वजन कमी करण्यासाठी नेहमी नवनवीन डाएट आणि प्रकार ऐकायला मिळत असतात. सध्या व्यायाम, डाएट सोबतच वजन कमी करण्यासाठी इंटरमिटेंट फास्टिंग (Intermittent Fasting) कडे लोकांचा कल दिसून येत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'मसाबा मसाबा' या वेबसिरिजमध्ये फराह खान इंटरमिटेंट फास्टिंग करते असं दाखवण्यात आलं होतं. वजन कमी करण्यासाठी तुम्ही कोणताही उपाय करा मात्र त्याबद्दल आधी सर्व माहिती जाणून घ्या. नाहीतर फायद्यांच्या ऐवजी तुम्हाला नुकसानच होऊ शकतं. यासाठीच जाणून घ्या काय आहे हे इंटरमिटेंट फास्टिंग आणि वजन कमी करण्यासाठी ते खरंच प्रभावी आहे का ?
इंटमिटेंट फास्टिंग म्हणजे निरोगी जीवनशैलीसाठी दिवसाचे काही ठराविक तास उपाशी राहणं अथवा उपवास करणं. डाएटप्रमाणेच वजन कमी करण्यासाठी हा एक प्रभावी प्रकार सध्या प्रचलित होत आहे. यात दिवसाची काही ठराविक तास तुम्हाला चक्क तुम्हाला कडक उपवास करावा लागतो. या फास्टिंगची वेळ तुम्ही तुमच्या सोयीनुसार ही वेळ ठरवू शकता. या प्रकारात तुम्ही काय खाता यापेक्षा कधी खाता याला जास्त महत्व आहे. उपवास करत आहात तर त्याचे फायदे आणि नुकसान जाणून घ्या.
तुम्हाला जर इंटरमिटेंट फास्टिंग करायचे असेल त्याआधी तुम्हाला याचे काही प्रकार माहीत असायला हवे. मात्र यातील कोणताही प्रकार ट्राय करण्यापूर्वी तुमच्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
या प्रकारानुसार तुम्हाला दिवसभरात सोळा तास उपाशी राहावे लागते. यात जर तुम्ही सकाळी आठ वाजता नाश्ता केला तर त्यानंतर थेट सायंकाळी चार वाजता काहीतरी खाऊ शकता. त्यानंतर तुम्ही पुन्हा सकाळी आठ वाजता नाश्ता करू शकता.
या प्रकारात तुम्हाला आठवड्यातील पाच दिवस तुमच्या मनाप्रमाणे खाण्याची संमती असते. मात्र आठवड्याचे कोणतेही दोन दिवस तुम्ही ठराविक आहारच करू शकता. ठराविक कॅलरी मिळतील इतकाच आहार या दोन दिवसांमध्ये तुम्हाला करता येतो. आठवड्यातील हे दोन दिवस कोणते असतील हे तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे ठरवू शकता.
या प्रकारात तुम्हाला दररोज उपवास करण्याऐवजी एक दिवस आड उपाशी राहता येतं. तुम्ही ज्या दिवशी उपवास करणार नाही आहात त्या दिवशी तुम्हाला तुमच्या आवडीचे पदार्थ खाता येतात मात्र उपवासाच्या दिवशी ठराविक वेळेनुसार आणि मर्यादित पदार्थच खावे लागतात
याचप्रमाणे तुम्ही 24 तास, 36 तास, दिवसभरात एकच वेळ जेवणं अशा प्रकारेही इंटरमिटेंट फास्टिंग करू शकता.
इंटरमिटेंट फास्टिंगचा सर्वात मोठा फायदा हा होतो की यामुळे तुमचे वजन झपाट्याने कमी होऊ शकते. वजन कमी करण्यासाठी आणि बेली फॅट कमी करण्यासाठी इंटरमिटेंट फास्टिंग नक्कीच फायद्याचे आहे. ह्रदयाचे आरोग्य राखण्यासाठी, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी, निरोगी जीवनशैलीसाठी, सुदृढ शरीरासाठी तुम्ही इंटरमिटेंट फास्टिंगचा वापर नक्कीच करू शकता. मात्र ते तुम्हाला कितपत झेपत आहे यावर पुढचं सर्व अवलंबून आहे.
इंटरमिटेट फास्टिंग करताना तुम्ही फायबरयुक्त पदार्थ, फळं, ज्युस, काही प्रमाणात कॅलरीयुक्त पदार्थ, प्रोटिन्सयुक्त पदार्थ आणि जास्तीत जास्त पाणी आणि जलयुक्त पदार्थ सेवन करू शकता. मात्र हे डाएट सुरू करताना योग्य डायटीशिअनचा सल्ला अवश्य घ्यावा. ज्यामुळे तुम्हाला चांगला फायदा मिळू शकेल.
इंटरमिटेंट फास्टिंग हा एक प्रकारचा कडक उपवासच आहे. त्यामुळे ज्यांचे वजन मुळातच खूप कमी आहे, लहान मुलं, वयात येणारे मुलंमुली, वृद्ध मंडळी, गरोदर आणि स्तनपान देणाऱ्या स्त्रीया,आजारी व्यक्ती, रक्तदाबाची समस्या असलेली माणसं यांनी हे मुळीच करू नये. कारण यामुळे त्यांच्या शरीरावर बराच काळ उपाशी राहील्यामुळे दुष्परिणाम होऊ शकतात. शिवाय इतर लोकांनाही सुरूवातीला कमी वेळासाठी इंटरमिटेंट फास्टिंगने सुरूवात करावी. सर्वात महत्वाचं म्हणजे इंटरमिटेंट फास्टिंग सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. ज्यामुळे तुमच्यासाठी हे योग्य आहे की नाही ते तुम्हाला नक्कीच समजू शकेल.