मेकअप व्यवस्थित करण्यासाठी मेकअप टूल्स फायदेशीर ठरतात. बाजारात यासाठी मेकअपचे निरनिराळे ब्रश, ब्लेंडर, आयलॅश कर्लर विकत मिळतात. फाऊंडेशन लावण्याच्या प्लॅट ब्रशपासून आयलायनर परफेक्ट लावण्यासाठी छोट्या परफेक्ट ब्रशपर्यंत ब्रशचे अनेक प्रकार आहेत. मात्र मेकअप केल्यानंतर या मेकअप ब्रशमध्ये नेहमी मेकअप प्रॉडक्ट अडकून बसतात. अगदी तुम्ही बरेच दिवस मेकअप जरी नाही केला तरी तुमच्या मेकअप ब्रशवर धुळ, माती, प्रदूषण बसते. जेव्हा तुम्ही पुन्हा या ब्रशचा वापर करता तेव्हा ती धुळ तुमच्या मेकअप प्रॉडक्टमध्ये उतरते. एवढंच नाही तर यामुळे तुमच्या त्वचेला इनफेक्शनचा धोका निर्माण होतो. यासाठीच वेळच्या वेळी मेकअप ब्रश स्वच्छ करणं खूप गरजेचं आहे. घरच्या घरी मेकअप ब्रश स्वच्छ करण्यासाठी तुम्ही हे ब्रश साफ करण्याचं सोल्युशन तयार करू शकता. जाणून घ्या ते कसं तयार करायचं.
DIY: घरीच तयार करा मेकअप ब्रश स्वच्छ करण्याचे सोल्युशन –
मेकअप टूल्स जीवजंतूंपासून दूर ठेवण्यासाठी कमीत कमी आठवड्यातून एकदा तुमचे मेकअप ब्रश स्वच्छ करणं गरजेचं आहे. आम्ही तुम्हाला मेकअप ब्रश स्वच्छ करण्यासाठी दोन प्रकार सांगणार आहोत. त्यातील एक तुम्ही आठवड्यातून एकदा ब्रश साफ करण्यासाठी वापरू शकता आणि दुसरं तुम्हाला कधीही पटकन वापरण्यासारखं आहे.
आठवड्यातून एकदा मेकअप ब्रश स्वच्छ करण्यासाठी सोल्युशन –
साहित्य –
- एक रिकामी बाटली
- एक भांडे
- भांडी घासण्याचे लिक्विड अथवा अॅंटि बॅक्टेरिअल फेस वॉश
- ऑलिव्ह ऑईल
- इसेंशिअल ऑईल ( लव्हेंडर अथवा टी ट्री ऑईल)
- डिसइन्फेक्ट सोल्युशन
कसे तयार कराल सोल्युशन –
- एका भांड्यामध्ये तीन चमचे कोणतेही लिक्विड साबण घ्या आणि त्यामध्ये एक ऑलिव्ह ऑईल, एक चमचा डिसइन्फेक्ट सोल्युशन मिसळा
- चार पाच ड्रॉप इसेंशिअल ऑईल मिसळा आणि मिश्रण एकजीव करा
- तुमचे मेकअप ब्रश धुवून या सोल्युशनमध्ये व्यवस्थित बुडतील असे ठेवून द्या.
- थोड्यावेळाने ते तळहातावर घेऊन हलक्या हाताने चोळा
- मेकअप ब्रशमधील साहित्य निघून गेल्यावर ते पुन्हा थंड पाण्याने धुवा.
- जर तुम्हाला भरपूर प्रमाणात मेकअप ब्रश धुवायचे असतील तर हे सोल्युशन तयार करून एका स्वच्छ बाटलीत भरून ठेवा.
त्वरीत मेकअप ब्रश स्वच्छ करण्यासाठी सोल्युशन –
मेकअप करण्यापूर्वी घाई असेल तर त्वरीत मेकअप ब्रश स्वच्छ करण्यासाठी तुम्ही हे सोल्युशन वापरू शकता.
साहित्य –
- एक भांडे
- डिसइन्फेक्ट लिक्विड
- रबिंग अल्कोहोल
- स्प्रे बॉटल
- डिसइन्फेक्ट वाईप्स
- इसेंशिअल ऑईल
सोल्युशन तयार करण्याची पद्धत –
- एका भांड्यात तीन चमचे डिसइन्फेक्ट लिक्विड आणि रबिंग अल्कोहोल घ्या.
- दोन चमचे इसेंशिअल ऑईल टाका आणि चांगले मिक्स करा.
- हे मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये भरा
- मेकअप करण्यापूर्वी मेकअप ब्रशवर हे लिक्विड स्प्रे करा.
- मेकअप ब्रश टिश्यू पेपर अथवा डिसइन्फेक्ट वाईप्सने स्वच्छ पुसून घ्या.
- मेकअप ब्रश स्वच्छ करण्याआधी कमीत कमी तीन ते चार वेळा रिपीट करा.
तुमचे मेकअप ब्रश स्वच्छ करण्यासाठी हे सोल्युशन तयार करण्यासाठी काही मिनिटेदेखील लागणार आहे. पण जर तुम्हाला हे करण्याचा कंटाळा असेल तर तुमचे मेकअप टूल्स स्वच्छ करण्यासाठी मायग्लॅमचे वाईप आऊट प्रॉडक्ट तुम्ही नक्कीच वापरू शकता.
फोटोसौजन्य – शटरस्टॉक
अधिक वाचा –
या फेस्टिव्ह सीझनसाठी आयशॅडोचा गोल्डन रंग आहे पुरेसा, असा करा वापर
फाऊंडेशन आणि कन्सिलरची शेड निवडताना काय घ्यावी काळजी
मेकअप टिकवण्यासाठी सेटिंग पावडर की बनाना पावडर कशाचा करावा उपयोग