अंडरआर्म्सचा काळेपणा कमी करण्यासाठी पीलिंग आहे उत्तम पर्याय

अंडरआर्म्सचा काळेपणा कमी करण्यासाठी पीलिंग आहे उत्तम पर्याय

अंडरआर्म्सचा काळेपणा घालवण्यासाठी बटाटा,बेकिंग सोडा, लिंबू, खडे मीठ असे काही पर्याय वापरुनही तुमच्या अंडरआर्म्सचा काळेपणा जात नसेल तर तुम्हाला काही ठोस उपायांची गरज आहे. असा उपाय जो तुमच्या अंडरआर्म्सचा काळेपणा अगदी हमखास घालवू शकेल. तुमच्याप्रमाणे मीही अंडरआर्म्सच्या काळेपणामुळे त्रस्त होते. कोणत्याही कारणाशिवाय माझेही आर्म्स काळे दिसायचे. इतरांप्रमाणे अनेक उपाय केल्यानंतर शेवटी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतल्यानंतर अगदी खिशाला परवडणाऱ्या दरामध्ये तुम्हाला हे अंडरआर्म्स पीलिंग करता येते. चला तर आज आपण जाणून घेऊया या पीलिंगमध्ये नेमके काय केले जाते आणि त्याचा फायदा काय ? चला करुया सुरुवात 

फेशिअलपेक्षाही जास्त ग्लो आणतील या बजेट 'Skin treatments'

अंडरआर्म्स काळे का पडतात?

Instagram

अंडरआर्म्स काळे पडण्यामागे अनेक कारणे आहेत. 

 • अनेकदा रेझरचा चुकीचा वापर हा अंडरआर्म्स काळे करण्यासाठी कारणीभूत ठरु शकतो. 
 • अंडरआर्म्सची त्वचा खूप नाजूक असते. रेझरच्या सततच्या प्रयोगाने त्वचा कापले जाण्याची  शक्यता असते. त्याकडे दुर्लक्ष केले तर अंडरआर्म्स हमखास काळवंडतात. 
 • अंडरआर्म्समधील केस काढण्याची पद्धतही यामध्ये फार महत्वाची आहे. जर तुम्ही सतत यामध्ये बदल करत असाल तरी तुमच्या त्वचेला याचा त्रास होऊ शकतो.
 • डिओड्रंटमध्ये असलेले केमिकल्सही तुमच्या अंडरआर्म्सला काळवंडण्यास मदत करतात. तुमच्या अंडरआर्म्सची त्वचा काळवंडताना पटकन लक्षात येत नाही. 
 • अस्वच्छता हे देखील अंडरआर्म्स काळे पडण्यासाठी कारणीभूत असते. दिवसभरात आलेला घाम तुम्ही स्वच्छ पाण्याने धुवून अंडरआर्म्स वाळवणे गरजेचे असते. 

चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासोबतच त्वचा खुलवतील हे फेसऑईल

पीलिंग असे आहे फायद्याचे

Instagram

 घरगुती उपायांनी तुमचे अंडरआर्म्सचा काळेपणा जात नसेल तर तुम्ही पीलिंगचा पर्याय निवडायला काहीच हरकत नाही. पीलिंगचे काम तुमच्या त्वचेवरील मृत त्वचा काढून टाकणे आहे. त्यामुळे पीलिंग तुमच्या अंडरआर्म्सचा काळेपणा काढायचे काम करते. नेमके हे पीलिंग कशाप्रकारे केले जाते ते पाहुया. 

 • अंडरआर्म्स पीलिंगमध्ये स्किनलाईटनिंग करणारे घटक वापरले जातात. यामध्ये कोजिक अॅसिडचा वापर करण्यात येतो. 
 • स्किन एक्सपर्टला दाखवल्यानंतर तुम्हाला तुमच्या त्वचेसाठी किती सेशनची गरज आहे हे सांगितले जाते. त्यानुसार महिन्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा ही ट्रिटमेंट केली जाते. 
 • सगळ्यात आधी अंडरआर्म्स स्वच्छ केले जातात. क्लिन्झिंग आणि स्क्रब करुन तुमचे अंडरआर्म्स कोरडे केले जातात. 
 • त्यानंतर तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार कोजिक अॅसिडचा वापर करण्यात येतो. त्याची मात्र ठरवली जाते. प्रत्येक सेशलनंतर तुमची डेड स्किन निघत राहते. आणि त्वचा उजळू लागते.
 • साधारण 4 ते 5 सेटिंगमध्ये तुम्हाला फरक जाणवतो.तुमचे अंडरआर्म्स लाईट दिसू लागतात
  जर अंडरआर्म्सचा काळेपणा घालवायचा असेल तर डर्मटलॉजिस्टच्या सल्ल्याने नक्की पीलिंग करा नक्कीच फरक जाणवेल.

तुमच्या दातांच्या सौंदर्याचा विचार करणेही तितकेच गरजेचे