ADVERTISEMENT
home / Care
हेअर टाईप बघून निवडा हेअर मास्क, मिळवा बाऊन्सी आणि चमकदार केस

हेअर टाईप बघून निवडा हेअर मास्क, मिळवा बाऊन्सी आणि चमकदार केस

त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण फेसमास्क अथवा फेसपॅकचा उपयोग करून घेत असतो. याचप्रमाणे केसांची काळजी घेण्यासाठी आपल्याला हेअर मास्कची गरज असते. ज्या तऱ्हेने आपण त्वचेनुसार मास्क वापरतो तसंच आपल्याला आपल्या केसांप्रमाणे हेअर मास्क वापरता यायला हवा. हेअर मास्क वापरल्याने केसांचे मूळ हायड्रेट राहते आणि त्यामुळेच नियमितपणे आपण हेअर मास्क वापरायला हवा. तुम्हाला जर बाऊन्सी आणि चमकदार केस हवे असतील तर आपले केस कसे आहेत, आपला हेअर टाईप कोणता आहे ते पाहून आपण हेअर मास्क निवडणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही या लेखातून हेअर टाईप आणि हेअर मास्क या दोन्हीची माहिती देत आहोत. तुम्हीही याचा योग्य वापर करून तुमच्या केसांना अधिक चमकदार आणि बाऊन्सी बनवू शकता. 

कोरडे आणि निस्तेज केस

Shutterstock

तुमचे केस कोरडे आणि निस्तेज असतील तर त्यामध्ये मुलायमपणाची कमतरता असते. त्यामुळे तुमच्या अशा केसांसाठी हायड्रेटिंग हेअर मास्क अगदी योग्य ठरतो. यामुळे तुमच्या केसांना पोषणही मिळते आणि तुमच्या केसांचा कोरडेपणाही दूर होतो. तसंच हा हेअर मास्क वापरल्याने केसांची चांगली वाढ होण्यास मदत मिळते. आपल्या केसांना पोषण देण्यासाठी तुम्ही कंडिशनर आणि ग्लिसरीनवाला हेअर मास्क वापरू शकता. त्यामुळे तुमचे केस मुलायम होण्यास मदत मिळते. कोरडे केस हायड्रेशन कमी असल्यामुळे होतात. त्यामुळे अशा हेअर मास्कचा तुम्हाला वापर करायला हवा.

ADVERTISEMENT

लांब घनदाट केस हवे असतील तर टाळा ‘या’ चुका

कुरळे केस

Shutterstock

कुरळे केस हे नैसर्गिकरित्याच कोरडे असतात. त्यामुळे कुरळ्या केसांसाठी हेअर मास्क वापरणे अत्यंत गरजेचे असते. आठवड्यातून किमान एकदा तरी हेअर मास्क कुरळे केस असणाऱ्यांनी वापरायला हवा. यामुळे केसांमध्ये बाऊन्स आणि चमक राखण्यास मदत मिळते. तसंच डॅमेज रिपेअर रिकन्स्ट्रक्शन हेअर मास्क तुम्ही कुरळ्या केसांसाठी वापरू शकता. कुरळ्या केसांमध्ये जास्त गुंता होतो आणि त्यामुळे केस खराब होण्याची जास्त चिंता असते. त्यामुळे हेअर मास्कचा उपयोग करून केसांची निगा राखणे गरजेचे आहे. 

ADVERTISEMENT

कढीपत्त्याचा हेअर मास्क तयार करून मिळवा सुंदर केस

पातळ केस

Shutterstock

पातळ केसांसाठी लाईट वेट हायड्रेटिंग जोजोबा ऑईल योग्य आहे. तुमचे केस पातळ असून जास्त कोरडे असतील तर तुम्ही हेअर कंडिशनर मास्कचा वापर करा. पातळ केसांना पोषण देण्यासाठी तुम्ही नारळाच्या तेलाचाही वापर करून घेऊ शकता. पातळ केस पटकन तुटतात त्यामुळे त्यांची काळजी घेणं कठीण काम आहे. पण तुम्ही या हेअर मास्कचा वापर करून केसांची काळजी घेऊ शकता. 

ADVERTISEMENT

केस घनदाट दिसण्यासाठी वापरा 7 सोप्या टिप्स

तेलकट केस

Shutterstock

तेलकट केसांची काळजी घेणं तसं तर कठीण काम आहे. तेलकट केसांना मुलायम ठेवण्याची गरज भासत नाही. त्यामुळे केसांना पोषण देणे गरजेचे आहे पण चिकटपणा न येऊ देण्याचीही काळजी घ्यायची असते. त्यामुळे अँटिऑक्सिडंट्सवाला हेअर मास्क तुम्ही अशा केसांसाठी वापरू शकता. तसंच तुम्ही नारळाचे तेल केसांच्या मुळांना लावा आणि टॉवेल गरम पाण्यात भिजवून तो पिळून साधारण अर्धा तास केसांना बांधून ठेवा. नंतर शँपूने केस धुवा. महिन्यातून असं तुम्ही एकदा करा. त्यामुळे तुमचे केस अधिक सुंदर आणि चमकदार होतील आणि तेलकटपणाही दिसणार नाही. 

ADVERTISEMENT

घरगुती उपायांनी मिळवा सुंदर केस

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा  

09 Sep 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT