आकर्षक ओठ करणारी 'लिप ब्लशिंग' ट्रिटमेंट नक्की काय आहे

आकर्षक ओठ करणारी 'लिप ब्लशिंग' ट्रिटमेंट नक्की काय आहे

सध्या काही महिला आपले सौंदर्य टिकविण्यासाठी सेमी परमनंट ब्युटी ट्रिटमेंट करून घेत आहेत. उदाहरणार्त मायक्रो, आयशॅडो एक्स्टेंशन, फिलर्स आणि आयलायनर टॅटूज. इतकंच नाही तर आजकाल मुली लिप ब्लशिंगही करून घेत आहेत. लिप ब्लशिंगमुळे आपल्या ओठांचा आकार आणि आकर्षकता पूर्णतः बदलते. पण तुम्हाला नक्की लिप ब्लशिंग म्हणजे काय? हे माहीत आहे का? लिप ब्लशिंग ही एक सेमी परमनंट ब्युटी ट्रिटमेंट असून ओठांना अधिक सुंदर आणि आकर्षक दर्शविण्याची प्रक्रिया आहे. ही ट्रिटमेंट करत असताना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. तर याचा उपयोग ओठांचे सौंदर्य नैसर्गिकरित्या वाढविण्यासाठी करण्यात येतो. याबद्दल अधिक माहिती आम्ही तुम्हाला या लेखातून देणार आहोत. कारण अजूनही बऱ्याच जणांना याबाबत पूर्ण माहिती नाही. त्यामुळे आपण सर्वात आधी जाणून घेऊया ‘लिप ब्लशिंग’ म्हणजे नेमके काय?

फक्त लिपस्टिक नाही तर ‘हे’ 5 Lip Balm करतील तुमच्या ओठांना अधिक आकर्षक

‘लिप ब्लशिंग’ म्हणजे नेमके काय?

Shutterstock

काही महिलांसाठी ‘लिप ब्लशिंग’ हा शब्द अगदीच नवा असण्याची शक्यता आहे. पण हल्ली लिप ब्लशिंगबद्दल ठिकठिकाणी बऱ्याच चर्चा आपल्याला ऐकायला मिळतात. ओठांचे सौंदर्य वाढविण्यासाठी करण्यात येणारी अशी एक सेमी परमनंट ट्रीटमेंट आहे. अर्थात ओठ कायम लिपस्टिक लावल्यासारखे दिसतात. ही ट्रीटमेंट साधारणतः 1 वर्ष चालू राहाते. यामध्ये ओठांवर सुईच्या मदतीने पिगमेंटेड इंक डिपॉझिट करण्यात येते. ज्यामुळे तुमचे ओठ अधिक फुलर होतात अर्थात मोठे दिसतात. त्याचप्रमाणे यामध्ये टिंट्सच्या सहाय्याने ओठांना नैसर्गिक लुक देण्यात येतो. साधारणतः 6 टचमध्ये ही ट्रीटमेंट पूर्ण होते. यामध्ये दुखापत अथवा जास्त त्रास होत नाही. त्यामुळे लिप टॅटूऐवजी लिप ब्लशिंग करून घेण्यासाठी महिलांमध्ये पसंती दर्शविण्यात आली आहे. यामध्ये ट्रिटमेंट झाल्यावर तुमच्या शेडनुसार तुम्ही तुमच्या ओठांवर वेगवेगळ्या लिपस्टिक शेड्स वापरू शकता.

काळे ओठ गुलाबी करण्यासाठी घरगुती उपाय, सोप्या पद्धती (Home Remedies For Dark Lips)

Beauty

LIT - pH Lip Balm - Rose All Day

INR 345 AT MyGlamm

Make Up

MyGlamm K.Play Flavoured Lipstick

INR 499 AT MyGlamm

लिप ब्लशिंग लिप टॅटूपेक्षा कसं वेगळं आहे?

Shutterstock

बऱ्याचदा ब्लशिंगला लिप टॅटू अथवा लिप फिलर समजण्यात येतं. पण या दोन्ही गोष्टी अतिशय वेगळ्या आहेत. भिन्न आहेत. लिप फिलर्स अथवा लिप टॅटू करताना खूपच त्रास होतो. पण लिप ब्लशिंगमध्ये तुमच्या ओठांशी मिळताजुळता रंग वापरण्यात येतो. ज्यामुळे तुमचे ओठ नैसर्गिक आकर्षक आणि सुंदर दिसतात. तसंच लिप ब्लशिंग केल्यानंतर केवळ तीन ते पाच दिवसात तुम्हाला आराम मिळतो. याचा जास्त त्रास होत नाही. त्यानंतर तुम्हाला कमीत कमी दोन वर्ष ओठांसाठी काहीही वेगळं करण्याची गरज भासत नाही. तुम्हाला दोन वर्षानंतर यासाठी रिटच करावे लागते.

गुलाबी ओठ हवे असतील तर करा वेलचीचा वापर

लिप ब्लशिंग करणार असल्यास, घ्या ही काळजी

आपले ओठ अधिक आकर्षक दिसण्यासाठी जर तुम्ही लिप ब्लशिंग करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात

  • सर्वात पहिल्यांदा तुम्ही तुमच्या अॅस्थेटिशयनसह याबाबत चर्चा करा आणि यासाठी कोणती शेड योग्य आहे ते नीट विचारून घ्या 
  • अधिक महिला नैसर्गिक रंगाचा अर्थात शेडचा वापर करतात जेणेकरून त्यांचे ओठ नैसर्गिक सुंदर दिसतील
  • लाईट शेडचा वापर करा जेणेकरून गडद लिपस्टिकची शेड लावल्यानंतर ओठ अधिक आकर्षक आणि सुंदर दिसतील
    लिप ब्लशिंग ट्रिटमेंटच्या आधी ओठांना सुन्न करून त्यावर क्रिमचा वापर करण्यात येतो. त्यानंतर तुम्हाला थोडीशी झणझण ओठांवर जाणवते. पण तुम्ही तज्ज्ञांकडून याची ट्रिटमेंट करून घेत असाल तर तुम्हाला दुष्परिणामांना सामोरं जावं लागत नाही
  • तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार ट्रिटमेंट घेतल्यानंतर नियमांचे पालन करा. असं करणं अत्यंत गरजेचे आहे

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक