दुधाच्या या रेसिपी तुमचं वजन घटविण्यासाठी ठरतील फायदेशीर

दुधाच्या या रेसिपी तुमचं वजन घटविण्यासाठी ठरतील फायदेशीर

आजकाल वजन वाढणं ही समस्या झाली आहे. काहीही खाल्लं तरी वजन वाढतं. बदलती जीवनशैली, सतत बसून काम यामुळे वजन वाढण्याची समस्याही वाढत चालली आहे. वजन पटकन वाढतं पण ते कमी करण्यासाठी खूपच कष्ट घ्यावे लागतात. व्यायाम,  डाएट या सगळ्या गोष्टी सुरू होतात. पण तुम्हाला माहीत आहे का तुम्ही नियमित स्वरूपात दूध पिऊनही तुमचे वजन कमी करू शकता? बरेच जण दूध यासाठी पित नाहीत कारण त्यांना दुधाची चव आवडत नाही.  दुधाच्या वासाने मळमळतं. पण तुमच्या काही आवडत्या गोष्टी दुधात मिसळून तुम्ही दूध पिऊ शकता आणि हे निरोगी आरोग्यासाठी अधिक पौष्टिकही ठरते. अशाच काही दुधाच्या रेसिपी आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यासाठी मदत होईल. या रेसिपी अतिशय सोप्या असून तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यात याचा उपयोग करून घेऊ शकता. 

पीनट बटर मिल्क

Instagram

पीनट बटरमध्ये प्रोटीनचे चांगले प्रमाण असते. वजन कमी करण्यासाठी याचा फायदा होतो. याच्यासह डार्क चॉकलेटमध्येही खूपच कमी कॅलरी असते.  पण हे डार्क चॉकलेट झिरो शुगर असणारे आहे की नाही हे तुम्ही पडताळून घ्या. या दोन्ही गोष्टी दुधात एकत्र करून तुम्ही प्यायलात तर तुमचं वजन कमी होण्यास नक्कीच फायदा होतो. 

साहित्य 

  • 1 मोठा चमचा पीनट बटर
  • 1 लहान चमचा कोको पावडर
  • 1 मोठा चमचा डार्क चॉकलेट
  • 2 खजूर
  • 1 लहान चमचा दालचिनी पावडर 
  • 1 लहान चमचा वेलची पावडर 
  • 250 एमएल दूध 

बनविण्याची पद्धत 

  • एका बाऊलमध्ये दूध घ्या आणि त्यामध्ये वरील सर्व साहित्य मिक्स करा. थोडंसं दूध वाचवून ठेवा
  • साखर नसलेली कोको पावडर वापरा.  कारण वजन कमी करायचं असेल तर साखर नसणं उत्तम
  • हे सर्व एकत्र केलेले मिश्रण तुम्ही ब्लेंड करून घ्या 
  • त्यानंतर वरून थोडं दूध घाला आणि मग हे तयार दूध प्या 
  • हे दूध रोज प्यायल्यास, तुमचे वजन लवकर कमी होण्यास मदत मिळेल. 

गाजराचे दूध

Instagram

गाजरामध्ये कॅलरी कमी आणि फायबर जास्त असते. ज्यामुळे वजन कमी करणं सहज सोपे होते. वजन कमी करण्यासाठी हा योग्य पर्याय मानला जातो. दुधामध्ये गाजर मिक्स करून खाल्ल्यास पोट भरलेले राहाते आणि तुम्हाला जास्त भूकही लागत नाही. गाजराचे दूध कसे तयार करायचे जाणून घेऊया. 

साहित्य 

  • 2 लहान गाजर 
  • 7-8 बदाम
  • 1 मोठा चमचा खजूर
  • 1 लहान चमचा वेलची पावडर 
  • चिमूटभर हळद 
  • 1 लहान चमचा दालचिनी पावडर 
  • 250 एमएल दूध 

बनविण्याची पद्धत 

  • सर्वात पहिल्यांदा गाजर स्वच्छ धुवा आणि त्याचे साल काढून घ्या.  लहान तुकडे करून ते उकडून घ्या. ज्यामुळे गाजर मऊ होईल
  • तुम्हाला हवं तर न उकडताही तुम्ही गाजराचा वापर करून घेऊ शकता 
  • एक बाऊल घ्या आणि त्यामध्ये सर्व साहित्य मिक्स करा 
  • थोडेस दूध वाचवा 
  • जमलं तर बदाम रात्रभर पाण्यात भिजवून मग सकाळी त्याची सालं काढून टाका
  • हे सर्व साहित्य ब्लेंड करून स्मूदी तयार करून घ्या 
  • नंतर मिश्रणामध्ये वाचवलेले दूध घाला. जर गाजर शिजवून घेतलेले नसेल तर स्मूदी थोडीशी उकळवून घ्या आणि मग प्या

गोल्डन स्पाईस्ड मिल्क

Instagram

हळद आणि आलंदेखील वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. तसंच तुम्हाला दुधामध्ये हळद आणि आल्यासह अन्य काही मसालेही मिसळता येतात. हे अतिशय चविष्ट लागते आणि आरोग्यासाठीही हितावह आहे. वजन की कर्यास  कसे तयार करायचे जाणून घेऊया. 

साहित्य 

  • 1 इंच कच्च्या हळदीचा तुकडा 
  • 1 इंच आल्याचा तुकडा 
  • 4-5 काळी मिरी 
  • 1 लवंग 
  • 1 लहान चमचा जायफळ पावडर
  • 1 इंच मुळेठीचा  तुकडा 
  • 1 लहान चमचा ओवा 
  • 2 खजूर 
  • 250 एमएल दूध 

बनविण्याची पद्धत 

  • सर्वात पहिले कच्ची हळद आणि आलं किसून घ्या 
  • त्यानंतर लवंग आणि काळी मिरी पावडर बनवा 
  • सर्व साहित्य एका पातेल्यात घ्या आणि  त्यावर दूध घालून मिक्स करा 
  • यानंतर दूध व्यवस्थित उकळून घ्या 
  • दूध गाळून मस्त गरम गरम प्या

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक