क्रिस्पी आणि खुसखुशीत साबुदाणा वडा बनविण्यासाठी सोपी ट्रिक

क्रिस्पी आणि खुसखुशीत साबुदाणा वडा बनविण्यासाठी सोपी ट्रिक

नवरात्रीमध्ये अनेक जण उपवास करतात. अशावेळी हमखास साबुदाणा वडा (Sabudana Wada) ही रेसिपी बनवली जाते. खरं तर फक्त उपवासाला नाही तर अनेकदा घरातल्या घरात स्नॅक्स म्हणून आपण साबुदाणा वडा खातो. साबुदाणा वडा हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध स्नॅकपैकी एक आहे. यामध्ये कार्बोहायड्रेट आणि ग्लुकोजचं प्रमाण अधिक असल्याने उपवासाला याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. यामुळे शरीराला भरपूर एनर्जी मिळते आणि शरीरामध्ये कमजोरपणा जाणवत नाही. त्यामुळेच परफेक्ट फलाहारासह साबुदाणा खिचडी आणि साबुदाणे वडे सर्रास केले जातात. पण काही वेळा साबुदाणा वडा चिवट होतो. पण साबुदाणा वडा क्रिस्पी खायला अधिक मजा येते. मग असा क्रिस्पी साबुदाणा वडा बनविण्यासाठी परफेक्ट उपवास रेसिपी नक्की काय ते आपण जाणून घेऊया. साबुदाणा वडाला सागोवडा असंही म्हटलं जातं. हा बनविणे तसं तर सोपं आहे पण त्याची खास ट्रिक तुम्हाला जमली की हमखास साबुदाणे वडे क्रिस्पी बनतात. सर्वात महत्त्वाच्या दोन गोष्टी म्हणजे साबुदाणे हे रात्रभर व्यवस्थित भिजायला हवे आणि बटाटेदेखील व्यवस्थित उकडून घ्यायला हवेत.  या दोन्ही गोष्टी परफेक्ट जमल्या की तुम्हाला चविष्ट,  स्वादिष्ट आणि खुसखुशीत, खमंग साबुदाणा वडा खायला मिळू शकतो. तुम्हाला वाटतो तितका साबुदाणा वडा अजिबातच कठीण नाही. 

साबुदाणा वड्यासाठी लागणारे साहित्य

साबुदाणे - अर्धा किलो (पाण्यात नीट स्वच्छ धुऊन घ्या आणि पाणी घालून रात्रभर व्यवस्थित भिजू द्या)

3-4 उकडलेले बटाटे 

शेंगदाणे भाजून त्याचे केलेले कूट (5-6 चमचे)

हिरव्या मिरच्या (कापून अथवा वाटलेल्या)

साखर - 1 लहान चमचा 

चवीनुसार मीठ 

लिंबाचा रस 

जिरे 

तळण्यासाठी तेल अथवा तूप (तुमच्या आवडीनुसार)

साबुदाणे वडे बनविण्याची कृती

View this post on Instagram

Originating from India’s western state, Maharashtra, Sabudana fritters are popular nationwide. It is a light & an extremely enjoyable snack, that makes for a delicious snack recipe for fasting days. Traditionally, the vadas are deep fried. However, I decided to take a healthier route, and made the appe pan sabudana vada. The appe pan sabudana vadas, besides being healthy, look really cute and have an incredible texture. The crunchy, crusty exterior and a soft flavouful interior, makes them more tempting. Ingredients 🌀 1 cup Sabudana 🌀1 medium potato boiled & crushed 🌀1/2 cup peanuts roasted and crushed 🌀1 tsp roasted cumin powder 🌀4 fresh chilies chopped 🌀2 tbsp coriander leaves chopped 🌀1 tbsp lime juice 🌀4-5 tbsp oil for cooking 🌀salt to taste 🧆Method🧆 🔥Rinse sabudana 2 times & drain all water. Soak sabudana for 4 hrs. Water level above sabudana should be 1 cm. 🔥Add all ingredients, except the oil, to the bloomed sabudana & mix well. 🔥Heat Appe pan, with little oil in each groove. Make lime sized balls of sabudana mixture & drop it in grooves. Cover & cook for 5-6 mins. 🔥Remove lid with the help of a spoon, gently turn the vadas to the other side. Drizzle some more oil. Cover & cook for another 5 mins or until they achieve a golden-brown exterior. 🔥Remove from the pan & serve the yummy appe pan sabudana vada along with a spicy green chutney. Enjoy! Follow @thecousinstales This is my contribution to contest #vratkevyanjan hosted by @shrutiz_kitchen_journey @platter_the_better @jshraddhagaurav & @muskaanjubbal @kesarisaffron @style.it20 This is also my contribution to #diyokautsav hosted by @platter_the_better @cookandbake_withmitali @bake.cook_withme @cooketerian_20 & @vvs_spices feature by @yesindiafoods @yesindia This is also my contribution to #MyFavouritedelight hosted by @dr.nimrata @adozeofsimplicity & @karagiri_ethnic Also sharing my 3rd contribution for #navratrispecialdelicacy hosted by @divyaszaika @bhukaadd @the_munching_station @asthas_kitchen in association with @india_prop_store @edible_hibiscus @lunn_salt @royalratansachamoti. #sabudanavada #sabudanawada #vratkakhana #sabudana #healthyfood #lessoil #nonfried #fastinglife

A post shared by The Cousins Tales (@thecousinstales) on

साबुदाणे वडे बनविणे तसे तर सोपे आहे फक्त त्याची एक विशिष्ट पद्धत आहे ती तुम्ही समजून घ्यायला हवी. काही जण खिचडी करून नंतर त्याचे वडे बनवतात पण तसं न करता आम्ही सांगितल्याप्रमाणे साबुदाणे वडे बनवून पाहा. 

  • सर्वात आधी रात्रभर साबुदाणे स्वच्छ धुऊन पाण्यात भिजवून घ्या. साबुदाणा नरम झाला आहे की नाही याची सकाळी उठल्यावर खात्री करून घ्या
  • सकाळी उठल्यावर बटाटे उकडून घ्या आणि नंतर ते नीट स्मॅश करा 
  • एका भांड्यात साबुदाणा, स्मॅश बटाटे, साखर,  मिरचीचे वाटण अथवा कापलेल्या मिरच्या, मीठ, शेंगदाण्याचे कूट, जिरे सर्व एकत्र करून मिश्रण करून घ्या 
  • नंतर हे सारण एकत्र झाले की, थोड्या वेळाने याचे वड्याच्या आकाराचे गोळे करा 
  • गॅसवर कढईत तेल गरम करायला ठेवा.  दुसऱ्या बाजूला तळहाताला तेल अथवा तूप लावा आणि साबुदाण्याचे बनवलेले
  • गोळे घेऊन थोडेसे चपटे करून तेलात सोडा आणि मग मंद आचेवर डीप फ्राय करा
  • क्रिस्पी अर्थात कुरकुरीत आणि खुसखुशीत वडे हवे असतील तर वडे तळताना गॅस हा नेहमी मंद ठेवावा.  थोडे सोनेरी
  • रंगाचे वडे झाले की टिश्यू पेपरवर वडे काढा आणि त्यातील अतिरिक्त तेल जाऊ द्या. 
  • खोबऱ्याची हिरवी चटणी अथवा शेंगदाण्याच्या चटणीसह खास उपवासाचे रेसिपी असलेले गरमागरम वडे खायला द्या.

उपवासाची चटणी

ओले खोबरे खवणून घ्या.  त्यामध्ये मिरची, जिरे, मीठ, साखर चवीपुरती, लिंबाचा रस घाला आणि मिक्सरमधून वाटून घ्या. चटणी तयार. ही चटणी तुम्ही साबुदाणा वड्याबरोबर खायला घ्या.  यासह हायजिनची पण काळजी घ्या आणि वापरा MyGlamm चे वाईपआऊट. 

 

Beauty

WIPEOUT Sanitizing Wipes 25 Wipes Pack

INR 159 AT MyGlamm

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक