अमृता खानविलकरचे हे मेकअप लुक नक्की करा ट्राय

अमृता खानविलकरचे हे मेकअप लुक नक्की करा ट्राय

सुंदर स्किन, परफेक्ट फिगर आणि स्टनिंग लुक अशी ओळख असलेली मराठमोळी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. तिचा इनस्टाग्रामवरील प्रत्येक फोटो हा परफेक्ट असतो. तिच्या अटायरसोबत तिचा मेकअप हा नेहमीच तिच्या लुकमध्ये चार चाँद लावतो. अमृताचे सगळेच फोटो आणि मेकअप स्टाईल एकदम साध्या आणि स्टायलिश आहेत. पण तिच्या फोटोंमधून आम्ही काही निवडक मेकअप लुक निवडले असून तिच्यासारखा लुक घरीच कसा मिळवता येतील ते आज आपण जाणून घेऊया.

केसगळती थांबविण्यासाठी वापरा हॉट मलायकाच्या टिप्स

सागर जैसी आखोंवाली

Instagram

अमृताने शेअर केलेला हा फोटो फारच सुंदर आहे. गुलाबी रंगाचा ऑफशोल्डर ड्रेस आणि मेस्सी कर्ली हेअर असा हा लुक आहे. पण या फोटोमध्ये सगळ्यात जास्त भाव खाऊन जात आहेत ते तिचे डोळे. गुलाबी रंगाच्या ड्रेसला निळ्या रंगाच्या आयशॅडोचा उपयोग केला आहे. #crease पर्यंतच ते लावण्यात आले आहे त्यामुळे हा रंग डोळ्यांच्या वरच्या भागाला अधिक उठून दिसत आहे. 

घरीच करा असा लुक 

 •  अमृताच्या चेहऱ्यावर या लुकमध्ये फारच कमी मेकअप दिसत आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या स्किनटोननुसार चेहऱ्याला प्राईमर, फाऊंडेशन किंवा तुमची CC क्रिम लावून घ्या. 
 • MyGlamm चा Powder eyeshadow pencil मधील AQUAMARINE हा रंग घ्या. डोळ्यांच्या क्रिसलाईनपर्यंत ही पेन्सिल ओढून घ्या. जर तुम्हाला क्रिसलाईनचा अंदाज नसेल तर तुम्ही ज्या पद्धतीने जाड आयलायनर लावता तसे लावा. डोळ्यांच्या कडांच्या बाहेर ते जाऊ देऊ नका. 
 • वॉटरलाईनला पांढऱ्या रंगाची आयपेन्सिल फिरवून घ्या. त्याच्या खाली थोडे काजळ लावून ते स्मज करा म्हणजे डोळे खोल आणि मोठे वाटतील. 
 • आणि हो डोळ्यांना मस्कारा लावायला विसरु नका. 
 • लिपस्टिकचा विचार करता अमृताच्या स्किनटोननुसार तिने लावलेला पिंक लिपस्टिकचा शेड तिला न्यूड दिसत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि स्किनटोननुसार त्याची निवड करु शकता. 

 सॉफ्ट ग्लॅम मेकअप म्हणजे काय?

 

Beauty

Powder Magic Eyeshadow Pencil - Aquamarine

INR 950 AT MyGlamm

खोया खोया चाँद

Instagram

अमृता किती कमीत कमी मेकअपमध्ये असते हे तुम्ही पहिल्या लुकवरुन  ओळखलंच असेल आता हा दुसरा लुकही फक्त डोळ्यांचा खेळ आहे.यामध्येही डोळ्यांवर जास्त फोकस करण्यात आला आहे. या शिवाय या मेकअप लुकमध्ये जर कोणी चार चाँद लावले असतील तर ते तिच्या लाईट ब्लशने जे कॉन्टोरींग आणि ग्लो देण्याचे काम करत आहे. 

असा साध्य करा हा लुक 

 •  चेहरा प्रेप केल्यानंतर सगळ्यात आधी आयब्रोज करुन घ्या आयब्रोजसाठी MyGlamm ची LIT BROW DEFINER PENCIL चा वापर करु शकता. स्पुली ब्रशने आयब्रोज व्यवस्थित विंचरुन ते फिल करुन घ्या. 
 •  हिच पेन्सिल डोळ्यांच्या वॉटरलाईनवर अर्धवट लावून ती ब्रशच्या मदतीने स्मज करा. 
 • डोळ्यांवर म्हणजेच आयलायनरच्या जागी त्याचा वापर अगदी कमीतकमी आणि बारीक लाईन काढा आणि ब्रशच्या मदतीने स्मज करा. डोळ्यांच्या पापण्याच्या खाली लावताना डोळा वरच्या दिशेने वर ओढून तेथेही काजळ लावा म्हणजे डोळा उठून दिसेल. 
 • आता महत्वाचे आहे ते म्हणजे ब्लशर . तुम्ही ब्लशर कम हायलायटरची निवड करा. म्हणजे हा लुक करण्यासाठी तुमचे दोन्ही उद्देश साध्य होतील .

या मजेशीर ब्युटी ट्रेंडमुळे तुमचा मूड होईल चेंज

Beauty

LIT Brow Definer Pencil

INR 495 AT MyGlamm

कजरारे कजरारे तेरे काले काले नैना

Instagram

अमृताचा हा लुक एकदम सेक्सी आणि सिझलिंग आहे. कोणत्याही पार्टीवेअरवर तुम्हाला तुमच्या डोळ्यांनी घायाळ करायचे असेल तर अमृताचा हा स्मोकी आय लुक करायला हवा. अमृताचा हा मेकअपही फार कठीण नाही. फक्त योग्य पद्धतीने केला तर तो अधिक चांगला उठून दिसेल

असा साध्य करा लुक: 

 • चेहरा प्रेप केल्यानंतर डोळ्यांना कन्सिलर लावून घ्या. तुमच्याकडे असलेला न्यूड शेडचा आयशॅडो लावून घ्या. 
 • आता तुम्ही यासाठी काळ्या आयशॅडोचा उपयोग करु शकता. पण जर तुम्हाला त्याची फार खात्री नसेल तर तुम्ही थेट काजळ पेन्सिलचा उपयोग केला तरी चालू शकेल. 
 • डोळ्यांवर आयलायनर प्रमाणे काजळ लावून ते ब्रशच्या मदतीने गोलाकार फिरवत क्रिसलाईनपर्यंत आणा. 
 • डोळ्यांखाली वॉटरलाईन सोडून थोडे खाली काजळ लावा तेही हलके स्मज करा. डोळे अधिक उठून दिसण्यासाठी वॉटरलाईनला पांढरे काजळ लावा. लुक रेडी. 

अमृताचा मेकअप हा नेहमीच क्लासी आणि कमीत कमी असतो. त्यामुळे मेकअपचा खूप प्रयोग करु नका 

Beauty

MyGlamm Manish Malhotra 9 in 1 Eyeshadow Palette - Reverie

INR 1,850 AT MyGlamm