ADVERTISEMENT
home / Care
केसगळती थांबवण्यासाठी उत्तम हेअर कंडिशनर (Best Anti Hair Fall Conditioner)

केसगळती थांबवण्यासाठी उत्तम हेअर कंडिशनर (Best Anti Hair Fall Conditioner)

कंडिशनरच्या वापरामुळे तुमच्या केसांमध्ये जाणवणारा पहिला फरक म्हणजे ‘चमकदार केस’ केसांना हवी असलेली शाईन कंडिशनरच्या वापरामुळे येते. तुमचे केस कितीही रुक्ष असले किंवा तुम्ही त्यावर कितीही केमिकल्सचा वापर केला असला तरी देखील होममेड हेअर कंडिशनरच्या वापरामुळे केस चमकू लागतात. जर शॅम्पू केल्यानंतर तुम्ही याचा प्रयोग केलात तर तुम्हाला अपेक्षित असलेला केसांमधील फरक पटकन जाणवून येईल. कंडिशनरच्या वापरामुळे तुमच्या केसांवर एक संरक्षक कवच तयार होते जे केसांना डॅमेज होऊ देत नाही. प्रवासात किंवा बाहेर जात असाल तर शॅम्पू केल्यानंतर कंडिशनरचा वापर केल्यानंतर केसांची चमक टिकून राहते.

बेस्ट अँटी हेअर फॉल कंडिशनर (Best Anti Hair Fall Conditioner In India)

केसगळती थांबवण्यासाठी कोणते कंडिशनर निवडावे याचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही बेस्ट कंडिशनरचीही निवड केली आहे. केस गळती टाळण्यासाठी आपण लेसर केस काढून टाकण्याचे उपचार आणि रंग वापरुन पाहू नये.

Arata Nourishing Conditioner

100% नैसर्गिक घटकांपासून तयार करण्यात आलेले अराता नरिशिंग कंडिशनर हे उत्तम आहे. केसांना हायड्रेट करुन  केसांना स्मुथ करण्याचे काम करते.अँटी- ऑक्सिडंट गुणधर्म केसांना अधिका काळासाठी चांगले ठेवतात. 

ADVERTISEMENT

फायदे (Pros): नैसर्गिक घटकांचा समावेश फारच फायदेशीर आहे. 

तोटे (Cons): किमतीच्या तुलनेत हा अधिक महाग आहे.      

Forest Essentials Hair Conditioner – Bhringraj & Shikakai (Travel Mini)

एक उत्कृष्ट ब्रँड असून ज्यांना नैसर्गिक घटकांचा समावेश असलेले हे कंडिशनर एक ट्रॅव्हल पॅकेट आहे. शिकेकाई आणि भृगंराज यामुळे तुमच्या केसांना पोषण मिळते. शिवाय केसगळती ही थांबवते. 

फायदे (Pros): ज्यांना नैसर्गिक घटक आवडत असतील तर तु्म्हाला हे कंडिशनर नक्की आवडेल.

ADVERTISEMENT

तोटे (Cons): जर तुम्ही केसांना काही केमिकल्स ट्रिटमेंट केली असेल तर मात्र तुम्ही याचा वापर करु नका. कारण त्यामुळे तुमच्या केसांची ट्रिटमेंट निघून जाण्याची शक्यता असते. 

Syoss Anti-Hair Fall Fiber Resist 95 Conditioner

केस गळू नये यासाठी स्काल्प स्वच्छ ठेवणे फार गरजेचे असते. स्काल्प स्वच्छ ठेवण्याचे काम हे कंडिशनर असते. स्काल्प स्वच्छ राहिले तर केसांची वाढ योग्य होण्यास मदत मिळते. 

फायदे (Pros): याचे गुणधर्म तुमच्या केसांना चांगले ठेवण्याचे काम करते. 

तोटे (Cons): तुमच्या केसांना हे शोभेल असे सांगता येत नाही.

ADVERTISEMENT

WOW Skin Science Hair Loss Control Therapy Conditioner

सध्या सगळ्या सोशल मीडियावर या प्रोडक्टची सगळीकडे चर्चा आहे. WOW चे प्रोडक्ट हेअर लॉस थेरपी कंडिशनर आहे. यामध्ये अनेक नैसर्गिक घटक आहे. जे केसांना नरीश करण्याचे काम करते. 

फायदे (Pros): केसांना नैसर्गिक घटकांमुळे नरीशमेंट मिळण्याचे काम होते. शिवाय यामध्ये कोणतेही हानिकारक केमिकल्स नाही. 

तोटे (Cons): याचे विशेष तोटे आहेत. त्यामुळे याचे फार काही तोटे नाहीत. 

Onion Conditioner for Hair Growth and Hair Fall Control with Onion and Coconut

केसांच्या वाढीसाठी कांद्याचे घटक हे फारच चांगले असतात. कंडिशनरमध्ये कांद्याचा अर्क आणि नारळाच्या अर्काचा गुणधर्म असल्यामुळे केसांच्या वाढीला आणि केसगळती रोखण्याचे काम करते. 

ADVERTISEMENT

फायदे (Pros): उत्कृष्ट ब्रँड आणि नैसर्गिक घटक यामुळे हे कंडिशनर उत्तम आहे.

तोटे (Cons):  केसांचा अर्क अनेकांना आवडत नाही. त्यामुळे तुमच्या आवडीनुसार तुम्ही विचार करा.

Dove Hair Fall Rescue Conditioner

बजेटमध्ये बसणारे हे कंडिशनर असून केसगळतीसाठी उत्तम असल्याचे कंपनीचे मानणे आहे. शिवाय बजेटमध्ये बसणारे हे कंडिशनर असल्यामुळे या प्रोडक्टला अनेकांनी पसंती दिली आहे. 

फायदे (Pros): किमतीच्या तुलनेत हे उत्तम प्रोडक्ट आहे. 

ADVERTISEMENT

तोटे (Cons): अनेकांना हे कंडिशनर आवडलेले नाही. कारण ते काढताना फार त्रास होते.

TRESemme Hair Fall Defense Conditioner

प्रोफेशनल हेअरस्टायलिस्ट वापरत असलेले हे प्रोडक्ट अनेकांच्या आवडीचे आहेत. या कंडिशनरच्या वापराने एकदम स्मुथ आणि चांगले केस मिळतात. याचे शॅम्पू आणि कंडिशनर वापल्यानंतर तुम्हाला हा फरक जाणवतो. 

फायदे (Pros): या कंडिशनरच्या वापरामुळे तुमचे केस अधिक चांगले दिसतात. 

तोटे (Cons):  याच्या अतिवापरामुळे केस जास्त तेलकट वाटतात. 

ADVERTISEMENT

Murumuru Damage Repair Hair Conditioner

रिक्विल कंपनीच हे कंडिशनर अनेकांच्या आवडीचे आहे. या  कंडिशनरच्या वापरामुळे ड्रायनेस केसांचा फ्रिजीनेस फारच कमी होते. शिवाय केस अधिक चमकदार  दिसू लागतात. 

फायदे (Pros): कुरळ्या केसांसाठीही हे प्रोडक्ट फारच फायद्याचे आहे.त्यामुळे अगदी कोणीही याचा वापर करु शकतं

तोटे (Cons): याचे फार काही तोटे नाही अनेकांना हे प्रोडक्ट आवडले आहे. 

WOW Skin Science Coconut & Avocado Oil No Parabens & Sulphate Hair Conditioner

WOW चे हे आणखी एक कंडिशनर अनेक अॅडव्हान्स गोष्टींनी भरलेले आहे. कोणत्याही केमिकल्सचा यामध्ये वापर करण्यात आलेला नाही. या कंडिशनरमध्ये नारळ आणि अवाकाडोच्या तेलाचे घटक आहेत.

ADVERTISEMENT

फायदे (Pros): अनेकांना हे प्रो़डक्ट आवडले असून त्यामुळे केस सिल्की, स्मुथ होण्यास मदत मिळते. 

तोटे (Cons): याचे फार काही तोटे नाही.

LAVENDER PATCHOULI HAIR CONDITIONER

कामा आयुर्वेदाचे हे प्रोडक्टही अनेकांच्या आवडीचे आहे. यामध्ये अशलेल्या नैसर्गिक घटकांमुळे केस चांगले होण्यास मदत मिळते. केसांचा ड्रायनेस काढून केस केसांचे डॅमेज कमी करण्याचे काम हे प्रोडक्ट करते.

फायदे (Pros): नैसर्गिक घटकांचा समावेश 

ADVERTISEMENT

तोटे (Cons): याची किंमत इतर कंडिशरनच्या तुलनेत अधिक आहे.

कंडिशनरचे फायदे (Hair Conditioner Benefits In Marathi)

कंडिशनरचे फायदे

Instagram

ADVERTISEMENT

केस शॅम्पूने धुतल्यानंतर कंडिशनर का लावायचे असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर तुम्हाला कंडिशनरचे फायदे माहीत हवेत. म्हणूनच जाणून घेऊयात कंडिशनरचे फायदे.

केसांना चमक (Shiny Hair)

कंडिशनरच्या वापरामुळे तुमच्या केसांमध्ये जाणवणारा पहिला फरक म्हणजे ‘चमकदार केस’ केसांना हवी असलेली शाईन कंडिशनरच्या वापरामुळे येते. तुमचे केस कितीही रुक्ष असले किंवा तुम्ही त्यावर कितीही केमिकल्सचा वापर केला असला तरी देखील कंडिशनरच्या वापरामुळे केस चमकू लागतात. जर शॅम्पू केल्यानंतर तुम्ही याचा प्रयोग केलात तर तुम्हाला अपेक्षित असलेला केसांमधील फरक पटकन जाणवून येईल. कंडिशनरच्या वापरामुळे तुमच्या केसांवर एक संरक्षक कवच तयार होते जे केसांना डॅमेज होऊ देत नाही. प्रवासात किंवा बाहेर जात असाल तर शॅम्पू केल्यानंतर कंडिशनरचा वापर केल्यानंतर केसांची चमक टिकून राहते. 

मुलायम केस (Smooth Hair)

आदर्श केसांबद्दल आपल्या काही व्याख्या ठरलेल्या असतात. घनदाट केसासोबतच आपल्याला मुलायम केस हवे असतात. कंडिशरनच्या वापरामुळे केस मुलायम होतात. हाताला पोत एकदम मुलायम वाटू लागतो. कंडिशनरचे कामच केस मुलायम करणे असते. त्यामुळे त्याचा वापरानंतर तुम्हाला हा फरक जाणवणारच. ज्यांचे केस जाड किंवा ड्राय असतील तर त्यांनी अगदी हमखास याचा प्रयोग करावा तुमचे केस मुलायम होण्यास मदत मिळते. 

केसांमध्ये होत नाही गुंता (Keep Hair Untangled)

केसांची आणखी एक तक्रार जी अनेकांना डोकेदुखी वाटते ती म्हणजे केसांचा गुंता. तुम्हालाही याचा त्रास असेल. तर कंडिशनर तुमच्यासाठीच आहे. केस धुतल्यानंतर केस हे अधिक मोकळे होतात. पण असे झाले तरी काहींच्या केसांचा गुंता होतो. मानेजवळील केस अधिक गुंतू लागतात. हा गुंता सोडवणे फारच गरजेचे असते. पण हा गुंता सोडवताना केसांवर कंगवा चुकीच्या पद्धतीने फिरवला गेला तर केस तुटण्याची शक्यता असते. केस मुलायम झाल्यामुळे आणि एक एक केस वेगळा झाल्यामुळे केसांचा गुंता होत नाही. 

ADVERTISEMENT

फाटे आणि केसांचे नुकसान टळते (Control Breakage And Split Ends)

केसांना फाटे फुटणे केस दुभंगणे हे त्रास केस योग्य पद्धतीने विंचरले नाही तर होतात. जर हे त्रास वारंवार होत असतील तर कंडिशनरचा वापर केल्याने केसांचा गुंता सुटतो. केस व्यवस्थित विंचरले गेल्यामुळे केसांची मूळ दुखावली जात नाही. अर्थात केसांना फाटे फुटणे आणि केस गळणे किंवा केस दुभंगणे अशा तक्रारी त्यामुळे मुळीच होत नाही.

केसांना देते पोषण (Nutrients To Hair)

वेगवेगळ्या प्रकारचे कंडिशनर हल्ली मिळतात. केसांचे प्रकार आणि केसांच्या तक्रारी पाहता कंडिशनरमध्ये अनेक नैसर्गिक घटकांचा समावेश असतो. केसांसाठी योग्य कंडिशनरची निवड केली त्यातील पोषक घटक केसांना पोषण देण्याचे काम करतात. शॅम्पूच्या प्रयोगानंतर कंडिशनरचा वापर हा अत्यंत फायदेशीर ठरतो. 

कंडिशनरचा उपयोग कसा करावा (How To Apply Conditioner In Marathi)

कंडिशनरचा उपयोग कसा करावा

ADVERTISEMENT

Instagram

कंडिशनरचे फायदे जाणून घेतल्यानंतर त्याचा नेमका उपयोग करा करायचा हे माहीत नसेल तर जाणून घ्या या महत्वाच्या पायऱ्या. 

  • केसांसाठी योग्य अशा शॅम्पूने केस स्वच्छ धुवून घ्या. शॅम्पूचा सगळा फेस जाऊ द्या. 
  • अगदी कॉईन साईज किंवा केसांच्या लांबीनुसार कंडिशनरची निवड करा. 
  • स्काल्प सोडून केसांना कंडिशनर लावण्याचे काम करा. केसांच्या टोकाला कंडिशनर लावायला विसरु नका. 
  • कंडिशनर हे केसांमध्ये जास्त वेळ ठेवायचे नसते आणि ते जास्त लावायचेही नसते. केसांना कमीत कमी कंडिशनर लावून आणि अगदी 1 मिनिटभर ठेवून केस धुवून टाका.
  • गरम पाण्याचा उपयोग करणार असाल तर तो टाळा. कारण गरम पाण्यामुळे केसांमधून कंडिशनर पूर्णपणे गेले आहे की नाही हे कळत नाही. त्यामुळे कंडिशनर धुताना कोमट पाण्याचा उपयोग करा.
  • कंडिशनर पूर्णपणे गेल्यानंतर मगच टॉवेलने केस कोरडे करुन घ्या. थोडे कोरडे झाल्यावरच केस स्वच्छ पुसून घ्या. 

केसांचे आरोग्य राखण्यासाठी ट्राय करा हे सल्फेट फ्री शॅम्पू (Best Sulphate Free Shampoo)

ADVERTISEMENT

तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’S)

1. केसगळती थांबवण्यासाठी  कंडिशनर चांगले आहे का?
 केसगळती पूर्णपणे थांबवण्यासाठी कंडिशनरचा उपयोग होतो असे ठामपणे सांगता येत नाही. कारण कंडिशनरचा उपयोग हा केसांन मुलायम आणि शाईन आणून देण्यासाठी केला जातो. त्यामुळे केस गळती थांबवणे हा एकमेव फायदा असून शकत नाही. पण कंडिशरच्या वापरामुळे केस  ताणले जात नाहीत. शिवाय केसांच्या मुळांनाही धक्का बसत नाही. केसांचा गुंता अगदी सहज सुटतो. त्यामुळे केसगळती थांबवणे हा याचा उद्देश नाही. 

2. पाण्याने केस धुतल्यानंतर कंडिशनरचा उपयोग केला तर चालेल का? 
 शक्यतो कंडिशनरचा उपयोग उगीचच करु नका. शॅम्पू कंडिशनर अशी पायरी केसांच्या काळजीसाठी आधीपासूनच ठरलेली आहे. हा क्रम मोडण्यात काहीच अर्थ नाही. शॅम्पूचे काम केस स्वच्छ करणे असते. आणि कंडिशनरचे काम स्वच्छता आणि न्युट्रिशन लॉक करणे असते. त्यामुळे कंडिशनरचा उपयोग उगीगचच पाण्याने केस धुतल्यानंतर करु नका. 


3. कंडिशरच्या वापरामुळे केसांचे नुकसान टाळता येते का? 
हो, केसांचे नुकसान म्हणजे केस तुटणे, केस दुभंगणे आणि केसांना फाटे फुटणे . कंडिशनरचा विचार केला तर कंडिशरनचा उपयोगच केसांचे होणारे नुकसान टाळणे असे आहे. कंडिशरनच्या वापरामुळे नक्कीच तुम्हाला काही नुकसान टाळता येतात. 

आता कंडिशर घेताना गोंधळलेले असाल तर आम्ही सांगितलेले कंडिशनर नक्की वापरुन पाहा.

12 Oct 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT