सुकामेव्यामध्ये अक्रोड हे शरीरासाठीअत्यंत पोषक असल्यामुळे त्याची गणना सुपरफूडसमध्ये केली जाते. अक्रोड हृदय, मेंदू आणि पोटाच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात. अक्रोडमध्ये मुख्यत्वे चांगले आणि पॉलिअनसॅच्युरेटेड फॅट्स (13 ग्रॅम/ 28 ग्रॅम) असतात. मात्र आरोग्यासाठी उत्तम असूनही बऱ्याच काळापासून अक्रोडबद्दल अनेक गैरसमज आणि चुकीची माहिती लोकांमध्ये आहे. फ्रीडम वेलनेस मॅनेजमेंटच्या संस्थापक आणि एक ख्यातनाम आहारतज्ञ नाजनीन हुसैन यांनी अक्रोडांबद्दल या नेहमीच्या सहा गैरसमजुती दूर केल्या आहेत आणि काही तथ्ये लोकांसमोर मांडली आहेत. जाणून घेऊया अक्रोडबद्दल ही विशेष माहिती.
अक्रोडाच्या सुपरफूडमधून जास्तीत-जास्त फायदे मिळवण्यासाठी दररोज किमान सात अक्रोड (12-14 मगज) म्हणजे मूठभर किंवा 28 ग्रॅम अक्रोड खाणे गरजेचं असतं.कारण मूठभर अक्रोड आपल्याला विविध प्रकारचे पोषक घटक देतात. त्यात 2.5 ग्रॅम अल्फा-लिनोलेनिक अॅसिड (एएलए)- हे ओमेगा-3 चे रोपांवर आधारित तत्त्व आहे आणि ते दुसऱ्या नट्सच्या तुलनेत अक्रोडमध्ये ते पाच पटींपेक्षा जास्त असते. त्यासोबत चार ग्रॅम प्रथिने आणि दोन ग्रॅम फायबरही त्यात असतात. काही लोक आपली सकाळ अक्रोडाने सुरू करणे पसंत करतात. पण असं मुळीच नाही तुम्ही कधीही अक्रोड खाऊ शकता. पोषक घटक आणि आरोग्याच्या फायद्यांनी युक्त एक उत्तम आहार असण्याबरोबरच अक्रोड तुमच्या रेसिपीजनांदेखील एक विशेष चव आणि पोषण देतात.
अत्यावश्यक ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स आणि जीवनसत्त्वे व खनिजांच्या आरोग्यपूर्ण मिश्रणासाठी अक्रोडांचे सेवन संपूर्ण वर्षभर केले पाहिजे. तुमच्या रोजच्या आहारात या चविष्ट अक्रोडांचा समावेश केल्यामुळे, तुमची ऊर्जा चांगली राहते, तुम्ही लक्ष केंद्रित करून राहू शकता आणि उत्साही राहता. त्यामुळे, तुम्हाला प्रचंड उन्हाळ्याच्या दिवसांत दुपारी चार वाजता ऊर्जा हवी असेल तर अक्रोड नक्की खा. अक्रोड एक संपूर्ण पोटभरीचे आणि आनंददायी खाद्य असले तरी तुम्ही त्यांना हंगामी पदार्थांसोबत जोडून तुमचे जेवण चौरस बनवू शकता. उन्हाळ्यातील सकस आहारासाठी सॅलडमधील क्रूटॉन्सऐवजी अक्रोडांचा समावेश करा, तुमच्या स्मूदीमध्ये अक्रोड वापरा, योगर्ट, सीरियल, पॅनकेक्सवर भुरभुरवा आणि ताजेतवाने करणाऱ्या उन्हाळ्यातील डेझर्टसोबत तुमचे आइस्क्रीम किंवा कोणतेही ताजे फळ टॉप अप करा.
लोकांना असे वाटते की, भिजवलेले अक्रोड हे सुक्या अक्रोडांपेक्षा जास्त फायदेशीर असतात मात्र हे खरे नाही. तुम्ही अक्रोड भिजवले तर पाण्यात उतरणारे पोषक घटक आपल्याला मिळण्यासाठी तुम्हाला त्याचे पाणीही प्यावे लागेल. ते कच्चे खा, भाजून घ्या किंवा तुमच्या आहारात ते बारीक करून घ्या. अक्रोडांचे पोषक स्वरूप कायम राहते.
शरीराचे वजन आणि शरीराची रचना यांच्यावर अक्रोडांचा नकारात्मक परिणाम होत नाही. एक संपूर्ण सकस आहाराचा भाग म्हणून सेवन केल्यास अक्रोड हे शरीराचे योग्य वजन मिळवण्यासाठी एक महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. अक्रोडांचे नियमित सेवन अत्यंत सकस असते, कारण त्यात पोषक घटक आणि अँटीऑक्सिडंट्स आहेत. हृदयासाठी उत्तम अनसॅच्युरेटेड फॅट्सनी युक्त असलेले अक्रोड तुमचे पोट भरू शकतात आणि भुकेवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात- हे वजन चांगले ठेवण्यासाठी महत्त्वाचे घटक आहेत.
तुम्ही योग्य प्रकारे साठवणूक केल्यास जवळपास एक वर्षभर अक्रोडाची उत्तम चव आणि दर्जा राखू शकता. अक्रोड हे सकस फॅट्सनी युक्त असतात आणि उबदार वातावरणात दीर्घकाळ ठेवल्यास ते खवट होतात. त्याचा ताजेपणा कायम ठेवण्यासाठी तुम्हाला अक्रोड महिनाभर वापरायचे असतील तर ते एका एअरटाइट डब्यात अक्रोड फ्रीजमध्ये ठेवा. तुम्ही ते एक महिना किंवा दीर्घकाळ साठवणार असाल त्यांना फ्रीजरमध्ये ठेवा. अक्रोड साठवत असताना उग्र वास असलेल्या अन्नापासून त्यांना दूर ठेवा कारण ते इतर पदार्थांचा सुगंध शोषू शकतात. संपूर्ण वर्षभर ताज्या चवीच्या अक्रोडांचा आनंद घेण्यासाठी या स्टोअरेज टिप्सचे पालन करा.
अक्रोड प्रत्यक्षात धोकादायक एलडीएल कोलेस्टरॉल कमी करण्यात आणि उपयुक्त एचडीएल कोलेस्टरॉलच्या पातळ्या वाढवण्यासाठी मदत करू शकतात. संशोधनातून हे दिसून आले आहे की, अक्रोडासारख्या पदार्थांत सापडणारे ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स जास्त कोलेस्टरॉल असलेल्या लोकांमध्ये सी-रिअॅक्टिव्ह प्रोटीन (सीआरपी) हा सूज निर्माण करणारा घटक कमी करू शकतात. अक्रोड हे रक्तदाब कमी करण्यासाठी आणि रक्तशर्करा पातळ्यांच्या नियमनासाठीही फायदेशीर ठरू शकतात. एका सकस आहाराचा भाग म्हणून अक्रोड खाल्ल्याने तुमचा हृदयविकार आणि स्ट्रोक या दोन्हींचा धोका कमी होऊ शकतो.त्यामुळे अक्रोड दररोज कोणत्याही अपराधी भावनेशिवाय खा. ते कच्चे खा, तुमच्या सॅलड्समध्ये घ्या किंवा तुमच्या आवडत्या रेसिपींमध्ये समाविष्ट करून उत्तम आरोग्यासाठी त्यांना तुमच्या रोजच्या आहाराचा भाग बनवा.