स वरून मुलांची नावे, तुमच्यासाठी खास नावे (Baby Boy Names Starting With "S" In Marathi)

Baby Boy Names Starting With "S" In Marathi

घरात बाळाचा जन्म झाला की घरातले वातावरण संपूर्ण आनंदमयी होऊन  जाते.  त्यातही काही आईवडील आणि आजी आजोबा बाळाचे नाव आधीपासूनच ठरवून ठेवतात तर काही जण बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याच्या नावाचा शोध सुरू करतात. हल्ली तर बाळाची नावे शोधण्यासाठी इंटरनेट आणि गुगल हे चांगले माध्यमही आहे. काही लहान मुलांची नावे ही वेगळी असावे असे आई वडिलांना वाटते असते. मराठी मुलांची नावे ही वेगवेगळी हल्ली ठेवली जातात.  तोचतोचपणा नावांमध्ये नको वाटतो. त्यातही स हे अक्षर सध्या जास्त ट्रेंडमध्ये आहे. स वरून मुलांची नावे (s varun mulanche nave) आपल्याला शोधायची असतील तर तुम्हाला हा लेख नक्कीच फायदेशीर ठरू शकतो. मुलांची नविन नावे शोधणे हे हल्ली एक मोठं काम झालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 

अगदी देवाच्या नावापासून ते वेगवेगळे आणि युनिक अर्थ असणारी नावे आपल्याला हवी असतात. मुलांचे नाव मराठी असावे असंही बऱ्याच जणांना वाटते. तर काहींना आपल्या मुलाचे नाव अवघड असले तरीही युनिक असावे असंही वाटत असते. त्यामुळे अशी नावं नक्की कुठे मिळतील याचा शोध आपण आधीपासूनच घेत असतो. तसेच लहान मुलांचे नाव आपल्याकडे पहिल्या सव्वा महिन्यात ठेवायचीही पद्धत आहे. शोधण्यासाठी साधारण महिनाभर असतो. त्यामुळे तुमच्या बाळाच्या जन्मानंतर जर त्याचे अक्षर स आले असेल तर तुम्हाला आम्ही या लेखातून खप वेगवेगळी नावे त्याच्या अर्थासह देत आहोत. तुम्हीही ही नावे वाचून त्याचा अर्थ समजून घ्या आणि आपल्या बाळाला एक सुंदर अर्थपूर्ण नाव द्या. 

Table of Contents

  स वरून मुलांची युनिक नावे (Unique Baby Boy Names Starting With "S" In Marathi)

  स वरून मुलांची युनिक नावे (Unique Baby Boy Names Starting With "S" In Marathi)

  प्रत्येकाला आपल्या बाळाचं नाव हे युनिक अर्थात वेगळं असावं असं वाटत असतं. त्यासाठी हल्ली खूप वेगवेगळी नावं ठेवण्याचा ट्रेंड सुरू झाल आहे. त्यातही स वरून अशी अनेक नावं आहेत ज्यांचा उच्चार आणि अर्थ खूपच वेगळा असतो. त्यामुळे तुम्हाला जर मुलगा झाला असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला ही काही वेगळी युनिक नावं तपासून पाहता येतील. तुम्हाला या नावांच्या अर्थासह माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही नावाचा उच्चार करताना अथवा अर्थ समजून घेताना तुम्हाला त्रास होणार नाही. पाहूया अशी काही युनिक नावे - 

  नावे अर्थ
  स्पंदन हृदयाची धडधड, हृदय धडकताना येणारा लयकारी आवाज
  सृजन रचनात्मक असणारा, रचनाकार
  स्वस्तिक कल्याणकारी, शुभ असणारा, सुरूवात करून देणारा
  सक्षम समर्थ असा, प्रत्येक कामात कुशल असणारा, काम सर्वार्थाने पूर्णत्वाला नेणारा असा
  स्वरांश संगीतातील स्वराचा एक अंश, अर्थात संगीतातील एक भाग
  स्वानंद स्वतःच स्वतःच्या आनंदात मशगुल असणारा, श्रीगणेशाचे एक नाव
  स्वाक्ष सुंदर डोळे असणारा असा
  समीहन उत्साही, एखाद्या गोष्टीसाठी उत्सुक असणारा
  सुकृत नेहमी चांगले काम करणारा
  सृजित रचित, बनविण्यात आलेला असा
  स्यामृत कायम समृद्ध असणारा, समाधानी असणारा असा
  सुयश सूर्याचा असणारा अंश
  सुहृद मित्र, अप्रतिम हृदय असणारा असा 
  सार्थक अर्थपूर्ण, योग्य अर्थासह
  स्वपन स्वप्न
  स्पर्श साकार, शरीराला जाणवलेली भावना
  सुतीक्ष वीर आणि पराक्रमी असणारा 
  सामोद मोदासह, सुगंधित असणारा, कृपाळू
  सव्यसाची अर्जुनाचे एक नाव
  सव्या विष्णूच्या हजार नावांपैकी एक सुंदर नाव
  सुश्रुत ऋषीचे नाव, योग्य ऐकणारा, चांगले ऐकणारा
  सतेज तेजासह, आभा, तेजोमय
  सानव सूर्याचे एक नाव 
  सात्विक पवित्र असा, अत्यंत चांगला
  सूर्यांशू सूर्याची पडणारी किरणे, सूर्याच्या किरणाचा अंश 

  तान्ह्या बाळाच्या पोषणासाठी कोविड काळातही करावे स्तनपात, फायदे

  स वरून मुलांची आधुनिक नावे (Modern Baby Boy Names Starting With "S" In Marathi)

  स्वप्नील, सुधीर, समीर अशी तीच तीच मुलांची नावं आपल्याला आपल्या मुलाची ठेऊ नये असं वाटतं. कारण ही नावं फारच कॉमन आहेत. तसंच अगदी जुनी नावंही आता आधुनिक नावं म्हणून वापरता येत आहेत. म्हणजे त्याचा अर्थ किंवा ही नावं जरी जुनी असली तरीही त्याला एक आधुनिक झालर देऊन आपल्या मुलांची नावं आपल्याला ठेवता येतील. अशाच काही आधुनिक नावांची यादी आम्ही तुम्हाला इथे देत आहोत. तुम्हीही या यादीतून तुमच्या मुलासाठी स अक्षर आले असेल तर स वरून मुलांची आधुनिक नावे ठेऊ शकता. तसंच तुम्हाला याचा अर्थही इथे आम्ही दिलेला आहे. 

  नावे अर्थ
  सौभद्र अभिमन्यूचे एक नाव, सुभद्रेचा मुलगा म्हणून सौभद्र 
  सरविन प्रेमाची देवता, विजय प्राप्त केलेला
  सर्वज्ञ सर्व काही ज्ञात असणारा, विष्णूच्या हजार नावापैकी एक
  सूर्यांक सूर्याचा एक भाग, सूर्याचा एक अंक
  सरवन स्नेही, उदार असणारा, योग्य असणारा 
  सरस चंद्राचे नाव, हंस
  सारंग एक संगीत वाद्य, भगवान शंकराच्या नावांपैकी एक नाव 
  सर्वदमन दुष्यंत पुत्र भरत याचे एक नाव
  सत्यजित नेहमी सत्याने जिंकणारा 
  सजल जलासहीत असा,  मेघ, जलयुक्त असणारा
  सप्तक सात वस्तूंचा एकत्रित संग्रह 
  संस्कार देण्यात येणारी नैतिक मूल्ये, नैतिक मूल्ये जपून ठेवणारा
  संयम धैर्य, धैर्यशील असणारा, परिस्थिती नेहमी जपून हाताळणारा 
  संकेत इशारा, लक्षण
  सुरूष शानदार असा
  सुरंजन नियमित मनोरंजन करणारा, सतत आनंदी असणारा, आनंददायी
  सप्तजित सात वीरांना जिंकणारा असा बलशाली 
  सुप्रत आनंददायी दिसणारा सूर्योदय, सुंदर अशी सकाळ
  सुपश श्रीगणेशाचे नाव
  सौमित्र सुमित्रेचा पुत्र, लक्ष्मणाचे एक नाव
  संकिर्तन भजन
  संकर्षण आकर्षणासह दिसणारा 
  संकल्प लक्ष्य, कायमस्वरूपी लक्ष्याचा वेध घेणारा
  स्वयं स्वतः, स्वतःसाठी जगणारा
  साद हाक

  त वरून मुलांची नावे, आधुनिक, युनिक आणि अर्थपूर्ण नावे

  स वरून मुलांची नावे (Baby Boy Names From "S" In Marathi)

  काही नावं आपल्याला कठीण वाटतात. वेगळी नावंही हवी असतात. मग अशावेळी आपण नक्की काय करतो तर तोचतोचपणा टाळतो. त्यासाठीच तुम्हाला स अक्षरावरून मुलांची नावे (s varun mulanche nave) अगदी सहज आणि सोपी अशी नावे आम्ही देण्याचा प्रयत्न इथे करत आहोत. अगदी मुलांनाही आपले नाव लहानपणापासून सहज उच्चारता येईल आणि त्याचा अर्थही सोपा असेल अशी काही नावांची यादी आम्ही तुम्हाला इथे देत आहोत. 

  नावे अर्थ
  सुमुख सुंदर अशा चेहऱ्याचा
  संजीत नेहमी विजय प्राप्त करणारा, नियमित विजयी होणारा
  सनिश सूर्य, प्रतिभाशाली असा मुलगा
  सुमेध चतुर, हुशार, समजूतदार असा मुलगा 
  सोम चंद्राचे एक नाव 
  सनत भगवान ब्रम्हाचे एक नाव, अनंत
  संतोष समाधान, समाधानकारक
  संप्रीत प्रीतसहित, आनंददायी, संतोष
  संरचित स्वतःने रचलेला, स्वयंरचित, रचनाकार
  सलील सुंदर, निर्मळ, जल
  सहर्ष आनंदासहित, स्वतः आनंदी राहणारा
  सानल ऊर्जावान,  शक्तिशाली, बलशाली 
  सौरव चांगला वास, दिव्य, आकाशीय
  सौरभ सुगंध, चांगला सुवास
  समक्ष जवळ, प्रत्यक्ष समोर असणारा
  सौमिल प्रेम, शांती, शांतता
  सहज स्वाभाविक, नैसर्गिक, प्राकृतिक असा
  समेश समानतेचा ईश्वर
  संयुक्त एकत्रित, एकत्र असणारा
  सारांश सार, संक्षेप, एखाद्या मोठ्या गोष्टीबद्दल कमी शब्दात मांडणे
  सानुराग स्नेही, मित्र, प्रेम करणारा
  समृद्ध संपन्न, समाधानी
  स्वरूप रूपासह, सुंदर रूप
  सरूप सुंदर, सुंदर शरीराचा असा
  सर्वक संपूर्ण

  प वरून मुलांची नावे, प आद्याक्षर आले तर नावाची यादी

  मुलांची 25 संस्कृत नावे (Sanskrit Baby Boy Names From "S" In Marathi)

  मुलांची 25 संस्कृत नावे (Sanskrit Baby Boy Names From "S" In Marathi)

  आपल्याकडे मराठी आणि संस्कृत ही नावे  तशी थोडीफार जवळची वाटतात. मराठीप्रमाणे संस्कृत नावांचाही आपल्याकडे बोलबाला आहे. त्यामुळे आपल्या बाळासाठी जर तुम्हाला काही वेगळी संस्कृत नावे हवी असतील तर स या अक्षरावरून काही विशिष्ट आणि उत्तम संस्कृत नावे आम्ही तुमच्यासाठी निवडली आहेत. यापैकी अर्धीअधिक नावे ही देवाची अथवा ऋषींची असल्याचे तुमच्या लक्षात येईल. तुम्हालाही अशा काही युनिक संस्कृत नावांची आवडत असेल तर  तुम्हीही या नावांचा अर्थ जाणून घ्या आणि यापैकी कोणते नाव आवडले  तर नक्की आपल्या बाळाचे नाव ठेवा. 

  नावे  अर्थ
  स्यामन्तक भगवान विष्णूच्या रत्नाचे नाव
  संदीपन ऋषीचे नाव, प्रकाश
  स्तव्य भगवान विष्णूच्या नावापैकी एक
  संचित एकत्र, सर्व काही सांभाळून ठेवणारा, एकत्र जमा करून ठेवलेले
  सम्यक स्वर्ण, प्राप्त झालेले, पर्याप्त
  संविद ज्ञान, विद्या, विद्येसह
  समीन अत्यंत मौल्यवान,  किमती, अमूल्य असा
  समद अनंत, परमेश्वर, अमर असा
  समार्चित पूजित असा, आराध्य असणारा
  सधिमन चांगुलपणा असणारा, उत्कृष्टता असणारा
  स्कंद ऋषींचे नाव, सुंदर, अप्रतिम, शानदार असा
  सहस्कृत शक्ती, शक्तीशाली, ताकदवान
  सार्वभौम सर्वांना एकत्रित सामावून घेणारा
  सम्राट सर्व राज्यांचा राजा
  सरोजिन ब्रह्माचे एक नाव
  सर्वद संपूर्ण
  सुहान खूपच चांगला, सुंदर
  साज संगीतातील वाद्ये
  सचिंत शुद्ध अस्तित्व, शुद्ध विचार 
  संपाति भाग्य, सफलता, कल्याण
  सुधांशू चंद्राचे नाव, चंद्राचा अंश
  स्वाध्याय वेदाचा अभ्यास, अध्याय
  सुचेत चेतनेसह, आकर्षक असा
  स्त्रोत्र श्लोक, चांगले विचार
  सहर सूर्य, सूर्यप्रकाश

   तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक.

  You Might Like This :

  Nicknames for BF in Hindi

  लड़कियों के नाम की लिस्ट और उनके अर्थ

  बच्चों के नये नाम की लिस्ट 2020

  व वरून मुलांची नावे, खास तुमच्यासाठी

  न वरून मुलांची नावे, खास तुमच्यासाठी