हेल्दी लाईफसाठी प्या हे व्हेजीटेबल ज्युस (Vegetable Juice Recipes In Marathi)

Vegetable Juice Recipes In Marathi

दिवसभर फ्रेश आणि उत्साही राहण्यासाठी तुमचे शरीर योग्य प्रमाणात हायड्रेट राहणं गरजेचं आहे. सकाळी उठल्याबरोबर फ्रेश होण्यासाठी अनेकांना चहा,कॉफी घेण्याची सवय असते. मात्र ही सवय शरीरासाठी हानिकारक असून यामुळे तुमच्या शरीराला योग्य पोषण मुळीच मिळत नाही. यासाठीच सकाळच्या नाश्त्यामध्ये निरनिराळ्या व्हेजीटेबल ज्युसचा समावेश करा. ज्यामुळे तुम्हाला त्वरीत फ्रेश तर वाटेलच शिवाय तुमचा संपूर्ण दिवस उत्साहित जाईल. कारण या ज्युसमधून तुमच्या शरीराला या भाज्यांमधील पोषक घटकही मिळत असतात. यासाठी जाणून घ्या कोणकोणत्या व्हेजीटेबल ज्युसचा (vegetable juice recipe in marathi) यासाठी तुम्ही आहारात समावेश करू शकता.

Table of Contents

  भोपळ्याचा ज्युस (Pumpkin Juice)

  साहित्य - 

  • एक वाटी भोपळ्याच्या फोडी
  • एक मध्यम आकाराचं सफरचंद
  • एका लिंबाचा रस
  • एक इंच किसलेले आले
  • चवीपुरते मीठ

  कृती -

  • भोपळा चिरून शिजवून आणि थंड करून घ्या
  • सफरचंदाची साल काढून ते चिरून घ्या. 
  • ज्युसरमध्ये भोपळा, आल्याचा किस आणि सफरचंद टाका आणि त्याचा रस काढा. 
  • रस गाळून घ्या आणि ग्लासामध्ये ओता
  • वरून मीठ आणि लिंबू टाका 

  फायदा - 

  भोपळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अॅंटि ऑक्सिडंट असतात. ज्यामुळे भोपळ्याचा वापर आहारात करणं फायदेशीर ठरू शकतं. भोपळ्याचा ज्युस पिण्यामुळे तुम्हाला दिवसभर उत्साहित वाटतेच शिवाय यामध्ये कॅलरिज कमी प्रमाणात असल्यामुळे तुमचे वजनही वाढत नाही. चमकणारी त्वचा आणि आरोग्यासाठी रस प्या

  Instagram

  गाजराचा ज्युस (Carrots Juice)

  साहित्य -

  • दोन गाजर
  • एक मुठभर कोंथिंबीर
  • एक चमचा अॅपल सायडर व्हिनेगर
  • एक चिमुट सैंधव

   कृती -

  • गाजर स्वच्छ धुवून चिरून घ्या
  • मिक्सरमध्ये गाजर आणि कोथिंबीरी वाटून त्याचा रस काढा
  • ग्लासामध्ये रस गाळून घ्या
  • वरून अॅपल सायडर व्हिनेगर आणि सैंधव टाका
  • चांगले ढवळून मग गाजराचा फ्रेश ज्युस प्या

  फायदा -

  गाजराच्या या ताज्या रसामधून तुम्हाला पचनासाठी उत्तम असे फायबर्स मिळतात. गारजरामध्ये बीटा कॅरोटीन आणि अ जीवनसत्त्व भरपुर प्रमाणात असतं. ज्यामुळे तुम्हाला हा ज्युस प्यायल्यावर लगेचच फ्रेश वाटतं. यामुळे तुमची दृष्टी सुधारते. गाजराच्या ज्युसमुळे तुमची प्रतिकार शक्ती वाढते. आजारपणापासून दूर राहण्यासाठी आणि सुदृढ शरीरप्रकृतीसाठी हा व्हेजीटेबल ज्युस अगदी परफेक्ट आहे. 

  Instagram

  बीट ज्युस (Beetroot Juice)

  साहित्य -

  • एक बीट
  • एक कप पाणी
  • अर्धा चमचाच जीरा पावडर
  • पाव वाटी लिंबाचा रस
  • चिमुटभर मीठ

  कृती -

  • बीट स्वच्छ धुवून एक कप पाण्यामध्ये मिक्समध्ये वाटून घ्या
  • बीटचा ज्युस एका ग्लासामध्ये गाळून घ्या
  • या  ज्युसमध्ये जीरा पावडर, लिंबाचा रस आणि मीठ टाकून चांगलं ढवळून घ्या.

  फायदे -

  बीटामध्ये व्हिटॅमिन बी 1, बी 2 आणि सी भरपूर असते. शिवाय यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, लोह, फॉलिक अॅसिडही पुरेसं असते. बीटचा रस वजन कमी करण्यासाठी अतिशय उत्तम आहे. शिवाय बीट खाण्यामुळे हिमोग्लोबिन वाढते. त्यामुळे या रसामुळे तुम्हाला सशक्त आणि फ्रेश वाटते. शरीरातील फॅट आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी तुम्ही आहारात याचा समावेश करू शकता आणि काढते शरीरात विटामिन सी ची असेल कमतरता.

  Instagram

  कोबीचा ज्युस (Cabbage Juice)

  साहित्य - 

  • एक मध्यम आकाराचा कोबी
  • एक मध्यम आकाराचे बीट
  • दोन संत्री
  • चवीपुरते मीठ

  कृती -

  • कोबी स्वच्छ धुवून कापून घ्या
  • बीट धुवून सोलून आणि चिरून घ्या
  • कोबी आणि बीट ज्युसमध्ये वाटून घ्या 
  • संत्रीदेखील ज्युसरमध्ये फिरवा
  • तीनही ज्युस एकत्र करा आणि गाळून ग्लासात सर्व्ह करा
  • वरून तुमच्या आवडी आणि चवीप्रमाणे मीठ अथवा सैधव टाका

  फायदा -

  कोबीची भाजी सर्वांना आवडतेच असं नाही पण कोबी खाण्यामुळे शरीराला खूप फायदा होतो. जर तुम्हाला कोबीची भाजी आवडत नसेल तर तुम्ही कोबीचा ज्युस या पद्धतीने घेऊ शकता. या ज्युसमुळे तुमची त्वचा निरोगी आणि तुकतुकीत होईल. शिवाय कोबीमुळे केसही मजबूत आणि लांब होतात. कोबीच्या ज्युसमुळे पोटाच्या  समस्या कमी होतात. डोळ्यांच्या समस्या असल्यास कोबीचा रस पिण्याने दृष्टी दोषही कमी होतात. कोबीमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते.

  वाचा - उन्हाळ्यात कोकम सरबत पिण्याचे फायदे

  Instagram

  पालक ज्युस (Spinach Juice)

  साहित्य -

  • एक वाटी चिरलेला पालक
  • एक वाटी सोलून चिरलेलं सफरचंद
  • चवीपुरतं मीठ

  कृती -

  • ब्लेंडरमध्ये अथवा ज्युसरमध्ये पालक आणि सफरचंद वाटून घ्या
  • ग्लासात ते मिश्रण गाळून घ्या
  • चवीपुरते मीठ वरून टाका

   फायदा- 

  पालकमध्ये व्हिटॅमिन ई, लोह, फॉलेट आणि फायबर्स असतात शिवाय सफरचंदात फ्लेवेनॉईड आणि भरपूर फायबर्स असतात. या दोन्हींच्या मिश्रणामुळे हा ज्युस एक अफलातून पेय ठरू शकतं. कारण यामुळे तुम्हाला त्वरीत फ्रेश वाटतं. शिवाय नियमित हा ज्युस पिण्याने तुमचं वजनही नियंत्रित राहतं. पालकांचा रस सपाट पोटसाठी एक डिटोक्स पेय आहे.

  Instagram

  ब्रोकोली ज्युस (Broccoli Juice)

  साहित्य -

  • एक वाटी ब्रोकोली
  • एक वाटी द्राक्ष
  • चिमुटभर काळी मिरी
  • चवीपुरतं मीठ

  कृती -

  • ब्रोकोली आणि द्राक्षं स्वच्छ धुवून ज्युसरमध्ये वाटून घ्या
  • ग्लासात हे मिश्रण गाळून त्यात वरून काळीमिरी आणि मीठ टाका

  फायदा -

  ब्रोकोली ही एक उत्कृ्ष्ट भाजी आहे. ब्रोकोलीचा तुरटपणा आणि द्राक्षांचा गोडवा यामुळे हा ज्युस खूपच टेस्टी लागतो. शिवाय यामुळे तुमच्या शरीराला व्हिटॅमिन्स ए आणि सी, मिनरल्स, कॅलशियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस भरपूर प्रमाणात मिळते. सकाळी नाश्ता करताना हा  एक पटकन करण्यासारखा व्हेजीटेबल ज्युस आहे.

  Instagram

  कारल्याचा ज्युस (Gourd Juice)

  साहित्य -

  • एक कारले
  • चिमुटभर मीठ

  कृती -

  • कारले स्वच्छ धुवा आणि चिरा
  • ब्लेंडरमध्ये कारल्याचा रस काढा
  • ग्लासात तो गाळून घ्या आणि त्यात मीठ टाका

  फायदा -

  कारल्याचा ज्युस म्हटल्याबरोबर तुमच्या तोंडाला कडवट पणा आला असेल. पण हा ज्युस तुमच्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. मधुमेहींनी रक्तातील साखर वाढू नये म्हणून हा रस अवश्य घ्यावा. त्याचप्रमाणे ज्यांना लवकर वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी कारल्याचा रस अतिशय फायदेशीर ठरू शकतो.

  Instagram

  काकडीचा ज्युस (Cucumber Juice)

  साहित्य -

  • एक काकडी
  • अर्धा लिंबू
  • चिमुटभर मीठ

  कृती -

  • काकडी धुवून आणि सोलून मिक्समध्ये वाटून घ्या
  • एका ग्लासात हा रस गाळून घ्या
  • चवीपुरते मीठ टाका आणि प्या

  फायदा  -

  काकडी ही एक रसाळ भाजी आहे. ज्यामुळे काकडीचा रस भरपूर प्रमाणात मिळतो. शिवाय हा रस पिण्याने तुम्हाला फ्रेश आणि उत्साही वाटते. वजन कमी करण्यासाठी दररोज काकडीचा रस पिणे फायदेशीर ठरेल. कारण यामुळे तुमच्या शरीरातील सर्व टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात. भुक शमवण्यासाठी आणि अपथ्यकारक खाणे टाळण्यासाठी सकाळी आणि जेवण्याच्या मधल्यावेळी तुम्ही हा ज्युस घेऊ शकता. 

  Instagram

  गव्हांकुरांचा ज्युस (Wheatgrass Juice)

  साहित्य -

  • एक वाटी चिरलेले ताजे गव्हांकुर
  • अर्धी वाटी लिंबाचा रस
  • चिमुटभर मीठ

  कृती -

  • मिक्सरमध्ये गव्हांकुर चांगले वाटून घ्या
  • ग्लासामध्ये हा रस गाळून घ्या
  • लिंबाचा रस आणि मीठ टाका
  • चांगलं ढवळून लगेच प्या

  फायदा -

  शरीर डिटॉक्स करण्यासाठी गव्हांकुर अतिशय  उत्तम पर्याय आहे. कारण यामुळे तुमच्या शरीरातील सर्व टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात. ज्यामुळे तुमच्या वजनावरही योग्य नियंत्रण राहते. यात भरपूर प्रमाणात फायबर्स असल्यामुळे तुम्हाला हा ज्युस घेतल्यावर सारखी भुकही लागत नाही. 

   

  Instagram

  टोमॅटो ज्युस (Tomato Juice)

  साहित्य -

  • एक वाटी चिरलेला टोमॅटो
  • एक वाटी चिरलेली काकडी
  • अर्धा वाटी लिंबाचा रस
  • चिमुटभर मीठ

  कृती -

  • टोमॅटो आणि काकडी ज्युसरमध्ये वाटून घ्या
  • ग्लासात हा रस गाळून घ्या
  • मीठ आणि लिंबाचा रस मिक्स करा

  फायदा -

  टोमॅटो चवीला आंबट तर काकडी थंडगार असते. त्यामुळे या दोन्ही भाज्यांचा रस तुमच्या शरीराला थंडावा देतो. या ज्युसमधून तुम्हाला व्हिटॅमिन्स,कॅलशियम, लोह, फॉस्फरस, झिंक मिळते. रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी या व्हेजीटेबल ज्युसचा आहारात समावेश करायलाच हवा.

  Instagram

  दुधीचा ज्युस (Bottle Gourd Juice)

  साहित्य -

  • एक मध्यम आकाराची धुवून चिरलेली दुधी
  • एक कप कलिंगडाच्या फोडी
  • एक वाटीभर कोथिंबीर
  • चिमुटभर जीरा पावडर
  • चिमुटभर सैधव

  कृती -

  • दुधी, कलिंगड आणि कोथिंबीर मिक्सरमध्ये वाटून घ्या
  • ग्लासात हा रस गाळून घ्या
  • जीरा पावडर आणि सैधव टाका

  फायदा -

  वजन कमी करण्यासाठी दुधी ही एक पथ्यकारक भाजी आहे. शिवाय कलिंगडामुळे या ज्युसला एक छान चव येते. या दोन्ही रसांच्या मिश्रणामुळे तुमच्या शरीराला अॅंटि इनफ्लैमटरी आणि अॅंटि बॅक्टेरिअल घटक मिळतात. शिवाय यामध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सही आहेत. ज्यामुळे तुमचे पोषण होते आणि तुम्हाला उत्साही वाटू लागते. 

  Instagram

  मिक्स व्हेज ज्युस (Mixed Veg Juice)

  साहित्य -

  • एक वाटी गाजर
  • एक वाटी टोमॅटो
  • अर्धी वाटी बीट
  • एक वाटी दुधी
  • एक छोटा कोबी
  • एक इंच आले
  • अर्धी वाटी लिंबू
  • एक चमचा काळीमिरी
  • अर्धा चमचा सैधव

  कृती -

  • सर्व भाज्या स्वच्छ धुवून आणि चिरून घ्या
  • धुतलेल्या भाज्या मिक्सरमध्ये वाटून घ्या
  • एका मोठ्या भांड्यांमध्ये गाळून मग ग्लासातमध्ये ओता
  • वरून लिंबाचा रस, सैधव आणि काळीमिरी टाका

  फायदे -

  सर्व प्रकारच्या भाज्यांमधून तुम्हाला व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मिळत असतात. या ज्युससाठी तुम्ही तुम्हाला आवडतील आणि घरात उपलब्ध असतील त्या भाज्या घेऊ शकता. मिक्स व्हेज ज्युस पिण्यामुळे तुम्हाला सर्व प्रकारचे पोषक घटक मिळतात. सर्व भाज्यांमधील आरोग्यदायी फायदे एका ग्लासभर ज्युसमधून मिळण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. मिक्स व्हेज ज्युस नियमित घेतल्याने वजन कमी होते. 

  पुढे वाचा - 

  Lauki Juice Benefits in Hindi

  Instagram