आपल्याकडे कपाळावर तिलक अर्थात गंध लावण्याला नेहमीच महत्त्व देण्यात आले आहे. पण तिलक अर्थात गंध लावणे हे केवळ धार्मिक नाही तर त्याचे वैज्ञानिक कारण आहे आणि म्हणून आपल्याकडे कपाळावर गंध लावण्यात येते. हे गंध म्हणजे कुंकू अथवा अष्टगंधाचा यामध्ये समावेश करण्यात येतो. तसंच चंदन, कुंकू यांच्याप्रमाणे अष्टगंध हेदेखील उपयोग ठरते. केवळ तिलक म्हणून नाही तर अन्य गोष्टीतही अष्टगंधाचा उपयोग करून घेण्यात येतो. आपण या लेखातून अष्टगंध लावण्याची वैज्ञानिक आणि इतर कारणेही जाणून घेणार आहोत. वास्तुदोष निवारणासह अगदी ग्रहशांतिपर्यंत अष्टगंधाचा उपयोग करण्यात येतो.
अष्टगंध या नावावरूनच तुम्हाला अंदाज येतो की यामध्ये आठ प्रकारचे सुगंध समाविष्ट असतात. पण अष्टगंधात नक्की कोणकोणत्या गोष्टींचा समावेश करण्यात आलेला असतो याची प्रत्येकाला माहिती नसते. कुंकू, अगर, कस्तुरी, चंद्रभाग, त्रिपुरा, गोरोचन ,तमाल आणि पाणी या आठ गोष्टींचा यामध्ये समावेश असतो. सर्व ग्रहांना शांत करण्याची या आठ गोष्टींमध्ये शक्ती असते असे आपल्या संस्कृतीमध्ये मानले जाते. त्यामुळे ग्रहांचा दुष्प्रभाव कमी करण्यासाठी अष्टगंधाचा नियमित वापर करण्यात येतो असे सांगण्यात येते.
अष्टगंध हे शरीरातील उष्णता शोषून घेते. त्यामुळे कपाळावर नियमित अष्टगंध लावल्याने त्याच्या सुगंधाने आणि त्यातील गुणधर्माने मानसिक शांती मिळते आणि तणावापासून दूर राहण्यात मदत होते. सतत त्रास होत असेल तर या दरवळत्या सुगंधाने मन विचलित होत नाही आणि शिवाय अंगातील उष्णता कमी होऊन चिडचिड कमी करण्यासाठीही याचा उपयोग करून घेता येतो.
आपल्या संस्कृतीमध्ये माता लक्ष्मीचे नियमित पूजन केले जाते. अष्टगंधाचा दरवळ हा अत्यंत सुंदर असून सॉफ्ट असतो. त्यामुळे घरामध्ये लक्ष्मी अष्टगंधाच्या या दरवळीने कायम वास करते असा आपल्याकडे समज आहे. लक्ष्मीचे सर्वात आवडते अष्टगंध असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे नेहमीच पूजेच्या वेळी देवांची पूजाही अष्टगंधाने केली जाते. घरात अष्टगंधाच्या दरवळीने वास्तुदोष असल्यास दूर होण्यास मदत मिळते असंही सांगितले जाते. मात्र हा विषय प्रत्येकाच्या विश्वासानुसार आहे.
घरात ग्रहशांत करायची असेल अथवा कोणत्याही प्रकारची पूजा असेल तर अशा कर्मकांडामध्ये अथवा यंत्र लेखनामध्येही अष्टगंधाचा उपयोग करण्यात येतो. वैष्णव आणि शैव असे अष्टगंधाचेही दोन प्रकार असतात. पूजाअर्चेनुसार याचा उपयोग केला जातो. विशेषतः मकर आणि कुंभ या दोन राशीच्या लोकांसाठी अष्टगंधाचे तिलक जास्त फायदेशीर ठरते असे शास्त्रात सांगितले जाते. या दोन्ही राशी बऱ्यापैकी रागीट असल्याने राग शांत करण्यासाठी अष्टगंधाचा उपयोग करण्यात येतो. अष्टगंध अधिक फलदायी मानण्यात येते.
महिलांसाठी वरदान आहे ज्येष्ठमध, जाणून घ्या फायदे (Jeshthamadh Benefits In Marathi)
आयुर्वेदामध्येही अनेकदा उपचारासाठी गंधाचा वापर करण्यात आल्याचे दिसून आले आहे. आंघोळ झाल्यानंतर शरीराला अष्टगंध लावल्याने त्वचेच्या समस्या होत नाहीत असेही सांगण्यात आले आहे. तुरटी, चंदन, कापराची पावडर आणि अष्टगंध मिक्स करून अंगाला लावल्यास दिवसभर अंगाला सुगंध तर येतोच. पण तुम्हाला कोणत्याही प्रकारची त्वचेची अलर्जी आणि त्वचेच्या समस्यांपासून हे दूर ठेवायला मदत करते.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक