ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
वयाच्या 51व्या वर्षीही अभिनेत्री भाग्यश्रीसारखी त्वचा हवी असेल तर आहे हे सिक्रेट

वयाच्या 51व्या वर्षीही अभिनेत्री भाग्यश्रीसारखी त्वचा हवी असेल तर आहे हे सिक्रेट

‘मैंने प्यार किया’ या एकाच चित्रपटात काम करूनही आजपर्यंत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी मराठमोठी अभिनेत्री भाग्यश्री अजूनही तशीच दिसते. भाग्यश्रीचा मुलगाही आता चित्रपटांमध्ये काम करू लागला आहे.  मात्र दोन मोठी मुलं भाग्यश्रीला आहेत असं अजूनही मान्य करणं कठीण होतं. भाग्यश्रीकडे पाहिल्यानंतर तिचं वय 51 आहे या गोष्टीवर कोणाचाही विश्वास बसणार नाही. भाग्यश्री नेहमी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.  आपल्या त्वचेचं रहस्य तिने नुकतंच सोशल मीडियावर सांगितलं आहे.  आपल्या चमकदार आणि डागविरहीत त्वचेचं नक्की काय रहस्य आहे आणि आपण कोणता फेसपॅक वापरतो यावर भाग्यश्रीने पडदा टाकला आहे. भाग्यश्रीच्या त्वचेवरून तिच्या वयाचा अंदाज काढणं अजिबातच शक्य नाही.  भाग्यश्री आपल्या फिटनेसचीही तितकीच काळजी घेते. आपल्या त्वचेचे रहस्य भाग्यश्रीने शेअर केले आहे आणि तेच आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत आहोत.  तुम्हालाही आपल्या त्वचेची अशीच काळजी घ्यायची असेल आणि त्वचा नेहमी चकमदार ठेवायची असेल तर या फेसपॅकचा तुम्ही नक्की वापर करून पाहू शकता. 

चमकदार त्वचेसाठी घरगुती आयुर्वेदीक फेसमास्क

भाग्यश्रीच्या सुंदर त्वचेचे रहस्य आहे हा फेसपॅक

भाग्यश्री नेहमीच प्रत्येक फोटोमध्ये सुंदर दिसते. मैंने प्यार कियामधील भाग्यश्री आणि आताची भाग्यश्री यामध्ये अजूनही तफावत काढणं शक्य नाही. भाग्यश्रीने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यातून तिने आपल्या त्वचेचे रहस्य सांगितले आहे. भाग्यश्रीने यासाठी कोणता फेसपॅक वापरायचा तेही सांगितले आहे. ओट्स एका बाटलीमध्ये स्टोअर करून ठेवा. चेहऱ्यासाठी पेस्ट बनवताना ओट्स पावडर करून घ्या आणि त्यात दूध आणि मध मिक्स करा. ही पेस्ट तयार होईल. त्यानंतर ही पेस्ट  आपल्या चेहऱ्यावर लावा आणि सुकू द्या. सुकल्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. या फेसपॅकमध्ये क्लिन्झिंग गुण आढळतात. जे आपल्या त्वचेवरील मृत त्वचा अर्थात डेड स्किन काढून टाकण्यासाठी फायदेशीर ठरतात. तसंच हा फेसपॅक त्वचा मॉईस्चराईज करण्यासाठी फायदेशीर ठरतो. तसंच यातील वापरण्यात येणाऱ्या मधामध्ये  अँटिसेप्टिक  आणि  अँटिइन्फ्लेमेटरी गुण आढळतात जे चेहऱ्याला अधिक चमकदार करण्यासाठी मदत करतात आणि त्वचा हायड्रेट ठेवायलाही मदत करतात असं भाग्यश्रीने आपल्या व्हिडिओमध्ये  सांगितले आहे. त्यामुळे तुम्हालाही भाग्यश्रीसारखी त्वचा मिळवायची असेल तर तुम्ही नक्की या फेसपॅकचा वापर करून पाहू शकता. 

झोपताना लावा हा अप्रतिम फेसमास्क, मिळेल तजेलदार त्वचा

ADVERTISEMENT

ओट्स फेसपॅक बनविण्याची पद्धत

Shutterstock

ओट्स  फेसपॅक कसा बनवायचा हे वरही सांगितले आहे.  मात्र तुम्हाला स्टेप बाय स्टेप याची पद्धत सोप्या तऱ्हेनेदेखी इथे  देत आहोत. 

  • 2 चमचा ओट्स पावडर घ्या 
  • त्यामध्ये 1 चमचा मध आणि 1 चमचा दूध मिक्स करा 
  • याची  पेस्ट तयार करून चेहऱ्याला लावा. चेहरा लगेच धुऊ नका. चेहऱ्यावरील हा फेसपॅक सुकू द्या
  • सुकल्यावर थंड पाण्याने चेहरा धुवा 
  • चेहरा धुतल्यावर मॉईस्चराईज अथवा सीरम लावा 

तुम्हाला घरच्या घरी फेसपॅक तयार करायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही MyGlamm चा फेस शीट मास्कही वापरू शकता. यामुळेदेखील तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येण्यास मदत मिळेल. 

ADVERTISEMENT

डागविरहीत चेहऱ्यासाठी वापरा बडिशेपचा फेसमास्क

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

29 Oct 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT