सध्या कोरोना असला तरीही अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकत आहेत तर अनेकांच्या घरी गुड न्यूज ऐकू येत आहेत. गेल्या एक दोन महिन्यात तर अनेक सेलिब्रिटींनी आपण लग्न करत असल्याचे सांगितले तर काहींनी लवकरच आई अथवा बाबा होणार असल्याचे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केले. यामध्ये मराठी अभिनेत्रीही मागे राहिल्या नाहीत. धनश्री काडगावकर लवकरच आई होणार आहे तर शर्मिष्ठा राऊतने नुकतंच धुमधडाक्यात लग्न केलं. तर अभिज्ञा भावेने साखरपुड्याची घोषणा करत सर्वांना सुखद धक्का दिला आणि आता यामध्ये चर्चा सुरू झाली आहे ती ‘बिग बॉस’फेम रूपाली भोसलेच्या लग्नाची. रूपाली नेहमीच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून फोटो शेअर करत असते. तिने आपले अंकित मगरेसह असणारे नाते लपवलेले नाही. पण आता तिच्या एका फोटोवरून तिने गुपचूप लग्न तर नाही ना केले अशा चर्चांना उधाण आले आहे आणि त्याला कारणही तसंच आहे.
सेलिब्रिटीची पसंती ठरतेय महाराष्ट्रीयन खणाची साडी
व्हायरल फोटोमध्ये गळ्यात मंगळसूत्र
रूपाली भोसले सध्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत संजना ही भूमिका साकारत असून तिची ही भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. रूपाली नेहमी आपल्या सोशल मीडियावरून वेगवेगळे फोटो शेअर करत असते. तर रूपाली आणि अंकीत मगरे यांनी आपल्या प्रेमाची कबुली कधीच दिली आहे. त्यामुळे अंकित नेहमीच तिच्या सेटवरही तिला सरप्राईज द्यायला जात असतो. असाच एक अंकितसह फोटो रूपालीने शेअर केला आहे. पण काही दिवसांपूर्वी शेअर केलेला हा फोटो वेगळ्या कारणासाठी व्हायरल होतो आहे. रूपालीने या फोटोमध्ये गळ्यात घातलेलं मंगळसूत्र तिच्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. अंकितबरोबर असताना रूपाली नेहमीच आनंदी दिसते. पण या फोटोमुळे सगळ्यांनाच आता प्रश्न पडला आहे की, रूपालीने अंकितसह गुपचूप लग्न तर नाही ना केलं? याबबात अजूनही रूपाली अथवा अंकितकडून कोणतीही स्पष्टता आली नसली तरीही हा फोटो सेटवरचा असून संजनाच्या भूमिकेत असताना काढला असावा असा तर्कही काढला जात आहे. पण तरीही रूपालीच्या या फोटोमुळे तिचे चाहते नक्कीच बुचकळ्यात पडले आहेत. कारण नुकतेच शर्मिष्ठानेही लग्न केले आहे आणि आता लवकरच रूपालीकडूनही ही गोड बातमी मिळेल असंच तिच्या चाहत्यांना वाटत होते. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात असून रूपालीच या गोष्टीचे स्पष्टीकरण देऊ शकेल असंही म्हटलं जात आहे.
ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘मिर्झापूर 2’ ची चर्चा
रूपालीचा मिस्टर सरप्राईज
रूपाली आणि अंकीत एकमेकांवरील प्रेम कधीही लपवत नाहीत. नुकताच रूपालीने एक फोटो शेअर करत अंकित तिला नेहमी सरप्राईज देत आनंद देत असतो असंही सांगितलं आहे. तर तिने त्याला मिस्टर सरप्राईज असंही या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. कितीही कामात असल्यानंतर त्याला पाहून मिळणारा आनंद हा अविश्वसनीय आहे अशी भावना तिने व्यक्त करत त्याच्यावरील आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. रूपाली नेहमीच अंकितबरोबर आपले फोटो पोस्ट करत आपल्या आयुष्यातील आनंद आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करत असते. पण मंगळसूत्राचा उलगडा मात्र अजूनही झालेला नाही. त्यामुळे आता रूपाली अथवा अंकितकडूनच याची स्पष्टता येईपर्यंत चाहत्यांना वाट पाहावी लागेल.
अभिनेत्री रेखाच्या सौंदर्याचे हे आहे रहस्य, चिरतरूण दिसण्यासाठी करते हे उपाय
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक