'केस'हा विषय कधीच जुना होऊ शकत नाही. कारण केसांची काळजी घेणाऱ्या कितीही टिप्स सांगितल्या तरी त्या कमी असतात. केसांसाठी तेल, शॅम्पू, कंडिशनर निवडताना आपण नेहमीच आग्रही असतो. केसांच्या तक्रारी लक्षात घेता अनेकांना केसांसाठी नैसर्गिक घटक असलेले प्रोडक्ट हवे असतात. शॅम्पू हा केसांची स्वच्छता करण्यामधील सगळ्यात महत्वाची गोष्ट. अशा शॅम्पूची निवड करताना त्यामधील फायदे आणि तोटे पाहूनच आपण त्यांची निवड करतो. जर तुम्ही ही अशा शॅम्पूच्या शोधात असाल ज्यामध्ये नैसर्गिक घटक असतील आणि तुमच्या केसांचे नुकसानही होणार नाही तर आम्ही तुमच्यासाठी नैसर्गिक घटकांनी युक्त अशा हर्बल शॅम्पूची निवड केली आहे. जाणून घ्या तुमच्यासाठी बेस्ट हर्बल शैम्पू.
हर्बल शॅम्पूची सर्वसाधारण व्याख्या करताना असे केसांचे शॅम्पू ज्यामध्ये आयुर्वेदिक घटकांचा उपयोग करुन केसांची स्वच्छता केली जाणे. केसांसाठी रिठा, आवळा, कडुनिंब, शिकेकाई असे नैसर्गिक आयुर्वेदिक घटक असतात. ज्यांच्या वापरामुळे केस स्वच्छ होणे, स्काल्पचा तेलकटपणा निघून जाणे आणि केसांची अन्य समस्या जसे की, कोंडा, चाई दूर करणे. त्यामुळे इतर कोणत्याही शॅम्पू प्रमाणेच हे शॅम्पू असतात. पण त्यामधील घटकांच्या फरकामुळे हे शॅम्पू वेगळे ठरतात. सल्फेट फ्री शॅम्पू आणि कंडिशनरची निवड करताना तुम्ही काही गोष्टी या त्यामध्ये पाहणेही गरजेचे असते.
तुमच्या बजेटमध्ये बसणारे असे शॅम्पू आम्ही तुमच्यासाठी शोधले आहेत. जाणून घ्या हे बेस्ट शॅम्पू.
आयुर्वेदिक घटकांचा पुरेपूर उपयोग करुन सचदेव आयुर्वेदिक शॅम्पूचा हा शॅम्पू बनवण्यात आला आहे. यामध्ये भृगंराजचे गुणधर्म असून हे केसांच्या वाढीसाठी फारच चांगले असते. केसांना चमक प्रदान करुन त्यांना वाढीसाठी चालना देण्याचे काम हा आयुर्वेदिक शॅम्पू करतो.
फायदे (Pros) : भृंगराज हे केसांना चमक देण्याचे आणि केसांना बळकटी आणण्याचे काम करते. हे प्रोडक्ट पॅराबिन फ्री आणि वीगन आहे. यामध्ये कोणत्याही केमिकल्सचा उपयोग केलेला नाही.
तोटे (Cons) : याची किंमत ही थोडी जास्त आहे. (पण याचा वापर पाहता हा तोटा म्हणता येणार नाही)
फॉरेस्ट इंसेन्शिअल या कंपनीचे हा शॅम्पू हा देखील अनेकांच्या आवडीचा आहे. केसांसाठी आवश्यक असलेल्या भृंगराज आणि शिकेकाई या दोन घटकाचा यामध्ये समावेश आहे. शिकेकाई तुमच्या केसांमधील तेलकटपणा सहजपणे काढून टाकते. तर भृंगराज तुमच्या केसांना चमक देण्याचे काम करते.
फायदे (Pros) : केसांसाठी आवश्यक असलेले इसेन्शिअल ऑईल न काढता केसांमधून अनावश्यक घाण काढून टाकते. त्यामुळे केस स्वच्छ आणि मोकळे होतात.
तोटे (Cons) : तुमच्या ट्रिटमेंट केलेल्या केसांसाठी हा कदाचित जास्त काम करु शकणार नाही.
कामा आयुर्वेदाचा हा एक नावाजलेला शॅम्पू असून अनेक आयुर्वेदिक घटकांनी हा शॅम्पू युक्त आहे. केसांमधील अनावश्यक तेलकटपणा काढून केसांना हेल्दी, नरीश करण्याचे काम करतो. त्यामुळे केसांची चमकही टिकून राहते
फायदे (Pros) : हा शॅम्पू वापरण्यास फारच सोपा आहे. याला लिंबाचा एक सुंगध आहे. जो तुम्हाला फ्रेश ठेवतो.
तोटे (Cons) : जर तुम्हाला लिंबाचा वास आवडत नसेल तर तुम्ही याचा वापर टाळावा. कारण तुम्हाला हा वास मुळीच आवडणार नाही.
8 फायदे एकाच शॅम्पूमध्ये असणारा हा जस्ट हर्ब्सचा शॅम्पू ही आमची पुढची निवड आहे. यामध्ये आवळा, कडुनिंब, हिना यासांरख्या 8 घटकांचा समावेश आहे. जे तुमच्या केसांना मजबूत करण्याचे काम करतात. केसांसाठी आवश्यक असलेला स्काल्प स्वच्छ ठेवून केसांना अधिक चांगले करतात.
फायदे (Pros) : किंमत आणि इतर गोष्टींच्या तुलनेत हा फारच फायदेशीर असा शॅम्पू आहे. त्यामुळे केसांना वेगवेगळ्या पद्धतीने पोषण मिळते.
तोटे (Cons) : जर तुम्हाला एकाचवेळी सगळे घटक नको असतील तर तुम्हाला हे आवडणार नाही
ऑरगॅनिक हार्वेस्ट या कंपनीचा हा शॅम्पू तुम्हाला रोज वापरता येईल असा आहे. जेल बेस्ड असा हा शॅम्पू असून तुमचे केस स्वच्छ करण्यास मदत करतो. यामध्ये कोणत्याही प्रकारचे केमिकल्स वापरण्यात आले नसले तरी यामधील आयुर्वेदिक घटक हे सांगितलेले नाहीत
फायदे (Pros) : बजेटच्या दृष्टिकोनातून हे अगदी परफेक्ट असे प्रोडक्ट आहे जे तुम्हाला कधीही वापरता येईल.
तोटे (Cons) : जेल बेस्ड असल्यामुळे अनेकांना वापरताना अंदाज येत नाही.
कांद्याचे घटक हे केसांसाठी फारच फायदेशीर असतात. शास्त्रशुद्ध पद्धतीने कांद्याचा उपयोग करुन तयार करण्यात आलेला हा शॅम्पू असून केसांना स्वच्छ करण्याचे काम हा शॅम्पू करते. स्काल्प स्वच्छ करुन केसांना स्वच्छ करण्याचे काम हे शॅम्पू करते.
फायदे (Pros) : कांदे तुमची स्काल्प स्वच्छ करुन तुमच्या केसांना स्वच्छ आणि चमकदार बनवते.
तोटे (Cons) : कांद्याचा अर्क तुम्हाला आवडत नसेल तर हा शॅम्पू तुमच्यासाठी नाही.
इंदुलेखा ब्रिंघा क्लिन्झर हे स्त्री - पुरुष यांच्यासाठी चांगले आहे. भृंगराजमुळे तुमच्या केसांची मूळ मजबूत होण्यास मदत मिळते. त्यामुळे याचा वापर फारच फायदेशीर ठरतो. ब्रिंघाचे 5 गुणधर्म असलेले हे घटक तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो.
फायदे (Pros) : केसांच्या वाढीसाठी हा शॅम्पू फायदेशीर आहे. तुमच्या बजेटमध्येही बसणारे आहे.
तोटे (Cons) : जर तुम्हाला ब्रिंघाचा वास आवडणार नसेल तर तुम्हाला हा शॅम्पू आवडणार नाही.
केसांसाठी मेथी ही फारच फायदेशीर असते. त्यामुळे मेथी आणि शिकेकाईचे गुणधर्म असलेले हा शॅम्पू तुमच्यासाठी फारच फायदेशीर आहे. यामुळे तुमच्या केसांना आवश्यक असलेले पोषक घटक मिळतात. त्यामुळे याचा वापर तुमच्यासाठी फायदेशीर ठरतो.
फायदे (Pros) : केसांना रंग केल्यानंतरही तुम्ही याचा उपयोग करु शकता. त्यामुळे अगदी कोणत्याही केसांसाठी हे योग्य प्रोडक्ट आहे.
तोटे (Cons) : मेथी अनेकांना उष्ण वाटते. तुम्हाला त्याचा त्रास असेल तर तुम्ही मेथीचा प्रयोग टाळणेच उत्तम राहील.
वेदाअर्थ चा हा शॅम्पूदेखील अनेकांच्या आवडीचा आहे. हा एक मॉश्चरायझिंग शॅम्पू असून यामुळे तुमचे केस स्वच्छच नाही तर नरीश होतात. त्यामुळे तुमच्या केसांना एकाचवेळी दोन फायदे मिळवून देणारा असा हा बेस्ट शॅम्पू आहे.
फायदे (Pros) : यामध्ये अॅलोवेरा, कोकोनट मिल्क असल्यामुळे केसांना मुलायम करण्यासाठी हे प्रोडक्ट चांगले आहे. नारळाचे दूध आणि अॅलोवेरा हे केसांना स्वच्छ ठेवते. तर यामधील कॅमोमाईल केसांमधील कोंडा काढण्यास मदत करते.
तोटे (Cons) : अनेकांना कोकोनट मिल्कच्या वापरामुळे केस तेलकट होण्याची शक्यता असते.
अत्यंत आयुर्वेदिक अशी संकल्पना असलेले हे क्लिनझर असून यामध्ये आयुर्वेदातील अनेक घटक आहेत. यामध्ये शिकेकाई, मेथी, आवळा असे घटक असून ते तुमचे केस क्लिन्झ करण्याचे काम करते त्यामुळे तुम्ही याचा वापर करु शकता.
फायदे (Pros) : केसांसाठी अत्यंत फायदेशीर असे हे प्रोडक्ट आहे. तुम्ही याचा कधीही वापरु शकता.
तोटे (Cons) : याचे पॅकेजिंग इतर शॅम्पू प्रमाणे हाताळायला अजिबात सोपे नाही.
हर्बल शॅम्पूमधील काही घटक पाहता त्याचे फायदे केसांसाठी आवश्यक असतात, जाणून घ्या हर्बल शॅम्पू वापरण्याचे फायदे.
हर्बल शॅम्पूमध्ये आवळा, हिना, शिकेकाई, रिठा, भृंगराज असे केसांसाठी आवश्यक असलेले घटक असतात. हे नैसर्गिक घटक केसांसाठी फारच फायदेशीर ठरतात. त्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत मिळते. नैसर्गिक घटकांमुळे केसांसंदर्भात असलेले इतर त्रास कमी होतात. आणि केमिकल्सच्या अतिवापरामुळे केसांना होणारा त्रासही कमी होतो.
केस चांगले टिकवायचे असतील तर केसांना बळकटी मिळणे हे जास्त गरजेचे असते. अनेकदा केमिकल्सच्या वापरामुळे केसांची मूळ कमजोर होतात. तर नैसर्गिक घटक असलेल्या गोष्टींमुळे केसांची मूळ मजबुत राहण्यास मदत मिळते. स्काल्पवर असलेल्या छिद्रांना स्वच्छ ठेवून केसांच्या मुळांना मजबूत करण्याचे काम ही हर्बल शॅम्पू करते. केस चांगले असतील पण ते कायम चांगले राहावे असे वाटत असतील तर तुम्ही अगदी हमखास हर्बल शॅम्पूचा वापर फायदेशीर ठरतो.
प्रदूषण, सूर्याची अतिनील किरणांचा त्रास केसांना अधिक होतो. त्यामुळे केसांचे नुकसान होते. शिवाय केसांवर केमिकल्सचा अति प्रयोग केल्यामुळेही केसांचे नुकसान होऊ शकते. केसांचे हे नुकसान कमी करण्याचे काम हर्बल शॅम्पू करते. हर्बल शॅम्पूमधील महत्वाचे घटक असतात जे केसांवर एक सुरक्षा कवच तयार करतात. त्यामुळे केसांचे नुकसान होत नाही.
केसांच्या वाढीसोबतच केसांसाठी आवश्यक असलेली गोष्ट म्हणजे केस, मऊ, मुलायम राहणे हे देखील गरजेचे असते. केसांना चमक असली तर ते केस अधिक चांगले दिसतात. नैसर्गिक घटक केसांवर एक चमक आणतात. शिवाय केसांना मुळापासून पोषण देण्याचे काम करतात. केसांची मूळ चांगली मजबूत राहिली की,केसांना मुळापासून आराम देखील मिळतो. त्यामुळे नैसर्गिकरित्या केस कंडिशन करण्याचे काम यामध्ये केले जाते. केसांसाठी हे एक प्रकारचे नैसर्गिक कंडिशनर आहे
नैसर्गिक घटक हे नेहमी केसांसाठी फायदेशीर असतात. हेअर प्रोडक्टमध्ये असलेल्या नैसर्गिक घटकांना शरीराच्या इतर कोणत्याही भागावर त्रास होत नाही. त्यामुळे हर्बल शॅम्पूमध्ये हानिकारक असे कोणतेही केमिकल्स नसतात. ज्यामुळे केसांचे कोणत्याही प्रकारे नुकसान होत नाही.
1. हर्बल शॅम्पू वापरणे सुरक्षित आहे का?
हो, हर्बल शॅम्पू वापरणे हे नेहमीच सुरक्षित असते. हर्बल शॅम्पूमध्ये कोणतेच हानिकारक घटक नसतात. त्याच्या वापरामुळे केसांना कोणतेही नुकसान होत नाही. त्यामुळे तुम्ही अगदी आरामात हर्बल शैम्पूचा उपयोग करु शकता. हर्बल शॅम्पूची निवड करताना तुम्ही त्यातील तुमच्यासाठी हानिकारक असलेले घटक सोडून तुम्ही त्यांची निवड केल्यास उत्तम
2. केसांच्या वाढीसाठी हर्बल शॅम्पू मदत करते का?
केसांच्या वाढीसाठी शॅम्पू हे कधीच फायदेशीर नसतात. शॅम्पू हे फक्त स्काल्प स्वच्छ करण्याचे काम करते. त्यामुळे तुमचे स्काल्प स्वच्छ करते. केसांच्या मुळाची छिद्रांजवळ असलेला कोंडा आणि निघून जातो. त्यामुळे केसांची मूळ मजबूत होतात. त्यामुळे केसांच्या वाढीला चालना मिळते.
3. हर्बल शॅम्पू बजेटमध्ये येतात का?
हो, हर्बल शॅम्पू हे इतर कोणत्याही शॅम्पूच्या तुलनेत फार स्वस्त असतात. पण जर तुम्ही 100% हर्बल शॅम्पूच्या शोधात असाल आणि असे काही ब्रँड असतील तर त्यांचे शॅम्पू नक्कीच महाग असतात. कारण हल्ली फार कमी शॅम्पू हे केमिकल फ्री असतात. केमिकल फ्री आणि हर्बल घटक असणे हे फार वेगळे असते. त्यामुळे त्यांच्या किंमती या कमी-जास्त ब्रँडवर अवलंबून असतात.