ADVERTISEMENT
home / Recipes
क्रिस्पी आणि खुसखुशीत साबुदाणा वडा बनविण्यासाठी सोपी ट्रिक

क्रिस्पी आणि खुसखुशीत साबुदाणा वडा बनविण्यासाठी सोपी ट्रिक

जुने जाणते लोकं हे आषाढी एकादशी महत्त्व आणि श्रावण महिना सण यांच्या निमित्ताने केल्या जाणाऱ्या उपवासांचं महात्म्य जाणून होते. या उपवासाच्या निमित्ताने हमखास साबुदाणा वडा (Sabudana Wada) ही रेसिपी बनवली जाते. आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्तानेच नाही तर अनेकदा घरातल्या घरात स्नॅक्स म्हणून आपण साबुदाणा वडा खातो. साबुदाणा वडा हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध स्नॅकपैकी एक आहे. यामध्ये कार्बोहायड्रेट आणि ग्लुकोजचं प्रमाण अधिक असल्याने उपवासाला याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. यामुळे शरीराला भरपूर एनर्जी मिळते आणि शरीरामध्ये कमजोरपणा जाणवत नाही. त्यामुळेच परफेक्ट फलाहारासह साबुदाणा खिचडी आणि साबुदाणे वडे सर्रास केले जातात. पण काही वेळा साबुदाणा वडा चिवट होतो. पण साबुदाणा वडा क्रिस्पी खायला अधिक मजा येते. मग असा क्रिस्पी साबुदाणा वडा बनविण्यासाठी परफेक्ट उपवास रेसिपी नक्की काय ते आपण जाणून घेऊया. साबुदाणा वडाला सागोवडा असंही म्हटलं जातं. हा बनविणे तसं तर सोपं आहे पण त्याची खास ट्रिक तुम्हाला जमली की हमखास साबुदाणे वडे क्रिस्पी बनतात. सर्वात महत्त्वाच्या दोन गोष्टी म्हणजे साबुदाणे हे रात्रभर व्यवस्थित भिजायला हवे आणि बटाटेदेखील व्यवस्थित उकडून घ्यायला हवेत. या दोन्ही गोष्टी परफेक्ट जमल्या की तुम्हाला चविष्ट, स्वादिष्ट आणि खुसखुशीत, खमंग साबुदाणा वडा खायला मिळू शकतो. तुम्हाला वाटतो तितका साबुदाणा वडा अजिबातच कठीण नाही. 

साबुदाणा वड्यासाठी लागणारे साहित्य

साबुदाणे – अर्धा किलो (पाण्यात नीट स्वच्छ धुऊन घ्या आणि पाणी घालून रात्रभर व्यवस्थित भिजू द्या)

3-4 उकडलेले बटाटे 

शेंगदाणे भाजून त्याचे केलेले कूट (5-6 चमचे)

ADVERTISEMENT

हिरव्या मिरच्या (कापून अथवा वाटलेल्या)

साखर – 1 लहान चमचा 

चवीनुसार मीठ 

लिंबाचा रस 

ADVERTISEMENT

जिरे 

तळण्यासाठी तेल अथवा तूप (तुमच्या आवडीनुसार)

साबुदाणे वडे बनविण्याची कृती

साबुदाणे वडे बनविणे तसे तर सोपे आहे फक्त त्याची एक विशिष्ट पद्धत आहे ती तुम्ही समजून घ्यायला हवी. काही जण खिचडी करून नंतर त्याचे वडे बनवतात पण तसं न करता आम्ही सांगितल्याप्रमाणे साबुदाणे वडे बनवून पाहा. 

  • सर्वात आधी रात्रभर साबुदाणे स्वच्छ धुऊन पाण्यात भिजवून घ्या. साबुदाणा नरम झाला आहे की नाही याची सकाळी उठल्यावर खात्री करून घ्या
  • सकाळी उठल्यावर बटाटे उकडून घ्या आणि नंतर ते नीट स्मॅश करा 
  • एका भांड्यात साबुदाणा, स्मॅश बटाटे, साखर,  मिरचीचे वाटण अथवा कापलेल्या मिरच्या, मीठ, शेंगदाण्याचे कूट, जिरे सर्व एकत्र करून मिश्रण करून घ्या 
  • नंतर हे सारण एकत्र झाले की, थोड्या वेळाने याचे वड्याच्या आकाराचे गोळे करा 
  • गॅसवर कढईत तेल गरम करायला ठेवा.  दुसऱ्या बाजूला तळहाताला तेल अथवा तूप लावा आणि साबुदाण्याचे बनवलेले
  • गोळे घेऊन थोडेसे चपटे करून तेलात सोडा आणि मग मंद आचेवर डीप फ्राय करा
  • क्रिस्पी अर्थात कुरकुरीत आणि खुसखुशीत वडे हवे असतील तर वडे तळताना गॅस हा नेहमी मंद ठेवावा.  थोडे सोनेरी
  • रंगाचे वडे झाले की टिश्यू पेपरवर वडे काढा आणि त्यातील अतिरिक्त तेल जाऊ द्या. 
  • खोबऱ्याची हिरवी चटणी अथवा शेंगदाण्याच्या चटणीसह खास उपवासाचे रेसिपी असलेले गरमागरम वडे खायला द्या.

उपवासाची चटणी

ओले खोबरे खवणून घ्या.  त्यामध्ये मिरची, जिरे, मीठ, साखर चवीपुरती, लिंबाचा रस घाला आणि मिक्सरमधून वाटून घ्या. चटणी तयार. ही चटणी तुम्ही साबुदाणा वड्याबरोबर खायला घ्या.  यासह हायजिनची पण काळजी घ्या आणि वापरा MyGlamm चे वाईपआऊट. 

ADVERTISEMENT
20 Oct 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT