हायलाईटर हे आपल्या चेहऱ्याला आपल्याला हवे तसे फिचर्स दाखविण्यासाठी वरदान आहे. नाक, ओठ, गाल या सगळ्यासाठी एक जादुई लुक मिळवून देण्यासाठी हायलाईटरचा उपयोग करून घेता येतो. चेहऱ्याला अधिक चमक देण्यासाठी हायलाईटर हे सर्वोत्तम उत्पादन मानले जाते. हे तुमच्या चेहऱ्याला अधिक सुंदर आणि आकर्षक बनवते. हायलाईटर आपल्या चेहऱ्यावरील आवश्यक भाग हायलाईट करते. पण तुम्हाला हवं तर तुम्ही हायलाईटरशिवायदेखील आपल्या चेहऱ्यावरील खास भाग हायलाईट (Highlight your Face Without Highlighter) करू शकता.
तुम्ही एखाद्या ठिकाणी असाल अथवा अगदी ऑफिसमध्ये असाल आणि अचानक कुठेतरी पार्टीला जायचा प्लॅन तयार होतो तेव्हा अर्थात तुमच्याकडे हायलाईटर(Highlighter) असण्याची शक्यताच नसते. मग अशावेळी चेहऱ्यावर शिमर कसे आणणार हा प्रश्नही तुम्हाला त्रास देतो. पण अशा स्थितीत त्रास करून घ्यायची गरज नाही. तुम्ही हायलाईटरला दुसरे कोणते पर्याय आहेत ते पडताळून पाहावे. अशावेळी काय करायचे याच्या काही सोप्या ट्रिक्स आणि टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. याच्या मदतीने तुम्ही हायलाईटरशिवाय आपला चेहरा हायलाईट करू शकता. जाणून घेऊया हायलाईटरशिवाय कसा करावा चेहरा हायलाईट (Highlight your Face Without Highlighter)-
जास्त आयशॅडो पॅलेट्समध्ये हायलाईटर शेड असतात, जे हायलाईटरचे काम करते. आतापर्यंत याचा वापर आपण डोळ्यांसाठी करत आलो आहोत. पण जेव्हा आपल्याकडे हायलाईटर नसते तेव्हा आपण या आयशॅडोचा वापर ब्रो बोन आणि चिकबोन्सवर हायलाईटर म्हणून नक्कीच करू शकतो. हे वापरणं अतिशय सोपं आहे आणि तुम्हाला हवा तसा लुकही मिळू शकतो.
व्हॅसलिनचा वापर आपण आतापर्यंत हिवाळ्यात त्वचा फुटली अथवा ओठ फुटल्यानंतर त्यावर केलेला ऐकला आहे. पण तुम्ही कधी विचार तरी केला आहे का की, व्हॅसलिनचा प्रयोग आपण ग्लॉसी पर्याय म्हणून करू शकतो. हा तुमच्यासाठी एक लिप बामदेखील होऊ शकतो. लिपस्टिकवर तुम्ही व्हॅसलिन लावले तर तु्म्हाला फरक दिसून येतो. तसाच व्हॅसलिन चेहऱ्यावर तुम्ही लावले तर चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी आणि हायलाईटर म्हणून याचा उपयोग करून घेता येतो. पूर्ण मेकअप केल्यानंतर तुम्ही हायलाईटेड पाँईट अर्थात चिकबोन्स, नाक, कपाळ आणि गालावर व्हॅसलिन लावा आणि चेहरा हायलाईट करा.
भारतातील उत्कृष्ट 10 फाऊंडेशन, तुमच्या त्वचेसाठी ठरतील उत्तम (Best Foundations In India)
तुमच्याकडे हायलाईटर नसेल तरत तुम्ही लिप ग्लॉसचा यासाठी वापर करू शकता. यामुळे तुम्हाला चमकदार लुक मिळतो. तुम्ही तुमच्या हाताच्या बोटावर लिप ग्लॉस घ्या आणि आपल्या चिकबोन्सवर लावा. हे तुम्ही मॅट लिपस्टिकसह वरच्या ओठांच्या मध्ये लावा, यामुळे तुम्हाला कॉन्ट्रास्ट लुक परफेक्ट मिळतो.
तुमच्या डोळ्याखाली काळी वर्तुळं असतील तर तुम्ही तुमच्या स्किन टोनपासून तीन शेड्स हलके कन्सीलर लावणे गरजेचे आहे. हेच कन्सीलर तुम्हाला हायलाईटर म्हणूनही वापरता येते. फाऊंडेशन लावल्यानंतर चेहऱ्यावर लाईट कन्सीलर डोळ्यांखाली लावले जाते, मात्र हायलाईट करण्यासाठी हे तुम्ही चिकबोन्स, डोळ्यांच्या आतल्या बाजूला आणि ओठाच्या वरच्या बाजूला लावा. हे तुम्हाला शिमरी लुक देणार नाही. पण चेहऱ्यावर लाईट पडल्यावर नैसर्गिकरित्या चेहरा चमकदार दाखविण्यास फायदेशीर ठरते.
सेलिब्रिटीसारखा मेकअप हवा असेल तर वापरा उत्कृष्ट मेकअप उत्पादने
तुम्ही तुमची त्वचा अधिक स्मूद आणि पॅचफ्री ठेऊ इच्छित असाल तर त्यासाठी रेडियन्स प्राईमरचा वापर करायला हवा. याचा वापर तुम्ही फिनिशिंग आणि शिमरी टचसाठी करू शकता. चेहऱ्याच्या ज्या भागाला तुम्हाला हायलाईट करायचे आहे तिथे हलकेसे प्राईमर लावा आणि मग पाहा चेहरा कसा चमकदार बनेल.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक