ADVERTISEMENT
home / Fitness
आठवड्यातून एकदा खा आवडीचे पदार्थ आणि वजन ठेवा नियंत्रणात

आठवड्यातून एकदा खा आवडीचे पदार्थ आणि वजन ठेवा नियंत्रणात

वजन नियंत्रणात ठेवायचे म्हणजे ‘डाएट’ करायचे. पण काहीही म्हणा कधीतरी बाहेरचं चमचमीत खाण्याचा मोह काही केल्या आवरता येत नाही. अशावेळी चीट डे लवकर यावा असे सतत वाटत राहते. मन मारुन तुम्ही जर डाएट करत राहिलात तर तुम्हाला त्याचे सकारात्मक परिणाम तुमच्या शरीरावर मुळीच दिसणार नाहीत. म्हणूनच आठवड्यातील एक दिवस हा चीट डे म्हणून ठेवला जातो. तुम्हीही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल आठवड्यातील 6 दिवस अगदी योग्य पद्धतीने डाएट करत असाल तर आठवड्याचा चीट डे तुमच्यासाठी आहे फार महत्वाचा या दिवशी तुम्हाला आवडतात त्या पदार्थांवर तुम्ही अगदी बिनधास्त ताव मारु शकता आणि हो हे पदार्थ खाल्ल्यामुळे तुमचे वनजही नाही वाटणार बरं का! चला जाणून घेऊया याची योग्य पद्धत

लिक्विड डाएटच्या मदतीने महिन्याभरात करा वजन कमी

असा करा तुमचा आठवड्यातील एक दिवस आवडीच्या पदार्थांचा

एक दिवस आवडीच्या पदार्थांचा

Instagram

ADVERTISEMENT
  • आठवड्यातून एक दिवस आवडीचे पदार्थ खाण्याचा विचार करत असाल तर आठवड्यातील तो दिवस कोणता ते तुम्ही ठरवा. (काही जणांसाठी रविवार हा बाहेर जाण्याचा दिवस असतो. अशावेळी बाहेर खाणे हे हमखास होते. त्यामुळे अशा वाराची निवड करा ज्या दिवशी तुमचा खाण्याचा योग जास्त असतो. 
  • एक दिवस आवडीचे पदार्थ खायचे म्हणजे आपल्या मनाशी एखादा मेन्यू फिक्स झालेला असतो. म्हणजे काहींना अगदी आवर्जून बिर्याणी किंवा पिझ्झा- बर्गरसारखे फास्ट फूड खाण्याची इच्छा तीव्र होते. त्यामुळे तुम्ही नेमकं काय खाणार आहात ते ठरवा. 
  • आठवड्यातील एक दिवस खायचे असे असले तरी तुम्ही नेमकं कोणत्या वेळी खाणार आहात ते ठरवा म्हणजे तुम्ही नाश्त्यापासून सुरुवात करत असाल तरी चालेल. पण जर तुम्ही नाश्ता चांगला पोटभरीचा केला तर तुम्हाला दुपारचे जेवण जाणार नाही. शक्य असेल तर सकाळी तुमचा रेग्युलर नाश्ता करा. त्यानंतर मग उरलेल्या प्रहरी काय खाणार याचे प्लॅनिंग करा. 
  • जर तुम्ही दोन वेळा चांगला ताव मारुन खाण्याचा विचार करत असाल तर नाश्ता थोडा हल्का करा नाहीतर तुम्हाला खूप जास्त खाण्याची इच्छा होणार नाही. 
  • एक दिवस मिळाला आहे म्हणून सगळचं एका दिवशी खाण्याचा विचार करु नका. आठवड्यातील तो दिवस तुम्हाला आवडत असलेल्या सगळ्यात महत्वाची गोष्ट खाण्यात घालवा. उदा. आज जर पिझ्झा खायचा ठरवला असेल तर तोच खा. उगाच 10 वेगळे प्रकार खायला जाऊ नका. एकदा डाएटची सवय लागल्यानंतर तुम्हाला फार काही खाण्याची तशीही इच्छा होत नाही. म्हणजे तुमची भूक ही स्तिमित होते. त्यामुळे तुम्ही एकावेळी कदाचित दोन-तीन स्लाईस पिझ्झा खाऊ शकाल. त्यापेक्षा अधिक तुम्हाला जमणारही नाही. त्यामुळे अन्न वाया जाणार नाही याची काळजी घेत तुम्ही एका दिवशी एका मिल वेळी एकच पदार्थांचा मनसोक्त आनंद घ्या. 
  • जर तुम्हाला कोल्ड कॉफी, कोल्ड्रिंक्स, सोडा असे काही क्रेव्हिंग्ज होत असेल तर तुम्ही तेही करण्यात काही हरकत नाही. तुम्ही मिल्स किंवा मिल्सनंतर त्याचे सेवन करु शकता. या दिवशी जराशी साखरही तुम्हाला चालू शकते. 
  • तुमचे पोट जर तृप्त झाले असेल आणि तुम्हाला रात्रीच्या जेवणाला फार काही खायची इच्छा नसेल तर तुम्ही हल्कफुल्क खा. जर तुम्हाला काही खायचं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीचा पदार्थ खा काहीही हरकत नाही. 
  • पण रात्रीच्या जेवणानंतर आता मात्र तुमच्या तोंडाला आणि पोटाला आरामाची गरज आहे. तुमच्या सगळ्या खाण्याच्या इच्छा पूर्ण झाल्या असतील तर तुम्ही आता डिटॉक्स करतील असे काही चांगले ड्रिंक प्या. त्यामुळे तुम्ही दुसऱ्या दिवसाच्या डाएटसाठी तयार व्हा. 

वजन कमी करण्याठी पनीरपेक्षा तोफू का आहे चांगले

टाळा या चुका

एक दिवस मनसोक्त खाताना तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणेही फार महत्वाचे आहे. तुम्हाला एकच दिवस खायचे आहे म्हणून तुम्ही तुमचा मिल्सचा वेळ चुकवू नका. तुम्ही दिवसाला जसे चार मिल्स घेत असाल तर  अगदी त्याचपद्धतीने तुम्ही हे मिल्स घ्या. मिल्समध्ये अजिबात अंतर ठेवू नका. त्यामुळे तुम्हाला पोटाचे विकार होण्याची शक्यता अधिक असते. 

आता एकद दिवस असा ताव मारायचा असेल तर तुम्ही अगदी आरामात तुम्हाला हवं  ते  खा आणि वजन नियंत्रणात ठेवा.

वजन कमी करण्यासाठी जेवण टाळणं योग्य की अयोग्य

ADVERTISEMENT
06 Oct 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT