डागविरहीत त्वचेसाठी करा वेलचीच्या फेसपॅकचा वापर

डागविरहीत त्वचेसाठी करा वेलचीच्या फेसपॅकचा वापर

महिला आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी काय काय नाही करत, अगदी ब्युटी ट्रिटमेंटपासून ते घरगुती उपायापर्यंत सर्वाचा वापर करण्यात येतो. पण तुम्हाला माहीत आहे का? आपल्या नेहमीच्या वापरातील वेलचीचा उपयोग हा खाण्याशिवाय चेहऱ्यावर अधिक चमक अर्थात उजळपणा आणण्याासाठी होतो. वाचून तुम्हाला आश्चर्य नक्कीच वाटलं असेल. पण वेलचीमुळे तुम्ही तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालू शकता आणि त्याचा वापर करून घेऊ शकता. वेलचीमध्ये विटामिन ए, बी आणि सी आढळते. त्याशिवाय वेलचीमध्ये अँटिसेप्टिक आणि अँटिबॅक्टेरियल गुणही असतात, जे चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्यामुळे तुम्ही घरच्या घरी काही वेलचीचे फेसपॅक बनवून त्याचा उपयोग चेहऱ्यावरील डाग कमी करून चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी करू शकता.

उन्हाळ्याच्या दिवसात त्वचेवर चमक राहण्यासाठी वापरा पुदीन्याचे 5 फेसपॅक

Beauty

K.Play Lychee Hydrating Sheet Mask

INR 145 AT MyGlamm

वेलची आणि गुलाबपाणी फेसपॅक

Shutterstock

Beauty

K.Play Mandarin Brightening Sheet Mask

INR 145 AT MyGlamm

वेलचीमध्ये असणारे अँटिबॅक्टेरियल गुण तुमच्या त्वचेला स्वच्छ करण्यासाठी फायदेशीर ठरतात तर गुलाबपाणी हे त्वचेला मऊ आणि मुलायम ठेवण्यासाठी अत्यंत लाभदायक असते. वेलची आणि गुलाबपाण्याचा फेसमास्क हा त्वचेला अधिक निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतो. हा फेसपॅकमुळे त्वचेवर कोणताही डाग राहत नाही आणि त्वचा नेहमी चमकदार राहाते. जेव्हा आपले संपूर्ण शरीर स्वच्छ करण्याची वेळ येते तेव्हा आपण शॉवर जेल वापरू शकता.

कसा वापरावा फेसपॅक

  • वेलचीची पावडर करा आणि  एका बाऊलमध्ये एक चमचा वेलची  पावडर घ्या आणि त्यामध्ये गुलाबपाणी मिक्स करून पेस्ट तयार करा
  • ही पेस्ट तयार झाल्यावर चेहऱ्याला लावा 
  • साधारण 10 मिनिट्स ही पेस्ट चेहऱ्यावर तशीच राहू द्या
  • आठवड्यातून एकदा तुम्ही हा प्रयोग केल्यास, तुमची त्वचा डागविरहीत होते

 उडीद डाळीचे 5 फेसपॅक, तुमची त्वचा बनवतील अधिक चमकदार

 

वेलची आणि मध फेसपॅक

Shutterstock

मधाचा वापर चेहऱ्यावर अधिक उजळपणा आणण्यासाठी करण्यात येतो. तर वेगवेगळ्या त्वचेनुसार वेलचीचा वापर करण्यात येतो. तुम्ही वेलची आणि मधाचा एकत्रित वापर करून चेहऱ्यावर अधिक उजळपणा  आणू शकता आणि यामुळे चेहऱ्यावरील डागही कमी होतात. तसंच चेहऱ्यावर आलेले मुरूम कमी करण्यासाठीही याचा उपयोग होतो. अँटिबॅक्टेरियल तत्वामुळे चेहरा स्वच्छ राखण्यास याची  मदत होते. चमकणार्‍या त्वचेसाठी चांगले फेस शीट मास्क वापरुन पहा.

कसा वापरावा फेसपॅक

  • वेलचीची पावडर करा आणि एका बाऊलमध्ये एक चमचा वेलची पावडर घ्या आणि त्यामध्ये मध घालून पेस्ट तयार करा
  • ही पेस्ट चेहऱ्यावरील मुरूमं आणि डाग असणाऱ्या ठिकाणी  लावा  
  • रात्रभर झोपेत ही पेस्ट तशीच राहू द्या
  • सकाळी उठल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा
  • आठवड्यातून हा प्रयोग एकदा करून पाहा. तुमचा चेहरा अधिक सुंदर आणि आकर्षक दिसेल

घरगुती फ्रूट फेसपॅक वापरून आणा त्वचेवर ग्लो

वेलची आणि दूध फेसपॅक

Shutterstock

वेलचीचा फेसपॅकसह स्क्रब म्हणूनही तुम्ही उपयोग करून घेऊ शकता. वेलचीचा वापर करून ब्लॅकहेड्स काढणे  सोपे होते. तर दूध हे मुळातच चेहऱ्यासाठी उत्तम आहे. दुधाच्या वापराने चेहरा डागविरहीत तर होतोच पण त्वचा अधिक मऊ आणि मुलायम राहण्यास मदत मिळते. 

कसा वापरावा फेसपॅक

  • वेलचीची पावडर करा आणि एका बाऊलमध्ये एक चमचा वेलची पावडर घ्या आणि त्यामध्ये एक कप दूध घालून मिक्स  करा
  • हे मिश्रण तयार झाल्यावर चेहरा आणि मानेवर लावा आणि मालिश करा
  • काही वेळ तसंच राहू द्या आणि नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा
  • हे मिल्क क्लिंन्झर तुम्ही आठवड्यातून एकदा वापरून चेहरा अधिक सुंदर करू शकता

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक