन मिळवून द्या. त्वचेला ओव्हरनाईट फेसमास्क हा अत्यंत योग्य रितीने मॉईस्चराईज आणि पोषण देण्यास फायदेशीर ठरतो. त्यामुळेच चेहऱ्यावर अधिक चांगला चमकपणा दिसून येतो.
ओव्हरनाईट फेसमास्क वापरल्याने त्वचेला तर फायदा होतोच. पण व्यस्त आयुष्यात इतका वेळ नसतो की आपण आपल्या त्वचेची काळजी घेऊ शकतो. अशा वेळी रात्रीचा वेळा हा फेसमास्क वापरून तुम्ही वेळही वाचवू शकता आणि त्याशिवाय तुम्हाला त्याचा फायदाही करून घेता येतो.
घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा