ADVERTISEMENT
home / Care
केसांसंदर्भात या आहेत 10 अफवा

केसांसंदर्भात या आहेत 10 अफवा

सुंदर, काळेभोर, लांबसडक केस कोणाला नको असतात. केस दीर्घ काळासाठी चांगले राहावे म्हणून आपण बऱ्याच गोष्टी करतो. केसांना तेलमालिश, केस कापणे,केसांसाठी वेगवेगळे मास्क लावणे पण हे सगळं करत असताना केसांसंदर्भात काही अफवाही आपणच तयार करत असतो. केसांसंदर्भात एकदा का काही अफवा तयार झाल्या तर त्या अफवा पुढे पुढे जाऊन त्या संदर्भात अनेक भाकित तयार होतात. केसांसदर्भात तुम्हाला काही अफवा माहीत आहेत का? नाही! आम्ही शोधून काढल्या आहेत केसांसंदर्भातील अशा 10 अफवा ज्या सगळ्याच महिलांना करतात त्रस्त. चला जाणून घेऊया या 10 अफवा.

‘स्ट्रेटनिंग’मुळे तुमचेही केस झाले आहेत खराब मग एकदा वाचाच

अफवा क्रमांक 1- केस कापले की ते वाढतात

केस कापणे

Instagram

ADVERTISEMENT

अनेक जणांचे केस कापण्यामागचे कारण हे केसांची वाढ लवकरात लवकर होणे असते. कारण असे सातत्याने सांगितले जाते की, केस कापले की वाढायला भरभर मदत होते. पण हे खरे नाही. केस दर दोन महिन्यांनी ट्रिम करणे यामागे केसांना फाटे फुटू नये आणि केस जास्ती काळासाठी चांगले राहावे इतकेच असते. त्यामुळे केस कापल्याने ते पटापट वाढतात ही केवळ अफवा आहे. 

अफवा क्रमांक 2- ताण तणावामुळे केस पांढरे होतात

केस पांढरे होण्यासाठी आता ठराविक असे वय राहिलेले नाही. अगदी लहानमुलांचे केसही आता लवकर पिकतात. जर तणावाने केस पांढरे होत असतील तर लहान मुलांवर कामाचा कोणताही बोजा नसतो किंवा तणाव या शब्दाशी त्यांची फारशी ओळखही झालेली नसते. त्यामुळे तणाव तुमचे केस पांढरे करते हे कोठेही सिद्ध झालेले नाही. केस पांढरे होण्यासाठी तुमचे जीन्स कारणीभूत असतात. तुमच्या घरी केस पांढरे होण्याची परंपराच असेल तर तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. 

अफवा क्रमांक 3 – एक पांढरा केस उपटून काढला की, सगळे केस पांढरे होतात

केस पांढरे होणे

Instagram

ADVERTISEMENT

पांढरे केस कोणालाच आवडत नाही. म्हणून काही जण प्लकरच्या मदतीने ते काढून टाकतात. पण असे केल्यामुळे आजुबाजूचे केसही पांढरे होतात असा अनेकांचा समज आहे. पण असे शक्य नाही. एका केसाच्या काढण्यामुळे तुमचे आजुबाजूचे सगळे केस पांढरे होत नाही. पण पांढरा केस ओढून काढू नका हे सांगण्यामागे एकच कारण असते ते म्हणजे तुमच्या केसांच्या मुळांना त्रास होऊ नये. केसांची मूळ दुखावली गेली की, त्या ठिकाणाहून तुम्हाला केस येणार नाहीत.

अफवा क्रमांक 4 – केसांची वेणी घातली की केस चांगले राहतात

केसांचा पोनीटेल किंवा वेणी घातली की केस चांगले राहतात असे कायम म्हटले जाते. पण यात काहीही तथ्य नाही. केसांची सतत वेणी घालणे किंवा पोनीटेल बांधणे केसांच्या आरोग्यासाठी मुळीच चांगला नाही.एखादी हेअरस्टाईल सतत केल्यामुळे केसांवर ताण निर्माण होतो. केसांची हेअरलाईन मागे जाऊन केसांना टक्कल पडण्याची शक्यता असते.

केस हायलाईटस करताय,मग तुम्हाला या गोष्टी माहीत हव्यात

अफवा क्रमांक 5 – शॅम्पूच्या वापरामुळे केस गळतात

दिवसाला 50 ते 100 केस गळणं हे अगदी स्वाभाविक आहे. शॅम्पू हे केवळ तुमच्या केसांमधील घाण काढण्याचे काम करते. त्याच्या वापरामुळे तुमचे केस गळणं शक्य नाही. शॅम्पू करताना जर तुमचे केस गळलेले हाताला लागत असतील तर ते शॅम्पूमुळे नाही तर ते आधीच मूळापासून वेगळे झालेले असतात फक्त केस धुताना ते तुम्हाला जाणवतात.

ADVERTISEMENT

अफवा क्रमांक 6- केस कमी धुतले की कमी गळतात

केस गळणे

I nstagram

 अनेकांना केस धुवायला अजिबात आवडत नाही.त्यांच्या दृष्टिकोनातून केस सतत धुणे कदाचित चांगले नसावे आणि म्हणूनच ही अफवा रुढ झाली असावी. पण कमी वेळा केस धुणे म्हणजे केस गळती थांबवणे असे मुळीच होत नाही. केस धुतले नाही तर तुमच्या केसांमध्ये घाण अधिक साचते ती योग्यवेळी स्वच्छ केली नाही की, मग केस आणखी गळायला लागतात हे सत्य आहे. 

अफवा क्रमांक 7- केस सतत विंचरले की चांगले राहतात

काही जण कारण नसताना खूप वेळा केस विंचरतात. केस विंचरणे हे नक्कीच चांगले आहे. पण केस कारण नसताना सतत विंचरणे केसांच्या मुळांना दुखावतात. त्यामुळे केस अधिक गळण्याची शक्यता असते. दिवसातून केवळ दोनवेळा तुम्ही केस विंचरा तेही केसांमध्ये झालेल्या गाठी काढण्यााठी त्यामुळे तुमचे केस चांगले राहतील.

ADVERTISEMENT

अफवा क्रमांक 8 – केस न धुता केसांना रंग चांगला येतो

मुळीच नाही, जर तुम्ही या गोष्टीवर विश्वास ठेवत असाल तर तुम्ही खूप मोठी चूक करत आहात कारण अस्वच्छ केसांवर केमिकल्सचा कोणताही प्रयोग यशस्वी ठरत नाही. तेलकट आणि मळकट केसांवर रंग लावण्याचा प्रयत्न केल्यास केसांना चांगला रंग देखील येत नाही. 

तुमचेही केस गळतायत? ‘या’ गोष्टी खाल तर थांबेल तुमची केसगळती

अफवा क्रमांक 9- शॅम्पू आणि कंडिशनर एकच असलेले प्रोडक्ट चांगले

बाजारात असे अनेक प्रोडक्ट मिळतात जे एकाच वेळी शॅम्पू आणि कंडिशनर असल्याचा दावा करतात पण असे प्रोडक्ट तुमच्यासाठी मुळीच फायद्याचे नाही.शॅम्पू आणि कंडिशनर या दोघांची कामं वेगवेगळी आहेत. त्यामुळे तुम्ही याचा वापर वेगवेगळा केलेला कधीही बरा.

अफवा क्रमांक 10 – गरोदर महिलांनी केसांना रंगवू नये

केसांचा रंग

ADVERTISEMENT

Instagram

गरोदर महिलांच्या आरोग्यासंदर्भात ही एक मोठी अफवा आहे. केसांच्या स्काल्पमधून तुमच्या शरीरात केसांसाठी वापरणारे केमिकल्स जात असले तरी ते फार कमी प्रमाणात जातात. गरोदर असताना तुम्ही केस हायलाईट करणे किंवा कमीत कमी केमिकल्स आणि चांगल्या प्रतीच्या हेअर कलरचा उपयोग तुम्ही अगदी बिनधास्त करु शकता. 

केसांसंदर्भात या आहेत 10 अफवा ज्याकडे तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. 

29 Sep 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT