लांबसडक आणि घनदाट पापण्यांसाठी वापरा होममेड सीरम

लांबसडक आणि घनदाट पापण्यांसाठी वापरा होममेड सीरम

सुंदर डोळे हे सर्वांनाच आवडतात आणि आपले डोळे सुंदर दिसावे आणि पापण्या लांबसडक असाव्यात असं प्रत्येकालाच वाटतं. पापण्यांमुळे डोळ्यांचं सौंदर्य अधिक वाढतं आणि त्या सौंदर्यात भर पडते. आपल्या पापण्या सुंदर दिसाव्यात यासाठी मस्कारा बऱ्याच प्रमाणात वापरला जातो. अगदी पापण्यांना कर्ल करून किंवा सरळ ठेवण्यासाठी मस्कारा वापरतात. पण मस्कारा सतत वापरत राहिल्यास पापण्या गळतात हे तुम्हाला माहीत आहे का? त्यामुळे तुमचे डोळेही खराब दिसू लागतात. तसंच सतत मेकअप करत राहिल्यास, डोळ्यांमध्येही निस्तेजपणा दिसून येतो. आजकाल बऱ्याचदा आर्टिफिशियल पापण्या अर्थात खोट्या पापण्या लावल्या जातात. याचा आता ट्रेंडच आला आहे. पण तुम्हाला नैसर्गिकरित्या पापण्या घनदाट हव्या असतील तर तुम्ही होममेड सीरमचा वापर करू शकता. हे सीरम वापरून तुम्हाला घनदाट पापण्या तर मिळतीलच त्याशिवाय कोणताही दुष्परिणामही होणार नाही. तसंच आर्टिफिशियल पापण्यांचा उपयोगही करावा लागणार नाही. जाणून घेऊया घरच्या घरी कसे बनवायचे हे सीरम.

परमनंट आयलॅश एक्स्टेन्शन मिळवा लांब पापण्या

सीरम बनविण्याची पद्धत

Shutterstock

पापण्या घनदाट आणि लांबसडक होण्यासाठी तुम्ही घरच्या घरी सीरम बनवू शकता. कशा पद्धतीने हे बनवायचे जाणून घ्या - 

  • कॅस्टर ऑईल (एरंडेल तेल), विटामिन ई कॅप्सुल आणि नारळाचे तेल घ्या आणि हे मिक्स करा 
  • कॅस्टर ऑईल अतिशय घट्ट असते. त्यामुळे त्यामुळे नारळाच्या तेलाचे प्रमाण जास्त लागते. हे दोन्ही एकसमान होईल इतके नारळाचे तेल घाला 
  • या मिश्रणात विटामिन ई कॅप्सुल मिक्स करा
  • हे सर्व मिक्स करून तुम्ही एका ड्रॉपवाल्या बाटलीमध्ये भरून ठेवा
  • रात्री झोपताना आपल्या पापण्यांना हे तेल लावा
  • नियमित असे केल्यास, तुमच्या पापण्या घनदाट होतील

आयलॅश कर्लर वापरताना कधीच करू नका या चुका

सीरम लावण्याची पद्धत

Shutterstock

सर्वात पहिल्यांदा तुम्ही वर सांगितल्याप्रमाणे मिश्रण तयार करा आणि हे मिश्रण आपल्या हातावर घ्या. आपल्या बोटांच्या सहाय्याने अगदी हलक्या पद्धतीने पापण्यांना लावा. सीरमचा उपयोग रात्रीच करावा. रात्रभर लावल्याने सीरमचा जास्त फायदा मिळतो. कारण झोपेत हे तेल जास्त वेळा पापण्यांच्या केसांवर टिकून राहते आणि त्यातील गुणधर्म त्यामध्ये उतरतात. यामुळे तुमच्या पापण्यांना कोणताही प्रकारचा त्रास होत नाही आणि तुमच्या पापण्या अधिक घनदाट होण्यास मदत मिळते. तसंच हे नैसर्गिक असल्याने तुम्हालाही फायदेशीर ठरते. 

हव्यात दाट आणि सुंदर पापण्या, तर नक्की करा हे सोपे उपाय

सीरमचा मिळणारा फायदा

कॅस्टर ऑईलमध्ये ओमेगा 6 विटामिन प्रोटीन मिळतात, जे केसांच्या विकासासाठी उत्तम असते. तसंच विटामिन ई हे केसांसाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे या दोघांचे मिश्रण हे पापण्यांचे केस घनदाट करण्यासाठी फायदेशीर ठरते. नारळाच्या तेलाने यामध्ये अधिक भर पडते. मुळातच कॅस्टर ऑईल, नारळाचे तेल हे केसांच्या वाढीसाठी उपयुक्त असते. त्यामुळे याचे गुणधर्म तुमच्या पापण्यांच्या केसांसाठीही लागू पडतात. तुम्ही अशा प्रकारे सीरम घरच्या घरी बनवून तुम्ही तुमच्या पापण्यांना अधिक सुंदर आणि आकर्षक बनवू शकता.

तुम्हाला अगदी क्रुअल्टी फ्री मस्कारा हवा असेल तर तुम्ही MyGlamm चा मस्कारा नक्की वापरू शकता. याचा कोणताही प्रयोग हा प्राण्यांवर करण्यात आलेला नाही.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

 

Beauty

Manish Malhotra Glitter Mascara Topcoat

INR 950 AT MyGlamm